शाळा...!



शाळा...! 

Annual function खुप धमाकेदार होत , डान्स , सिंगिंग आणि विवद्ध गोष्टीनी जशी मैफिलच सजली होती, अतिशय नाचून आणि धिंगाणा घालून मी सुद्धा दमलो आणि बाजूला असलेल्या एका बाकावर जाऊन बसलो आणि बाकीच्या मित्रांना बगायला लागलो , मनात एक विचार पडला, कॉलेज चा आज शेवटचा दिवस, कदाचितच कोणी भेटेल किंवा नाही हे देखील सांगता येत नाही, डोकं बधीर झालं आणि माझं मन शाळेच्या प्रवासात डुबक्या मान्यत मग्न झालं....

 

किती वेळा सांगितलंय तुला कि, शाळेत जायच्या एक दिवस आधीच आपलं दप्तर सांच्याला भरून ठेवत जा, डोस्क्यात जात का न्हाय तुझ्या.. व्हय कि आई विसरलो म्या, तोंड छोट करत आणि नाकाचा शेंडा वर करत प्रतिउत्तर दिले.. आई असं वागणं साहजिक आहे कारण माझे नेहमी सकाळी उशीरा उठणे हे तिच्यासाठी काही नवीन नव्हते, परिस्तिथी नाजूक असल्यामुळे आई ने मला नवीन दप्तर घेता दादा दप्तर दिले जे एका बाजूने फाटले होते त्याला ठिगाळ लावून बसवलेलं होते ,दप्तराच्या चैनीने तिचा शेवट चा श्वास वर्ष आधीच घेतला होता त्यामुळे तिच्या जागी ते पिना लावण्यात आल्या होत्या, मी सुद्धा कोणती हि तक्रार करता जल्लोषाने आणि उत्साहाने शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करायला निघालो,आई ची करंगळी मी उजव्या हाताने पकडून चालत होतो शाळेत पोचल्यावर जस मला सगळं वेगळंच वाटलं असं कि हे सगळं आपल्या साठी बनलेच नाही आणि आपलं काही इथं व्ह्यच नाही, या विचाराने मी निराशा व्यक्त करू लागलो, हुशार विद्यार्थ्यांप्रमाणे पहिल्या बाकावर बसण्याची संधी मला नको होती, शिक्षकांच्या नजरे समोर नजर भिडवून मुद्दा समजून घेण्याची माझी हिम्मत नव्हती म्हणून, आपण मागच्या बाकावरच बसायचं हे ठरवून मी आलो होतो. एक शिक्षक आम्हाला सगळे विषय शिकवायचे त्यामुळे शिक्षकांबद्दल जास्त प्रेम आणि लळा वाढावा असा माझा बिनचूक विचार होता, अभ्यास करायचा, मोठं माणूस बनायचं हे शब्द घरोघरी कानावर पडणे हे नवीन नसत, तसाच माझ्या बद्दल हि हेच विचारसरणी अमलात यायची, पहिली ते सहावी चांगल्या गुणांने उत्तीर्ण होणारो मी माझ्या घरातला पहिलाच व्यक्ती, एखाद्या हुशार मुलासारखा अभ्यास करावा अगदी तसाच, या अगोदर माझ्या भावंडांपैकी कोणीच इतकं चांगलं कौशल्य दाखवू शकलं नाही, अतोनात मला माझा अभिमान वाटत होता आणि मी स्वतःला खूप हुशार समजू लागलो होतो पण ते मात्र तेवढ्या पुरतच या पुढील प्रवासाबद्दल ची जणीव मला नव्हती, आणि हे विचार माझे बदलतील याची मला कल्पना मात्र नव्हती....

काय करतोयस तू असा का बसला आहेस या बाकावर, चल लवकर आज आपला शेवट चा दिवस आहे या कॉलेज मध्ये आणि तू असा विचारवंता सारखा बसला आहेस... मयुरी बोलली , मयुरी हि माझी कॉलेज काळातील सर्वात चांगली मैत्रीण, रंग सावळा, डोळे घरे, कपाळाच्या मधोमध छोटी टिकली, चेहऱ्याला शोभेल असा नाकाचा शेंडा, गुलाबाच्या पाकळी ओठ आणि त्यावर लिपस्टिक म्हणजे सोने पे सुहागा असच म्हणावं, सतत पंजाबी ड्रेस मध्ये असणारी, असा तिचा पूर्ण परिचय.. हो. आग येतोच बोलून मी तिला उत्तर दिले आणि थोड्या वेळात जाऊन आलो असा निरोप दिला आणि ती मैफिल सोडून कॉलेज गेट बाहेर एका पान टपरी वर गेलो, गरम चाय घेतली आणि बाहेर असलेल्या टेबल वर बसलो, चाय चा एक घोट घेतला आणि विचार त्याच शाळेच्या वेळेत मग्न झाला...

