ती संध्याकाळ ! Part :१



      
  आज आकाश शाळेतून लवकरच घरी आला , घरामध्ये आकाश हाच सर्वात लहान आणि त्याची १ बहीण जी तिच्याहुन 2 वर्षांनी मोठी होती. आकाश इयत्ता १० वी मध्ये शिकत असून तो अभ्यासात सामान्य मुलांपेक्षा जास्त च गंड होता , वर्गात देखील त्याची चेष्टा करायला मुली पण मागे पुढे विचार नव्हती करत , सकाळी शाळा आणि शाळा सुटल्यावर घर या दोन गोष्टी त्याच्या जीवनात होत्या , रंग सावळा , डोळे घरे आणि दाट भुवया , कुरळे केस असा आकाश चा अवतार .
     घरी आकाश वर जीवापाड प्रेम करणारी त्याची आई , मस्करी करणारी पण खूप प्रेमळ अशी तिची  बहीण प्रिया आणि रागीट पण उत्तम विचार मांडणारे त्याचे वडील अशी त्यांची फॅमिली होती. आकाश चे वडील पोस्टमन असून ते अतिशय आतल्या विचाराचे होते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी काही तरी टेन्शन जाणवत .
         संध्याकाळ ची जेवणाची वेळ होती , नेहमी प्रमाणे संध्याकाळी ८:१५ ला त्यांचे जेवण होत असे .झोपायची वेळ झाली होती आकाश आणि त्याचे वडील हे दोघे सोबत झोपत असे आणि प्रिया व तिची आई आपल्या रूम मध्ये वेगळे झोपत असत. आपल्या वडिलांच्या तोंडावर आज काही जास्तच टेन्शन व काही तरी विचित्र आकाश ला जाणवलं , आकाश आणि त्याचे वडील यामध्ये जास्त आपलेपणा नव्हता आकाश आपल्या वडिलांशी बोटांवर मोजण्या इतक्याच गोष्टी सांगत आणि त्यांच्या वडिलांचं पण देखील काही असाच स्वभाव होता . "आज पप्पा जास्तच कोणत्या तरी गोष्टी चा विचार करत आहेत हे नक्की" असा आकाश ला वाटू लागलं, न राहवत आकाश ने त्यांच्या वडिलांना विचारले " काय झालं पप्पा , तुम्ही आज काही जास्त टेन्शन मध्ये आहेत असे वाटत आहे " आकाश च्या वडीलांनी मान हलवत आणि डोळे बंद करून "काहीच नाही बेटा" असे उत्तर आकाश ला दिले . आकाश ने देखील " हो ! , ठीक आहे " बोलून विषय संपवला .
        आज दिनांक २ एप्रिल होती आणि रविवार असल्या मुळे फॅमिली मध्ये चौघे ही आज घरी होते, सदानकदा विचित्र स्वभाव आणि रागीट असलेले आकाश चे वडील मात्र आज जाम खुश होते , आकाश आणि बाकीच्यांना पण हे बागून आश्चर्यकारक धक्का बसला , मनामध्ये विचार चालू झाले की आज यांचा स्वभाव एवढा हसमुख आणि दिलखुलास कसा काय झाला , आज चा दिवस हा त्यांच्या फॅमिली मध्ये खूप मजेदार आणि गमतीशीर गेला .
संध्याकाळी ८:०० च्या सुमारास नेहमी प्रमाणे जेवण करून झोपण्याच्या तयारी ला लागले , आकाश आणि त्यांच्या वाडीलांमध्ये आज खूप काही बोलणे झाले होते जे आज पर्यंत कधी नव्हते झाले , आकाश आणि त्याचे वडील खूप काही गोष्टी शेअर करत होते . आकाश च्या घरामध्ये २ वॉशरूम होते पण त्यातील १ वॉशरूम खूप वर्षांपासून बंद होते , "या वॉशरूम मध्ये घरातील कोणीही व्यक्ती जाणार नाही"  अशी ताकीद आकाश च्या पप्पानी सर्वांना दिली .त्या वॉशरूम ला बाहेरून १ कुलूप देखील लावून ठेवलं होतं आणि त्याची चावी त्यांच्या वडिलांकडे असतं.
आज त्यांच्या वडिलांचा खुशमीजाज स्वभाव बागून आकाश ने त्यांना खूप वर्षांपासून न विचारलेला प्रश्न विचारला "पप्पा त्या वॉशरूम ला तुम्ही कुलूप का लावले आहे " हा प्रश्न ऐकताच  आकाश च्या वडिलांवर जणू आभाळ च कोसळलं त्यांच्या चेहऱ्यावर चे हावभाव देखील १ का क्षणा मध्ये रागीट स्वरूपात बदलले " तू आजून लहान आहेस तुला समजण्या सारख्या गोष्टी नाहीत त्या , आणि तुला ते जाणून घ्यायची गरज नाही , समजलं काय !"आख्या प्रकारे आकाश ला पप्पाने बजावून लावले, मान डोलवत आकाश ने पण "सॉरी पप्पा" बोलून क्षमा मागितली.



