एक नातं असं ही ...!



एक नातं असं ही ...! 

नुकतीच १०वि चे पेपर देऊन निवांत असं बसलेलो होतो, परीक्षा तर झाली आता काय करयचं  याच भाकीत मात्र माझ्या मनात देखील पळत होत, अतिश्रीमंती नसलेल्या घरात लहानाचा मोठा झालेलो मी माझ्या घरातील परिस्तिथी पाहता एखादा जॉब शोधायचं ठरवलं, दहा आकडी पगार तर इतक्यात येन अवघड होतच पण सुरुवात करणे हे केव्हाही चांगलं असं माझं मत असायचं, मोठा भाऊ "संजय" हा त्या वेळेस एका कंपनी मध्ये डिलेव्हरी बॉय म्हणून कामाला होता दिवसाला हाजरी म्हणून रोख ३००/- रुपये हाजरी असा त्यांचा व्यवहार, मेडिकल च्या गोळ्या-बाटल्या त्या कंपनी मध्ये पॅकिंग होत आणि मोठं मोठ्या मेडिकल स्टोर पर्यंत त्यांना डिलेव्हरी बॉय मार्फत पोहोचवत, असा पूर्ण तक्ता त्या कामाचा होता, मोठ्या जम्बो थैली मध्ये भरून ते अंगाखांद्यावरून वाहत प्रत्येक मेडिकल मध्ये पायी चालत जायचे असायचे, शारीरिक दृष्ट्या भाऊ चांगला आणि दंडातक असल्या मुळे त्याला काही फारसा त्रास जाणवत नसायचा. कालांतराने मी सुद्धा ते काम शिकलो आणि करायला लागलो वय वर्ष फक्त १७ असून त्या कामाला न लाजण्याच मात्र एक कारण म्हणजे घरातील दाटिवाटीतुन संसार करणारी माझी आई, आणि दुसरा म्हणजे, हमाली करणारे माझे वडील. अगदी लहानश्या वयात देखील मला खूप काही जाणीव झाली होती, पुस्तकातल्या अभ्यसा पेक्षा माणूस परिस्तिथीतुन जास्त शिकत असतो हे मला समजले होते.

शारीरिक दृष्ट्या कमकुवत आणि हलकं शरीर असल्याने मला ती वजनदार गोणी अंगावर लादणे आणि पूर्ण एरिया मध्ये फिरणे याचा त्रास होत असायचा, रोज रात्री घरी आलो कि माझे पाय खूप दुखत आणि महत्वाचं म्हणजे उन्हातानाचं पायी चालता-चालता दोनी मांड्यांमध्ये घर्षण होऊन तिथे सुद्धा जळजळत, रोज मी मलम लावायचो सकाळी ते ठीक व्ह्यच आणि रात्री पुन्हा जसे होते तसेच, दुःख तर आहे पण शब्दवाहीनी ने त्याचा प्रचार घरी करण्याची माझी हिम्मत होत नसे, माझी आई नेहमी बोलायची आणि आज हि बोलते "आई च्या पोटाततून कोणी शिकत नाही, बदल हळू हळू घडणार आणि प्रत्येकाचे दिवस येणार". आईंच्या अशा विचाराने मला सतत प्रेरणाबळ भेटत होते आणि कदाचित मी ते काम त्या मुळेच करू शकलो असावं. 

एक दिवस असच विचार पडला आपण एवढं शिक्षण घेतलं, आपल्या आई वडिलांनि आपल्याला लहानच मोठं केलं, गरजा तर पुरवून देखील हट्ट हि पुरवले पण आपण काय केले आयुष्यात येऊन "हमाली" बस हेच का आपलं जीवन,हेच करण्या साठी मी जन्म घेतला आहे का.. अशा अनेक विचारांचे तुफान माझ्या मनात जोराने  घुमू लागले होते, आणि त्या दिवशी कामाला न जाता मी ऑफिस मध्ये जॉब ला लागायचं असं स्वप्न रंगवले, जेव्हा हे स्वप्न घरी सांगायचं ठरवलं त्या दिवशीच माझा गाल आईने रंगवला :D, मला माहिती होत कि आपण आधीचं काम सोडून पळत्याच्या मागे लागतोय पण प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे हे माझं ठाम मत असायचं, आईचे रागावणे हे साहजिकच होते आणि ते संजूनघेण्या सारखी मला कल्पना हि होती, आज आई रागवेल पण उद्या मी ऑफिस ला चांगले कापडं, बूट घातलेला पाहून ती अतोनात नक्कीच खुश होईल याची खात्री मला होतीच. 

