चित्रपट आयुष्याचे

 



सकाळी उठल्यापासुन ते रात्रि घरी परतण्याचा रोजचा प्रवास आणि त्या दरम्यान होणऱ्या उलाढालि काही नविन राहिल्या नाहित, आणि परिस्थिती शिवाय कोणि मोठा गुरू नाही. हीच एक बाब उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवण्यास प्रेरनादायी ठरते. चमक-धमक सोन्याची नगरी मुंबई जितकी सुंदरतेचं दर्शन घडवते, तीतकेच मानसांचे दोन चेहरे देखिल दाखवते. कोणत्याही पुस्तकात “प्रकार चेहऱ्याचे” हा धडा नसल्यामुळे बहुतांश जनांना ते आळखने आवघड जाते. हजारो लोकांमध्ये असतांनाही कधी-कधी एकटे वाटत असल्यास, इतरांशी थोडी रजा घेऊन स्वत:शी बोलायची वेळ आली आहे याची कनखर घंटा वाजते. आपल्या आयुष्याच्या चित्रपटातील प्रत्येक अभिनेता आपले अभिनय सादर करून रजा घेतो, आपन त्यातुन किंबहुना त्या व्यक्तिमधुन काय शिकतो हे समजने अतिशयोक्ति ठरेल कारण, या चित्रपटाचे निर्देशक व दिग्दर्शक आपन स्वत:च असतो. नाय का..।

समिर चंदनशिवे…।

 

Post a Comment

0 Comments