पाचवा माळा.. भाग 2

Add caption

 

वा माळा...                                                                   भाग ... 

 

स्वतःला सावरत होतो तेवढ्यात फट्ट...! करून एक जोरदार, कानांच्या पडद्याला भेदेल असा आवाज आला तो त्या लिफ्ट मधला बल्ब होता, माझ्या डोळ्याला अंधार पडावा इतका अंधार त्या लिफ्ट मध्ये झाला तरी सुद्धा लिफ्ट च्या दरवाजे च्या कोपऱ्यामधून हलकासा उजेड येत होता आणि तो लिफ्ट मधल्या गोष्टी चा एक अंदाज बांधता येईल एवढा पुरेसा होता, लिफ्ट मधील बटणे मी चापचत होतो, अचानक रक्ताचा एक थेंब माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्या वर पडला, माझी दशा खूप दयनीय आणि भित्री झालेली होती, कपाळ घामाने भरले होते ते मी माझ्या उजव्या हाताच्या अंगठ्याने पुसले तर त्या सोबत अंगठ्याला रक्त सुद्धा लागले गेले, कारण माझ्या कपाळावर ते काचेचे तुकडे घुसले होते आणि त्यामुळे त्या जागी गंभीर जखम झाली होती त्या जखमेतून रक्त प्रवाह होत होता आणि हेच रक्त माझ्या शर्टावरून घसरत माझ्या पायावर पडत होते, वेदना असहनीय झालेल्या, मी स्वतःला सावरत लिफ्ट उघडण्य चे बटन माझ्या उजव्या हाताच्या बोटाने चापचचू लागलो भीती पोटी मला समजत नव्हते मी कोणते बटन दाबत होतो पण काही हि करून या लिफ्ट मधून बाहेर निघालो नाहीत तर आज आपला शेवटचा दिवस ठरेल हे सत्य नाकारलं जाऊ शकणार नाही, माझ्या हृदयाची धड-धड वाढत होती त्या प्रमाणे मी लिफ्ट ची बटणे कडा-कड दाबत होतो कारण माझ्या कडे दुसरा काहीच उपाय नव्हता, तेवढ्यातच अचानक माझ्या छातीवर थाप पडली आणि मी लिफ्ट च्या कोपऱ्यामध्ये जाऊन जोरात आदळलो, थाप एवढी जोरदार होती कि जसा माझ्या छातीचा पिंजरा (बारकाड्या) अतोनात तुटला असेल अशी होती , झालेल्या वेदना असहनीय होत्या आपण आता काही हालचाल नको करायला असं मी मनाशी बोलत माझे दोनी हि पाय गुढग्या सोबत दुमडले आणि पोटाशी आणून चिपकवले आणि दोनी हाताने ते पडकून बसलो.

 

२० मिनिटा नंतर ... मी माझी मान खाली घालून बसूनच होतो मी इतका घाबरलो कि माझी मान वर करण्याची देखील हिम्मत होत नव्हती कपाळातून निघणाऱ्या रक्ता मुळे माझे शर्ट पूर्ण भिजले होते आणि छाती मध्ये खूप जोरात काळ मारत होती वेदनांचे वादळ माझ्यात चाललेलं होते तेव्हड्यात दरवाजा उघडण्याचा आवाज माझ्या कानावर पडला, मी माझे डोके हळू वर उच्चलले आणि मान वाकडी करून डाव्या डोळ्याने समोर पहिले तो लिफ्ट चा दरवाजाच होता आणि तो आता उघडला होता, संधी चा उपयोग करता मी दीर्घ श्वास आत घेतला आणि एका झटक्यातच बाहेर उडी मारली आणि बाहेर पडलो, आजू बाजू ला पाहिलं तर अंधार होता पण आता घरांचा एक अंदाज घेता येईल एवढा उजेड होता काही विचार करता आणि आपला जीव वाचवण्या साठी कोणाच्या तरी घरी जाऊन त्यांना झालेल्या घटना सांगायच्या आणि मदत मागायचा विचार केला तेवढ्यात माझी नजर समोर असलेल्या एका घराकडे गेली धावत रक्ताने लाथपथ मी पळत होतो पण तिथे जाऊन माझ्या पाय खालची जमीन सरकली कारण त्या रूम च्या दरवाज्याला टाळा होता, आता आपले काही खर नाही, हि आत्मा आज आपला खून करून राहनार हे ठरलं होत ते हि साधा सुद्धा नाही तर तडपवून जसा त्या लिफ्ट मधल्या माणसाचा केला होता, तेवढ्यात माझी नजर तिथल्या पायदानावर पडली...जेव्हा आपण मरणाच्या टोकावर असतो, तेव्हा आपल्या समोर खूप सारे सिन फ्लॅशबॅक सारखे डोळ्यावर पटा -पट चालत असतात तसाच खूप साऱ्या चित्रपटात दाखवल्या प्रमाणे पायपुसणी खाली चावी असलेली मला आठवू लागली, तसेच मी ती माझ्या उजव्या हाताने पायपुसणी उलटली तर त्या खाली एक चावी होती, मी खुश झालो आता आपला जीव वाचू शकतो कारण हि तीच चावी असावी हा समज घेत मी ती चावी उचालली आणि टाळ्याला लावली, मन मधे उम्मीद ची किरण जागली कारण तो टाळा खुलला होता आणि मी वेळ घालवता त्या घरात घुसलो आतून काडी लावून घेतली.