अनेक नोकऱ्या ह्या न्युसपेपरच्या लास्ट च्या पानावर अतिशय लहान लहान बॉक्स मध्ये असायच्या, मला त्यापैकी एक नंबर भेटला, मी तिथे कॉल लावला, एका ठिकाणी त्यांचं नामांकित ऑफिस (Consultancy) होती, वेळ ना घालवता अगदी त्याच दिवशी मी आणि माझी आई त्याच्या ऑफिस मध्ये भेट द्यायला निघालो, त्यांनी मला एक कॉल सेंटर चा जॉब ऑफर केला, काही माहिती नसल्याने मी त्यांना होत म्हटलो, त्यांनी माझ्या कडून अगदी आपुलकीने रेजिस्ट्रेशन फीस ३५०/- ची  मागणी  केली :D , कदाचित त्या कंपनीला लागायचे पैसे असावेत असा माझा समज होता. 

नवी मुंबई मधेच त्यांची नामांकित अशी मोठी गाजलेली कंपनी प्रस्थापित होती, आयुष्यातला माझा पहिला Interview होणार होता, एखाद्या Interview ला कस जावं याचा अभ्यास मी मझ्या आजूबाजूच्या वातावरणातून घेतलाच होता, फॉर्मल पॅन्ट,शर्ट, शूस, आणि टाय हातात बायोडाटा आणि बाकीचे डोकमेण्ट असा काहीच अवतार माझा नव्हता :D , शर्ट हा आईने एकदा दिवाळीत घेतलेला होता पण तो फॉर्मल च्या पूर्ण विरुद्ध होता त्यावरती सफेद फुलं-पाकळ्याची नक्षी होती, फॉर्मल पॅन्ट नसल्यामुळे मी जीन्स घालनचं उत्तम समजलं, आणि आयुष्यात कधी शूस न घातल्यामुळे मी कधी ते विकत हि घेतले नव्हते, दादा शूस घालत असायचा पण ते सुद्धा थोडे फाटलेले होते, ते शूस घातल्याने माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्याने शूस बाहेर छोट्या फटीतून डोकावून हजेरी लावलेली होती :D , नाईलाजाने तेच शूस घालण्या शिवाय माझ्या कडे दुसरा पर्याय शिल्लक राहिला नव्हता, सायबर मध्ये जाऊन १०/- रुपयां मध्ये मी बायोडाटा काढला आणि Interview ला निघालो. ऑफिस जवळ मी पोहोचलो आणि बघितलं तर आकाशाला टेकेल अशी उंच इमारत होती ती, ते पाहताचक्षणी विचार पडला कि एवढ्या मोठ्या कंपनी मध्ये आपलं काही होईल याची काही खर वाटत नाही, मनात भीती तर होतीच पण प्रयत्न केला पाहिजे, येऊन जाउन हा विचार हि मनात होता, सर्वांचा अवतार हा खूप "नीट अँड क्लीन" असा होता, १० आंब्यानं मध्ये १ किडका आंबा दिसावा तसा मी त्यांच्यात उठून दिसत होतो, माझ्या अवताराने मला हि अनोळखी ओळख दिली होती, बाकीचे सर्व जण माझ्या कडे अतिशय दयनीय नजरेने पाहत आणि त्यांचा नजरेतून त्यांना माझ्या बद्दल चा आपुलकीपणा सुद्धा मला दिसत होतो, interview झाला स्वतः बद्दल, शिक्षण बद्दल आणि इतर काही गोष्टी बद्दल विचारपूस झाली, आणि वेटिंग रूम मध्ये आम्हाला बसवले, सुमारे १:३० तास नंतर एक व्यक्ती आला आणि त्याने जे जे मुले सिलेक्ट झाली त्याची नाव सांगितली, माझं नाव त्याने पुकारले आणि माझा आनंद गगनात मावळेनासा झाला, आता आपण व्यवस्थित जागी कमला लागलो आणि याची मला भावना अतोनात येत होती, हि बातमी आई ला सांगताच आई सुद्धा गहिवरली आणि अगदी मायेने मला जवळ केलं आणि बोलली "शाब्बास बाळा" तिचे हे शब्द ऐकूनच मी एकांतात गड जिंकावं अशी ख़ुशी होत होती. कालांतराने आमची ट्रैनिंग झाली आणि आम्ही आता काम करायला सुरुवात केली, त्या सोबत च मला समजले होते कि मला जे "रेजिस्ट्रेशन फीस" म्हणून जे पैसे भरवण्यात आले होते त्याचा आणि कंपनी ची एकही संबंध नसतो:D  .