 

वर्ग आणि शिक्षक बदलले गेले, इयत्ता सातवी तुकडी , हा आमचा वर्ग सर्व बदलले पण मित्र मात्र तेच होते, तुषार हा माझा जिवाभावाचा मित्र अगदी गरजेला हाक देणारा तो हि आमच्याच ग्रुप मधला एक, रवी, जय, अक्षय, आणि विवेक असा माझा मित्र वर्ग, तुम्हाला माहीत असेल प्रत्येक ग्रुप मध्ये कोणी ना कोणी असा व्यक्ती असतो जो सर्व ग्रुप चे मनोरंजन करतो आणि बकरा बनतो असाच आमच्या ग्रुप मधला आमचा एक मित्र किशोर, पहिल्या बाकावरून ते शेवटच्या बॅकपर्यंत चा आणि अभ्यासू व्यक्ती पासून ते मस्तीखोर पर्यंत चा प्रवास मी कधी गाठला मला समजलेच नाही.

शाळा भरली, आणि कानाला तीक्ष्ण आवाज येईल अशी शाळेची घंटा वाजू लागली, बाहेर उभे राहणारे आम्ही सर्व वर्गात आलो, पहिला मराठी चा तास चालू झालेला, नेहमी प्रमाणे पुस्तके घरी विसरणे हे माझं काही नवीन नव्हतंच खरतर. सरांनी पुस्तके काढायला सांगितली आणि त्यांनी स्वतः शिकवायला चालू केले, "धडा पहिला "विसरभोळा गोकुळ" आणि सरानी व्हाचण्यास सुरुवात केली, वाचताना आम्ही पुस्तकात बागायचं आणि मधेच कोणाला पुढील ओळ वाचायला लावली तर वाचावी असा सरांचा स्वभाव, पुस्तक नसल्यास मी तुषारला एका बाजूने मान खाली ठेऊन गुढगा मारला आणि बोललो .. भावा पुस्तक असेल तर दे माझ्याकडे नाहीये, त्याने काही बोलता मान हलवत बॅगेत हात टाकला आणि पुस्तक कडून दिले, हसू आवरता आवरत नव्हतं कारण त्याने मला इंग्लिश चे पुस्तक काढून दिल होत बाह्यपृष्ठ (पुस्तकांची पाने त्याचा कलर) हे मराठी च्या पुस्तकांप्रमाणेच दिसत असल्या मुळे त्यात काही वेगळेपना जाणवत नव्हता , अगदी नजरेचा धोका जर कोणी लांबून बागेल तर, इतकाच नाही तर त्याने सुद्धा इंग्लिशच पुस्तक ठेवलेले, पुस्तक जुने असल्या मुळे पुस्तक हे दोन भागात विभाजित झालेले होते ज्याचा एक भाग माझ्याकडे तर दुसरा तुषार कडे होता, सरांचे लक्ष आमच्या कडे गेले आणि माझा जीव गेला अस वाटलं कारण त्यांनी मला उभाराहून पुढील ओळ वाचायला लावली, माझी तर फजितीच झाली कारण , नजरे समोर इंग्लिश चे पुस्तक आता काय वाचायचं आपण, दगड..अतोनात हसत होतो " वाच म्हणलेले समजत नाही का तुला सरांनी आवाज दिला, मन खाली करूनच मी विचारात पडलो तेवढ्यात सरानी माझ्या जवळ येऊन ते पुस्तक पहिले आणि तेच पुस्तक माझ्या डोक्यात घातले, प्रचंड कणखल्या आणि पाठीवरती बुक्क्या खाऊन मी एका तांबटयाला लाजवेल इतका लाल झालेलो, मित्र वर्गांनी हसण्याचा चांगलाच वेग धरला होता मात्र मी या हसण्याचं कारण बनून एकटाच गंगा जमूना डोळ्यातून वाहत होतो....

 


चाय गरम आणि चविष्ट होती, जगात किती पण मोठा होऊ पण जी रस्त्यावर च्या चाय ची चव आहे ती कोणत्याच हॉटेल मध्ये नाही हे मला समजले होते, शाळेतील झालेल्या प्रत्येक आठवणी मी या चाय च्या माध्यमातून जागवण्याचा प्रयत्न करत होतो दूर, थंड होऊ नये म्हणून मी चाय चा दुसरा घोट मारला...

