नशीब...!

   


 

रात्री चे १०:०० वाजले होते, मुंबई मध्ये रात्री चे १२:०० ताशे गावात रात्री चे १०:०० असा अंधार पडतो, जेवण पोट भर झाल्यानंतर संतोष ने बाहेर जाऊन एखादा राऊंड मारून येऊ असा प्रस्ताव ठेवला, उगाचच काही काम नसलेल्या आम्हा दोघांनी बाहेर जायचं ठरवलं, मित्राचीच हिरो स्प्लेंडर होती तर त्यावर आम्ही बाहेर जायचं ठरवल.

संपूर्ण काळोख असलेल्या आकाशात लहान-सहान चांदण्याने जणू आपली उपस्तीथी दाखवली, आणि त्याची पूर्ण सुंदरता मात्र चंद्राने प्रकाशित केली , गाडीवरती मागे बसून मी त्या नजाऱ्याचा आनंद लुटत होतो, अतिशय धावाधाव असलेल्या जीवनात काही क्षण सुखाचे भेटले असं वाटलं.
बोलता बोलता आम्ही दोघे खूप लांब पर्यंत पोचलो ते आम्हाला कळलंच नाही, खूप वेळ झाला पण संतोष काही बोलत च नव्हता कदाचित तो काही विचारात असावा असं म्हटलं, त्याच्या पाठीवर मी हात मारला आणि म्हटलो अरे भाई काही बोलणार आहेस का नुसता गप बसणार आहेस, त्यावर त्याचे शांत राहणे मात्र यामुळे मला अस्वस्थ वाटू लागले, माझी नजर गाडीवर चा आरश्यात गेली आणि त्याचा विचित्र आणि ओबड धोबड चेहरा माझ्या डोळ्या समोर आला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे... तो चेहरा संतोष चा नव्हता... हे पाहून मी पूर्ण थंड पडलो, कपाळावर लांब टाके असलेले वार, डोळे पूर्ण पांढरे आणि नाकाचा पूर्ण भाग नसलेला, वेडे वाकडे दात असा तो चेहरा माझ्या कडे पाहत होता , आपण आता मोठा संकटात पडलो हे मला कळून चुकले..



वेळ न घालवता मी माझ्या कपाळावर चा घाम हाताने पुसला, आणि अंग ठार थरथरन बंद करायचा प्रयन्त केला आणि काही झालं च नाही असा प्रदर्शित केलं , आता आपण काही तरी करावं असं वाटू लागलं तेवढ्यात वेळ न घालवता मी गाडीवरून उडी मारायच ठरवलं आणि गाडी ची गती कमी होताच मी त्यावरून झेप मारली, आपल्याला काही होणार नाही या विचाराने उडी मरणारा मी जाऊन सरळ एका मोट्या दगडाला जाऊन धडकलो आणि माझ्या डोक्याला जबरदस्त मर लागला आणि त्यातून रक्त येऊ लागल, तिथेच एका झाड मागे जाऊन मी लपलो आणि गाडी पुढे जायची वाट बघू लागलो , गाडी चा आवाज कमी कमी होऊ लागला त्यावरून मी अंदाज बांधला कि तो निघून गेला आहे, तिथल्याच झाडाच्या पडलेल्या पानाने मी माझ्या डोक्याचे रक्त पुसत होतो आणि आता या रात्री आपण आपल्या घरी कास जायचं याचा विचार करत होतो,
तो परत तर येणार नाही ना या विचाराने मी खूप घाबरून गेलेलो घरातले सगळे मला शोधू लागले असणार याची मला कल्पना होतीच कसा बसा तिथून मी पळत पळत घरी पर्यंत जायचा विचार केला आणि अतिशय वेगाने धापा थकत मी घरा जवळ पोहोचलो माझी हि अवस्था पाहून सर्वे जण विचारात पडले संतोष ने देखील प्रश विचारला , कुठे होतास रे बाबा ... त्याला बोललो काही नाही बाहेर फिरत होतो सहज बोलून बिषय फिरवला ....

घटना काल्पनिक आहे, याचा माझा आणि कोणाचा हि सामाजिक, राजकीय संबंध नाही लक्ष असावे 😁😁
समीर चंदनशिवे ...

Post a Comment

0 Comments