कामाचा पहिला दिवस, खुप खुश असून मी तेव्हडाच नर्व्हस सुद्धा होतो कारण साहजिकच आपण अश्या कोणत्याच मोठ्या कंपनी मध्ये काम केल्या चा अंदाज मला नव्हता आणि मग अशे विचार मला पडणे हे साहजिक ठरत होते, मी आणि माझे ऑफिस चांगले झालेले मित्र आम्ही आमच्या सरांचे ऐकून तेथे काम करत असलेल्या जुन्या मुला-मुलींच्या मागे बसून काम कस चालत ते (budding) शिकत होतो, तसेच मला सुद्धा एका मुलाच्या बाजूला बसवले होते त्या मुलाच्या बाजूला एक मुलगी बसलेली होती त्या मुलाने तिला आवाज दिला "शुभ्रा" तिने त्याचा कडे पहिले आणि त्याचा बाजूला बसलेलो मी सुद्धा तिच्या कडे पाहू लागलो, तिची आणि माझी नजर एक झाली, नावाला शोभेल असा रंग, काळे घनदाट लांब केस आणि त्याची एक बट डाव्या कानाच्या मागून हळुवार गेलेली, पावसाच्या पानावरती पडलेले दव सारखी डोळ्यात चमक, गुलाबाला लाजवेल अशे ओठ आणि सुरेख समोरच्या दिशेने असलेले नाक, हे तिच्या पूर्ण चेहऱ्याची शोभा वाढवत होते. तिचे फ़क्त असे २ सेकंड माझ्या कडे बघणे ते मी आज पर्यंत भुललो नाही, एकाद्या ला बगुन आपलं माणूस असल्याची भावना प्रकट होते तशीच काही माझ्या मनात तिच्या साठी झाली होती, अगदी  हाताच्या बोटावर न मोजता येणार गुण तिच्यात होते म्हणून त्याच दिवशी आणि त्याच क्षणी मी मनाशी ठाम केलं कि आपल्याला जशी आपली जीवनसाथी हवी, जी आपल्या जवळ असावी, आपल्या सुख-दुःखात असावी, आपलंस म्हणणारी आणि हि तशीच होती. 