 

आठवी चा वर्ग आम्ही वर्ग जरी बदलला तरी तुडकी, आणि मित्रवर्ग हा तोच होता, तुम्हाला आठवत असेलच प्रत्येक वर्गा मध्ये एक वर्ग मंत्री असतो, ज्या सोबत दोस्ती चांगली ना दुश्मनी, पण मी आणि तुषार ने दोनीही करून घेतली होती, मराठी चा तास झाल्यानंतर आमचा इंग्लिश चा तास चालू होणार होता, सरांची तब्येत खराब असल्याने ते तर काही येऊ शकले नव्हते, पण त्याजागी बाजूला असलेला वर्ग त्यातील शिक्षक आमच्या वर्गात आले आणि वर्गमंत्री ला सुचवलं कि जो जास्त मस्ती करेल त्याची नावे फळ्यावर लिहावी, तास नसल्यामुळे तुषार ची बडबड कधी मस्ती मध्ये बदलली समजलंच नाही एवढंच नाही तर फळ्यावरती आमची नवे लिहून आमच्या नावापुढे स्टार (*) करण्यात आले तुम्हाला जार माहिती नसेल तर मला सांगायला आवडेल स्टार(*) म्हणजे अति मस्तीखोर ची ओळख, आणि ज्याला स्टार केला तो मेला हे सर्वाना माहिती होत. आमचा वर्ग हा गटाराच्या लाईन जवळ असल्यामुळे कीटक फवारणी (धूर वाला) करणारा हातामध्ये मशीन घेऊन जागोजागी धूर सोडत असे तसेच वर्गात हि सोडत, वर्गात धूर सोडल्यास पूर्ण अंधक झाले होते, मी आणि तुषार ने आधीच प्लॅनिंग केलेली कि किशोर म्हणजे आमच्या ग्रुप मधील बकरा याचे डोळे बंद करायचे आणि बेदम मारायच धूर आत आला आणि त्याचे डोळे बंद केले प्रचंड हात त्याकडे धावत आले आणि त्याला पूर्णतः रडकुंडीला आणले, धाव काढत तो पुढे म्हणजे सरांच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि काही तरी पुटपुटत बोटाचा इशारा आमच्याकडे दर्शवला, सर हे चांगले होते म्हणून आम्हाला मारलं नाही तर आमची नवे एका डायरी मध्ये लिहून घेतली आणि ती नवे सरळ मुख्याध्यापक ला दिली, तेव्हा पासून आठवी पूर्ण वर्ष हे जस गुन्हेगार पोलीस स्टेशन मध्ये हाजरी द्यायला जातो तसेच आमच सुद्धा काही मस्ती केली तर मुख्याधापक च्या ऑफिस मध्ये शिक्षा भोगण्यात, कोंबडा बनण्यात, मार खाण्यात गेलेलं...

 

आता बोटांना चटके लागणे कमी होऊन चाय थंड असल्याचे संकेत देत होती, चाय पीता पिता जुन्या गोष्टींचा पिक्चर माझ्या नजरेसमोर अतिशय वेगाने धावत होता...

 