            मध्य रात्री चे २:४५ झाले होते , पण आकाश ला आज काही झोपण्यात रस लागत नव्हता " नेमकं काय असेल त्या बंद वॉशरूम मध्ये " हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याला आज झोपून देत नव्हती. शेवटी आकाश ने छातीवर दगड ठेऊन वॉशरूम मध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा निर्णय घेतला . अतिशय चालाकीने व काळजीपूर्वक त्याने वडिलांच्या पँटीच्या खिश्यातली चावी काढली आणि टाचेवर चालत न आवाज करता तो त्या बंद वॉशरूम जवळ पोहोचला , वेळ न घालवता आणि आरामशीर त्याने कुलूप ला चावी लावली आणि कुलूप खोलला , कडी खोलून तंय दरवाजा आत ढकलला आणि बघितले की तिथे १ मोठी बॅग आहे , आणि ठीक बॅग च्या बाजूला १ रक्ताने भरलेली करवत होती , ते बगून आकाश ला ती बॅग खोलायला भीती वाटू लागली , पण आता बॅग मध्ये काही तरी वाईट आहे हे त्याच्या लक्षात आले न वेळ घालवता त्याने बॅग खोलून बघितलं तर आकाश च्या पाया खालून जमीन सरकली , त्याच्या कपाळावरून घामाचे थेंब येऊ लागले डोळे मोठे झाले आणि श्वास देखील खूप वाढला होता , त्याच्या हृदयाची धक धक वाढली आणि त्यांनी बॅग तशीच बंद करून वॉशरूम ला कुलूप लावले , आकाश अतिशय घाबरला होता कारण त्या बॅग मध्ये बाकी काही नसून १ मुलीची कट केलेली बॉडी होती , डोक्या पासून ते पायांच्या बोटांपर्यंत प्रत्येक अवयवाचे तुकडे त्या बॅग मध्ये जमा करून ठेवले होते,  हे काम त्या करवतीने च केले असणार हे त्याच्या लक्षात आले . "आपल्याला जर अश्या अवस्थे मध्ये कोणी पाहिले तर वाट लागेल" ह्या विचाराने तो लवकरात लवकर आपल्या जागेवर जाऊन झोपायला गेला आणि वॉशरूम ची चावी पप्पांच्या खिश्या मध्ये जशी च्या तशी टाकली , पप्पानी के का केलं असावं याचा त्याला मोठा धक्का बसला होता , अक्षरशः तो रडायला लागला होता , ती रात्र  आकाश साठी खूप मोठी ठरली ,रात्र भर विचार करून तो झोपू शकला नव्हता . त्याच्या सारख्या सर्वसामान्य माणसाने विषय संपवण्या च्या ऐवजी याच्या खोवर जायचा विचार केला , आता सकाळचे ७:०० वाजले होते आकाशचे पप्पा लवकर कामाला जात , आकाश पण शाळेच्या तयारी ला लागला होता ,मात्र त्याला त्याचा रुमाल भेटत नव्हता , तेवढ्यात त्याला त्याच्या जीवनातली सगळ्यात मोठी चूक समजली जेव्हा त्याला आठवले की घाई मध्ये त्याने त्याचा रुमाल त्या बॅग जवळच पाडला होता.....




To Be Continue

Post a Comment

0 Comments