डोळे बंद करून मी मोकळा श्वास घेतला आणि डोळे उघडत श्वास सोडला पाहिलं तर त्या घरात पूर्ण काळोख होता, काहीच दिसत नव्हतं पण हाताने एक अंदाज येत होता, हालचाल करता मी तिथेच खाली बसून गेलो आणि विचार केला कि आता सकाळ होई पर्यंत इथे वेळ काढावा लागेल वेळेचा अंदाज नव्हता पण कदाचित वाजून गेले होते अजून तास काढायचे हाच विचार करत बसलेलो, आणि मला झोप कशी लागली हे माझं मलाच समजलं नाही...

 

३० मिनिटं नंतर... कानाला ऐकू येईल असा एका बाईचा रडण्याचा आवाज माझ्या कानाला आला आणि माझी झोप उडाली, हा काय प्रकार असावा मी विचार करत बसलो कदाचित बाजूच्या रूम मधून येत असेल, मिन नंतर पुन्हा तसाच बाईचा रडण्याचा आवाज आला हा आवाज खूप कर्कश आणि जवळ असल्या सारखा होता, हळू हळू पैंजण चा आवाज आला आणि रडण्या चा आवाज बंद झाला पैंजण चा आवाज हळू हळू वाढत होता आणि माझे शरीर पूर्ण पने थंड पडले होते शिवाय घामाघूम झालो होतो जेव्हा मला हे कळलं कि तो पैंजण जा आवाज आपल्या जवळ येऊन बंद झालेला आहे, जवळपास कोणी आहे का नाही मला समजत नव्हतं पण अतोनात कोणी तरी आहे याचा भास मला होत होता हे विचार मी करत होतो तेवढ्यात माझ्या तोंडावरती एक प्लास्टिक चा डब्बा पडला आणि त्या डब्यातून लहान-लहान धारदार सुया माझ्या चेहऱ्याला भेदून आत घुसल्या होत्या, वेदनांचा कडकडाट उमगला आणि अतिशय जास्त रक्ताच्या धारा चेहऱ्यातून वाहत होत्या, आता मात्र मला हे समजून राहिले होते कि हे त्याच बाईचे घर आहे जिथे ती जळून मेली होती आणि हि आता माझा पण खून करणार हे नक्की होत, अंग पूर्ण सळसळत होत शरीराला बगावल्या जाणाऱ्या जखमांनी मी पूर्णतः भरलो होतो. पण मनाशी विचार केला आपण जर असाच हातावर हात धरून बसून राहिलो तर हि आत्मा मला जिवंत पने असहनीय वेदना देऊन ठार करेल, "नाही नाही ... मी असं होऊ देणार नाही, स्वतः च्या मनाशी बोलू लागलो, रक्ताने भरलेलो मी हिम्मत करून दोनी हि हाताने चापचत चापचत कुठे तरी कोपऱ्यात लपण्याच्या जागा शोधायला लागलो , टाचणी पडेल इतका आवाज देखील नाही आला पाहिजे याची खात्री मी माझ्याशी केली एखादी मांजर जशी चालते तसाच मी पायाचे तळवे टाकत चालत होतो. तेवढ्यात पैंजण चा आवाज हळुवार माझ्या कानावर पडू लागला होता आणि तो हळू हळू वाढत चालला होता आता काही खर नाही असा विचार करत मी माझा वेग वाढवला आणि मी एका छोट्या दरवाजा कडे पोचलो तो उघडा असल्या मुळे मी त्यात धुसलो आणि आत मधून काडी लावून घ्यायचा प्रयत्न केला पण नशिबाने साथ दिली नाही कारण ती काडी खराब झालेली आणि मी ज्या जागेवर होतो ते एक बाथरूम आहे हे मला समजलं, दरवाजाला पाठ करून मी दाबून धरलं पैंजण चा आवाज आला आणि तो बरोबर दरवाज्या च्या बाहेर येऊन थांबला, घामाने आणि रक्ताने भरलेली मी माझे पूर्ण हात पाय थंड झाले होते डोळे मोठे होऊन लाल झाले होते तेवढ्यात दरवाज्यावर एक जोरदार हादरा बसला "धंनन.. , तरी हि मी पूर्ण टाकत लावून तो दरवाजा पकडून बसलो होतो कारण हे कारण माझ्यासाठी अतिशय महत्वाचं होत, हळुवार पाने पैंजण चा आवाज दूर झाला आणि अस वाटलं कि आता हि आत्मा आपल्या दरवाजा पासून लांब गेलेली आहे, मोठा श्वास आत घेतला आणि विचार केला कि आता पुढे काय करावं.

