पाचवा माळा …! भाग 1



पाचवा माळा...                                                                 भाग ... 

 

मुंबई ला येऊन आज आम्हाला एक हफ्ता झाला होता. खरतर आम्ही सांगली लाच मुक्काम करायचो पण एक इच्छा माझ्या घरातील नातेवाईकांची आणि माझी देखील अशी होती कि मुंबई (सोन्याची नागरी) सारख्या शहरात आपलं स्वतःच एक तर घर असावं आणि तेथे स्थलांतरित व्हावं. आई आणि बाबा नि आमच्या साठी खूप छान रूम निवडला, बिल्डिंग मध्ये असलेले व्या माळ्यावर आमचं घर, घराची परिस्तिथी बेताची असल्यामुळं आम्ही वन आर के रूम निवडणं लाख मोलाचं समजलं.

 

आज आम्हाला पूर्ण महिना झाला माझी आनि माझ्या बाजूला राहणाऱ्या कुणाल शी माझी मैत्री खूपचांगली झाली होती, कुणाल हा अतिशय घाबरट आणि लाजाळू प्रकारचा मुलगा, रंग सावळा, चेहरा रेखीव आणि डोळे घारे आणि सतत काही तरी विचार करणारा चेहरा होता त्याचा. एक दिवस मी आणि कुणाल " दो लाईन" (गोट्यांचा एक खेळ) खेळून घरी परतायला निघालो रात्री चे ;३७ मिन. झाले होते सहज मी कुणाल ला विचारले , "काय रे कुणाल, आपल्या इकडच्या बिल्डिंग बद्दल काही सांग ना...! त्याने त्याच्या माहिती प्रमाणे चोरी,दरोडी,हल्ला,मारहाण इतर चळवळी सांगायला काही नहि केली. त्याला मी म्हटलं अरे राजा, मला तू या गोष्टी नको सांगू मला काही तरी भुताटकी, हॉरर अश्या गोष्टी सांग ज्या आपल्या बिल्डिंग मध्ये अस्तित्वात आहेत मला त्याबद्दल जाणून घ्याल आवडेल, वेळ घालवता त्याने सांगयला सुरुवात केली.

 

खूप वर्षा पूर्वी व्या ममाळ्यावरती एक जोडपं राह्यचं, त्यांच्यात सतत वाद, तंटा आणि मारहाण देखील होत, बिल्डिंग ची माणसे त्यांना बगुन तोंड वाकडी करत आणि त्यांच्या वर दुर्लक्ष करत. एक दिवस रात्री चे १० वाजले होते होते, त्यांच्या घरी काही कारणास्तव आग लागली होती माहिती आणि भीती पोटी माणसे त्यांच्या घरा जवळ गेली तर त्या घरी काही तरी जळत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी दरवाजा तोडला तर एक जिवंत बाई जळत होती, अतिशय प्रयत्न करून देखील ते त्या बाई ला वाचवू शकले नाही, ती बाई नक्कीच त्याची बायको असणार आणि त्यानेच हे विचंबित करणारे कृत्य केलेलं असणार हे मात्र माणसांना समजून चुकले होते, वेळ घालवला त्यांनी पोलिसात दाखल दिली आणि योग्य ती कारवाई करण्यास सांगितली. पोलिसांनी ते घर सील केलं आणि त्या घराला टाळा लावला

 

     हे सगळं सांगताना मला कुणाल च्या चेहऱ्यावरचे हावभाव हे सर्व सामान्य वाटावे असे नव्हते, त्याचे डोळे लाल झाले होते , कपाळावरून घामाचे थेम्ब पडत होते आणि तो त्याच्या अंगठ्याच्या बोटाने सरकवत माझ्याशी बोलू लागला जणू ती घटना आत्ता त्याच्या समोरच घडत असावी. त्याला मी बोललो चल आपण त्या घरात जाऊन बगु नक्की काही भेटत का (डिटेक्टिव्ह च्या नजरेने), त्याने नकार अर्थी मान हलवत "नाही बाबा, मी नाही जाणार तिथे, त्याने सांगितलं कि " त्या काळ्या दिवसानानंतर पासून आज पर्यंत त्या घरातून रात्री सुमारे :३४ च्या दरम्यान कोणत्या तरी बाई चा रडण्याचा आवाज येतो, अंगावरती  काटे यावे अश्या आवाजाने बिल्डिंग चे सारे व्यक्ती घाबरून जात, एवढंच नाही तर व्या माळ्यावरच्या सगळ्या रहिवाशी लोकांनी आपले घर खालच्या माळ्यावर काहींने दुसऱ्याच कुठल्या तरी ठिकाणी शिफ्ट केले, तो आवाज एवढा कर्कश कि त्यातून त्या बाई ला होत असणाऱ्या वेदनांचा अंदाज देखील बांधता यावा, भीती पोटी बिल्डिंग च्या रहिवाशी ने होमहवन, बाबा आणि काही तांत्रिकी कार्य पार पडले पण तरीही रात्री येणार आवाज हा येतच राहिला, आणि हो  "खबरदार तू या बिल्डिंग ची लिफ्ट मध्ये कधी जाऊ नको","कुणाल ने अतिषाशी भीतीदायक नजरेने डोळे मोठे करत मला सांगितलं, पण असं का मी विचारले... , तर त्यावर कुणाल बोलला..., अशाच एका दिवशी एक माणूस सहज लिफ्ट ने व्या माळ्यावर जात होता पण थ्या मजल्या नंतर ती लिफ्ट व्या माळ्यावर अडकली रात्री चे ११ वाजले असता कोणी लिफ्ट कडे लक्ष दिले नाही सकाळी जेव्हा माणसांनी लिफ्ट चालू करू पहिली, तर लिफ्ट हि व्या माळ्यावर अडकली होती जेव्हा ती लिफ्ट खोलली गेली तेव्हा त्यात तो माणूस रक्त बंबाळ,लाथपथ होऊन जमिनीवर धाराशाही होता, चेहऱ्यावरती एखाद्या बाईने नखाने ओरबाडल्या चे निशाण, एक डोळा डोक्या पासून लांब पडलेला आणि दुसरा खूप मोठा होऊन आकाशाच्या दिशेने बागत होता, डोक्यामध्ये मोठा होल झालेला आणि त्यातून अफाट रक्ताच्या धारा वाहून लिफ्ट च्या बाजून जात ते रक्त जमिनी वर, टप टप टप...  पडत होत