आता आम्ही इयत्ता दहावी मध्ये होतो, म्हणे शाळेचे शेवट चे वर्ष तसेच काय तरी, शाळेमध्ये साइन्डॉफ ठेवण्यात आलेला, सर्व विद्यार्थी वर्गाने चुकता त्यात आनंदाने भाग घेतला , सातत दोन वेण्या घालण्याच्या मुली आज खेळत्या केसांमध्ये अतिशय सुंदर दिसत होत्या, रुपेला साजेल अशी साडी त्यांनी घातली होती वाऱ्यामुळे उडणारे केस त्यांच्या रूपचे सौन्दर्य वाढवत होते, मुलांचा देखील चांगलाच पेहनावा होता,एकाच कलर चे चेक्स शर्ट आणि खाकी पॅन्ट मध्ये दिसणारे मुले आज, घडी दुमडलेले जीन्स, पॅन्ट आणि शर्ट , जशे आज आई कडून कपाटाची चावी घेऊन कपडे काढून घातले असावेत असा त्यांचा वेष, नेहमी प्रमाणे केस चापटी, तेल लावून उजव्या साईड ला भांग पडणारी मुले मात्र आज जेल आणि वॅक्स लावून अगदी हिरो बनूनच आलेली, माझा देखील त्याच प्रमाणे काही पेहनावा होता. कार्यक्रम चांगल्या पाने पार पडला गेला, एक दिवस अगोदरच आमच्या ग्रुप ने फोटोग्राफर ला ऍडव्हान्स बुकिंग देऊ केली होती, शेवट ची आठवण म्हणून फोटो सुद्धा काढण्यात आलेलं ते सुद्धा आंम्ही मार खाल्लेल्या सरांसोबत. सर्वे जण खूप खुश होते, आनंद आणि विनोद चा खळखळाट होत होता सर्वे जण एकमेकांसोबत कोणतीही बांधिलकी नसल्या सारखे बोलत आणि हसत होते, पण कोणाला काय माहीत कि हा तोच दिवस आहे जिथून सर्वांची वाटचाल हि बदलणार आहे, शाळेतून बाहेर पडताच सर्वांची दिशा वेगळी होणार आहे, मुलांना हे खूप उशीर झाला समजायला पण मात्र आमच्या वर्गातल्या मुली खूप हुशार होत्या, ते बोलतात ना मुलिना फीलिंग्स खूप जास्त असतात, शेवटच्या क्षणी आम्ही आनंदात होतो कि आज पासून आपण या शाळेच्या चार दीवरी पासून मुक्त झालोय पण मुली मात्र या काही वेगळ्या विचारात होत्या, त्यांचं रडणं हे आम्हाला समजलं नाही, प्रयेक मुलीच्या डोळ्यातून अश्रू येत आम्ही मुले बगत आणि खिल्ली उडवत होतो...

 

ग्लास हातातून कळत सुटला आणि खालच्या फर्शी वर जाऊन ठप्प.. करून आदळला, विचारांच्या मैफिलीत मी इतका गुंग झालेलो कि माझं मलाच काही जाणवलं नाही, सॉरी काका मी याचे पैसे देतो माफी असावी..चाय मालकाला छोटा तोंड, दोनीही भुवया जोडून मान हलवत उत्तर दिले, आणि झालेले पैसे देऊन मी बाहेर पडलो. आणि कॉलेज मध्ये चालू असलेल्या मैफिली मध्ये शामिल झालो. कॉलेज संपले आणि कार्यक्रम सुद्धा सर्व जण घरी परतले पण कोणाच्या डोळ्यात अश्रू नव्हते ना कोणाच्या बोलण्यात दुःख होत, असा मोठा फरक मला त्या दिवशी जाणवला, एका खांद्यावर बॅग अडकवली आणि दुसरा हात खिशात घालून मी माझ्या घरी परतण्याचा रास्ता निवडला, मयुरी आनि कॉलज चा मित्रपरिवार सुद्धा घरी गेली होता आणि आता मी सुद्धा चाललो होतो, जाताना मान खाली ठेऊन चालत चालत मी विचार करत होतो कि कॉलेज मध्ये आपल्याला प्रचंड मित्र परिवार भेटतात खूप ओळखी वाढतात पण शेवटी बोटांवर मोजण्या इतके माणसे आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असतात,आपल्या सोबत शेवट्पर्यंत्न असतात, मात्र शाळेचं तस नाही शाळे मधील असलेले प्रत्येक मुले यांचा कॉन्टॅक्ट आपल्याशी फार जुना असतो आणि तो सतत होत असतो, कॉलेज लाईफ मध्ये आपल्याला फ्रीडम भेटतो पण शाळेच्या चार बंद भिंती मध्ये जी मजा होती ती या फ्रीडम मध्ये सुद्धा नाही, शाळेमध्ये झालेल्या प्रत्येक वाईट चांगल्या गोष्टी, मस्ती , लास्ट बेंच, चाय,हे सगळं मला आठवू लागलं, मान वर उचलून दीर्घ श्वास आत घेतला आणि हळुवार सोडला आणि बोललो ... दिस इस लाईफ.....!

 


(वरील घटना हि पूर्णतः सत्य आणि माझ्या आयुष्याशी निगडित आहेत, पण नावे बदलण्यात आलेली आहेत याची नोंद घ्यावी )

 

तर मित्रानो, तुम्हाला काय वाटत शाळेतील दिवस यादगार होते, कि कॉलेज मधील मला कंमेंटमध्ये नक्की तुमचे विचार सुचवा 

आपलाच,

समिर चंदनशिवे

 

Post a Comment

0 Comments