 


अंधाऱ्या खोलीत चापचत चापचत मी असा अंदाज घेतला कि या बाथरूम मध्ये वर पाण्याची टाकी आहे उंचीने सुनंदा ती ते फूट असावी, वेळ घालवता मी असा विचार केला कि आपल्याला जर वाचायचं असेल पुढे जग बागेचे असेल तर आपल्याला या टाकीत लपून बसण्या शिवाय दुसरा पर्याय नाही, डावा पाय उचलला, तिथे पाण्याचा पाईप होता त्यावरून वर जायचे होते,मी माझा पाय त्यावर ठेवला आणि उजव्या हाताने भिंतीचा आधार घेतला टाकी जवळ पोहोचलो, टाकी हि लांब होती तशीच मोठी सुद्धा पण यात पाणी किती असावे याची कल्पना मात्र नव्हती ते जाणून घ्या साठी मी वरून टाकीचे झाकण उघडले आणि त्यात उजव्या बाजूने पाय टाकून अंतर मोजले तर ते माझ्या, जर आपण बसलो तर गुडघ्या पर्यंत पाणी लागेल असं होत मी पटकन त्या टाकीत गेलो पाणी माझ्या विचारा पेक्षा जास्तच थंड होते मी गुढगे समेटून बसून गेलो, रक्ताने भिजलेलो मी पूर्णपने आता पाण्यात होतो आणि माझी मान फक्त वर होती टाकी उंच असल्या मुळे मला जास्त त्रास झाला नाही टाकीचे तोंड हे माझ्या पासून फुटावर होते, आज ची रात्र कशी तरी काढू या जागी परत कधी येण्याची शप्पत मी स्वतःशी एका गुन्हेगार असल्या सारखी खाल्ली.

 

३५ मिनिटा नंतर... माझा डोळा कधी लागला हे मला समजले नाही, मला अचानक जाग आली कारण कोणत्या तरी बाई चा पुट-पुटन्या चा आवाज माझ्या कानावर पडला मी माझ्या दोनी हि हातांचे तळवे माझ्या तोंडावर ठेवले आणि शांत राहण्याचा प्रयत्न केला जराही हालचाल करता मी ऐकण्याचा प्रयत्न करत होतो कि नक्की काय बोलणं चालू आहे, माझे पूर्ण अंग थरथरत होते पुढे काय होणार या विचारात मी अक्षरशः रडत होतो तेव्हाच त्या बाईच्या पुटं-पुटंण्याचा आवाज अतोनात संभाषना मध्ये बदलला होता, मला हे समजले होते कि हि तीच आत्मा आहे आणि हि काही तरी बोलत आहे तिचा आवाज आता खूप स्पष्ट पने येत होता "तू मला जिवंत जाळलं होतास ना, तेव्हा मला कोणी वाचवायला नव्हतं आलं मी या बिल्डिंग मध्ये असलेल्या सगळ्या माणसांना मारून टाकणार" तिचा हा आवाज मला पूर्ण पने ऐकायला आला , अंग थरथर कपात होत कारण, पैंजण सोबत दरवाजा उघडण्या चा आवाज आता बाथरूम मधून येऊ लागला, शांत राहण्या शिवाय माझ्या कडे पर्याय नव्हता काहीच हालचाल करता मी तिथेच पडून राहिलो आणि आपण असे केले तर काही समजणार नाही असं वाटु लागलं, बस थोडा वेळ अजून त्या नंतर आपण इथून पळून जाऊ असा मी माझ्या मनाशी बोलत होतो, पोटात गोळा आला जेव्हा टाकीच्या वरून मला पैंजण चा आवाज आला, आता मात्र काही खर नाही हि आत्मा आता टाकीच्या वर आलेली होती, जर ह्या आत्मा ने झाकण उघडलं तर आपण जिवंत वाचू शकणार नाही हे नक्कीच, पण माझं नशीब त्या दिवशी काही वाईटच होत तिने ते झाकण उघडलं मी डोळे बंद करून गुढग्या काली मन घालून बसलो होतो माझी हिम्मत वर बगण्याइतकी नेव्हती माझ्या आयुष्यातला हा अविस्मिर्निय आणि वाईट क्षण होता, तेवढ्या माझ्या डोक्यावर जोरदार एका रॉड ने जसा व्हावा तास वार झाला आणि मी त्याच पाण्यात धबाक...करून पडलो मी स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि पाण्यातून बाहेर येण्या चा प्रयत्न केला पण वरून एक हात माझ्या डोक्याला पकडून पाण्या मध्ये दाबू लागला माझा दम घुटत होता मला श्वास घ्यायला सुद्धा येत नव्हता अतिशय वेदनाअसून हि मी पाण्यात तडफड करत होतो पण त्याचा काहीच परिणाम होत नव्हता दोनी हि पाय आणि हात इथे-तिथे मारू लागलो पण नंतर हळू-हळू मी त्याच पाण्याच्या घटा घटा गटकळ्या खाऊ लागलो आणि माझे हात पाय शांत झाले , डोळ्या समोर अंधारी आली आणि मी शांत झालो.....