 


कुणाल ला मी खूप प्रयत्न केला समजवण्याचा पण तो काय ऐकलं नाही, दोन्ही बुव्या उंचावत मी त्याला "ठीक आहे" बोलून मान हलवत उत्तर दिले, पण हे फक्त त्याला दर्शवण्या करित्या खर तर मला आता त्या रूम मध्ये जाण्याच अतोनात इचछा उमगली होती आणि ती मी पूर्ण करणार होतो.

आम्ही आप-आपल्या घरी पोहोचलो आणि रात्रीचे जेवण करून मी झोपायचा पर्यंत करत होतो पण झोप मात्र येण्यास तयार नव्हती माझे विचार आणि माझे मन हे फक्त त्या लिफ्ट मध्ये घडलेल्या आणि त्या घरामध्ये जेथे ती बाई जाळून मेली त्या चा आणि या लिफ्ट मध्ये झालेल्या घटनेचा काही संबंध होता का यातच माझे विचार फेऱ्या मारत होते

 

दुसरा दिवस..  विचार करत करत काल रात्री मला कशी झोप लागली हे माझं मला समजलं नाही पण आपण आज त्या रूम मध्ये काय घडलं आहे याचा अंदाज बांधला जायचं मनाशी विचार केलेला आणि ते सुद्धा लिफ्ट ने, माझं मलाच समजत नव्हतं मी काय करत आहे पण करायच आहे एवढं माहिती होत,

रात्री चे ११:२५ झाले आणि मी विचार केला कि हि वेळ आपल्या साठी चांगली आहे कारण या वेळी बाहेर कोणी नसणार आपण आता  निघावेत आणि पाहावे नक्की या मागे काय आहे, मी  लिफ्ट कडे आपले पाऊल वळवले आणि त्या दिशेने निघालो ,लिफ्ट च्या जागी डोळ्याला अंधार पडेल असा काळोख आणि कानाला टाचणी पडली तरी आवाज यावा अशी शांतता होती मनामध्ये भीतीचे वादळ जोराने थैमान घालत होते आणि माझे मन मला परत जायला सांगत होते, कदाचित हि माझी अंतरात्मा होती, परिस्तिथी सांभाळत मी खिशातून हात काढला आणि माझे बोट लिफ्ट च्या बटनाकडे नेले आणि बटन दाबले, अंधार जागी त्या बटना मधून निघणारी लाल लाईट माझ्या चेहऱ्यावर पडली, अचानक लोखंडाचे दरवाजे बंद चालू होत असल्याचा हळू आवाज माझ्या कानावर पडला तो आवाज वरच्या माळ्या वरून येत असावा कदाचित कोणी लिफ्ट मध्ये असेल....! असा मी स्वतःशी संवाद साधला, लिफ्ट खाली अली होती आणि लिफ्ट चा दरवाजा खुलत होता जंग लागलेल्या दरवाजा सारखा तो उघडत होता जणू खूप वर्ष आधी पासून तो तसाच आहे, दरवाजा पूर्णपणे खुलला गेला आणि मी जाळी ढकलून लिफ्ट मध्ये प्रवेश केला आणि जाळी लावून घेतली, अंग थरथरत होते,कपाळावर घामाची उपस्तीथी मला जाणवत होती, सगळं अंग गरम होत पण कपाळ थंड पडलेलं सोबत हाताची बोटे हि, मी हिंमत करून प्रेस केले आणि आता लिफ्ट चालू झाली होती , पुढे काय होणार याची मला कल्पना नव्हती , आपण येणाऱ्या संकटाला आवाहन तर नाही दिले ना ? किंवा हा शेवेचा दिवस तर नाही ? अश्या अफाट प्रश्नांचा भडीमार माझ्या डोक्यात होऊ लागला , आपण आपले मरन स्वतः लिहिले हे मला कळून चुकले होते पण आता माघार घेणे हे ऑप्शन उरले नव्हते, लिफ्ट आता व्या माळ्यावर पोहोचली होती पण आता माझे पूर्ण शरीर थंड पडले होते कारण लिफ्ट हि खूप वेळ झाली थांबली होती, असंख्य प्रश माझ्या डोळ्या समोर उभारले आणि डोळे लाल झाले होते, काय करावे काही समजत नव्हतं आणि तेवढ्यात ..... to be continue

 


Post a Comment

0 Comments