 

दिवस रा ... 

रूम च्या बाहेर खूप गर्दी जमली होती , मी पण विचार करत होतो कि एवढी गर्दी का झाली आहे या आधी असं कधीच झाले नव्हते, गॅलरी मधून बाहेर बगता मी पाहिलं कि एक ऍम्ब्युलन्स आणि एक पोलीस गाडी बिल्डिंग च्या खाली थांबली आहे, गर्दी झालेल्या ठिकाणी काही तरी वाईट आणि विचंबित घडलेले असावे अस वाटलं, काय नक्की जाणून घेण्यासाठी मी तिथे धाव काढली आणि पाहिलं कि एक बाई जोर जोरात रडत होती आणि बाकीची माणसे तिच्या कडे खूप दयनीय नजरेने पाहत होते, त्या बाई चा आवाज हा ओळखीचा वाटू लागला त्यामुळे मी पुढे जाण्याचे धाडस केले तर पहिले ती दुसरी कोणी नसून माझी आई होती जी खूप रडत होती मला काहीच समजत नव्हतं काय चाललं आहे पोलीस हे आतल्या रूम मध्ये असलेल्या बाथरूम जवळ होते आणि त्यांनी नाकाला रुमाल लावून ठेवला होता इथे असलेल्या एका ने टाकी वरती चढण्याचा प्रयत्न केला मी जवळ गेलो आणि पाहिलं कि नक्की काय आहे, माझ्या पाया खालची जमीन सरकली जेव्हा त्यातून एक बॉडी बाहेर आली, अतिशय रक्ताने भरलेली, डोळे पांढरे पांढरे,चेहरा काळा-निळा, चेहऱ्यावरती खूप वारं असेल ती बॉडी होती, मी जवळ जाऊन तो चेहरा पाहू केला तर माझे डोळे फिरले कारण ती बॉडी माझी स्वतः ची होती. पण मी ...? असा कसा...? इथे काय झालं..? मीच जर मेलो आहे तर मी जिवंत कसा...? डोकं दुखु लागले बाजूला असणाऱ्या पोलिसांना मी विचारण्या चा प्रयत्न केला पण माझ्या कडे कोणी लक्ष दिले नाही, आई कडे जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला पण ती हि देखील बघितल्या सारखं, मी समोर असून सुद्धा दुसरी कडे पाहत होती , आजू बाजू जमलेली माणसे सुद्धा माझे ऐकत नव्हते, माझे प्रयत्न हे वाया जात होते शेवटी माझे शरीर पूर्णतः गारठले जेव्हा मी समोर असलेल्या आरशात स्वतःला पहिले, कारण आरश्या समोर उभे राहून देखील मी स्वता ला पाहू शकत नव्हतो...सगळ्या प्रश्नांची उत्तरे एका झटक्यात भेटली कारण मला समजे कि आता आपण जे आहोत ती फक्त एक आत्मा आहे आणि जे खाली पडले आहे ती आपली बॉडी आहे आपण आता आपल्या शरीरा पासून मुक्त झालेलो आहोत...

 


समाप्त 

 

(कथा काल्पनिक आहे तर याचा कोणत्याही व्यक्ती शी किंवा कोणत्या हि जागेशी संबंध जोडू नये,)

 

धन्यवाद... आपला मौल्यवान वेळ देऊन स्टोरी पूर वाचल्या बद्दल अशेच जोडून ऱ्हावा, आणि आपली कायम साथ असू द्या अपलाच समीर चंदनशिवे... 

 

शेवट: मी तर वाचू शकलो नाही, पण तुम्ही वाचू शकता "शेअर" करा स्टोरी आपल्या मित्रांसोबत सुद्धा ..

 

Post a Comment

1 Comments