दिवसेन दिवस जाऊ लागले मी आणि शुभ्रा आता खूप चांगले मित्र झालो होतो, सोबत येन जाणं, इतकाच नव्हे तर सोबत बाजू-बाजूला बसणं, जेवणाच्या वेळेला सुद्धा सोबत जाणं, आता तिची मला प्रत्येक आवडी-निवडी अचूक माहिती होत्या, कदाचित तिला हि मी आवडू लागलो होतो, मी जेव्हा ऑफिस ला नसेल आलो तेव्हा ती सुद्धा कंटाळत असत आणि माझ्या बद्दल विचार करत, माझ्या कडून काही चुकलं तर नाकावरचा राग तिचा सौन्दर्याच अप्रतिम प्रचार करत, झटकनं  रागावणारी पण लगेच शांत देखील होणारी निर्मळ, प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाची शुभ्रा आता मला खूपच जवळची झाली होती आणि तिला सुद्धा मी. एखादा अविस्मरणीय प्रसंग सांगायचा म्हंटला तर... दरदिवशी बाजू बाजूला बसणारे आम्ही, एक दिवस अतिशय पाऊस पडत असल्या कारणाने, माझी नेहमी ची बस चुकली, या खेपेला मी वेळेवर पोहोचणार नाही हे समजले होते, जादा बस असल्यामुळे मला दुसरी बस भेटलीच पण जेव्हा मी ऑफिस मध्ये पाऊल टाकले आणि माझ्या जागेवर पहिले पाहताचक्षणी मला माझ्या जागेवर कोणी तरी बसलेलं असल्याची कल्पना झाली,या आधी हि खूप वेळा असं झालेलं होत पण मी बोलल्या नंतर ते मला समजून घेत असत, मी माझ्या जागेवर गेलो आणि बगितलं तर एक बाई तिथे बसलेली होती जी तिथे काम करणारी जुनी कामगार (Employee) होती, तिला मी म्हटलं "मॅडम तुम्ही बसला आहेत ती माझी जगा आहे मी इथे नेहमी  बसतो तर कृपया तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा" माझ्या मते मी तिच्याशी विनंतीपूर्ण संवाद साधला होता पण मात्र ती हट्टी बाई उठायला मागत नव्हती "मी उठणार नाही मला इथेच बसायचं आहे तुला काय करायच आहे ते कर" क्रूर आवाजात तिने मला उत्तर दिले तिचे अशे शब्द मला सहन होत नसल्याने मी त्यांना बोललो "म्हणजे तुम्ही उठणार नाही" शुभ्रा बाजूलाच होती आणि आमच्यातील संभाषण निमूटपणे ऐकत होती तिच्या अश्या बोलण्या मुळे शुभ्रालाहि खूप राग आलेला होता पण लाजाळू आणि खूप शांत आणि कोणाशी जास्त न बोलणारी शुभ्रा काही बोलू शकत नव्हती, तिने तिच्या आवाजाचा जोर आधीच्या पेक्षा दुप्पट करून बोलली " नाही बोललेलं समजत नाही काय " आता मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती, आणि ते हि शुभ्रा समोर अशे शब्द मी स्वतःला आवरु शकलो नाही आणि तिच्या PC ला लागून असलेले CPU त्याची पिन काढून फेकून दिली आणि म्हटलं "बागायचं होत ना काय करायच बग" माझ्या अश्या रागिष्ट कृतीचा त्या बाई वर परिणाम म्हणजे, तिचे दोनी डोळे पाण्याने भरून फक्त रडायचं बाकी राहील होत. रागाने पायाच्या टाचा आपटत-आपटत ती आमच्या सरांकडे माझी तक्रार करण्यास गेली, मजेची गोष्ट म्हणजे सर हे माझ्या खूप जवळ चे मित्र झाले होते आणि त्यांना माझा स्वभाव चांगलाच माहिती होता त्यामुळे त्यांनी तिला बोलले "एक काम कर दुसरा PC बग आणि बस" या सर्व गोष्टी पाहून शुभ्रा खूप हसत होती, तिला आता समजले होते कि मी पूर्ण पागल आहे तिच्या बाजूला बसण्यासाठी आणि तिच्याशिवाय नाही करमत हे सुद्धा तिला भाकीत ठरलं, आपल्या बद्दल इतकं प्रेम पाहून शुभ्रा हि मला खूप पसंत करू लागली होती, हे सगळं चालताच मी शुभ्राला आपल्या मनामध्ये असलेल्या सर्व भावना तिच्या सामोरे स्पष्ट करणार होतो, उद्या जाऊन आपण जे आहे ते सांगून मोळक व्हावं असं माझं सरळ मत होत, कदाचित शुभ्राला सुद्धा तेच हवं होत कारण तिच्या डोळ्यातून येणारी प्रेमळ नजर मला ते सर्व सांगून जात, आता तिच्या शिवाय मला कोणी हि नको असं झाले होते बस शुभ्रा आणि फक्त शुभ्रा. पण बोलतात ना चांगल्या गोष्टींचा शेवट चांगलाच होईल असं काही नसत आणि असाच तो दिवस माझ्या पदरात पडेल असं वाटलं नव्हतं...  



दुसऱ्या दिवशी खूप विचार करून तिला प्रोपोस करण्याचे मी ठरवले, मेहनत करून सर्व लक्षात ठेवले कि कस काय बोलावे आणि आपल्या भावना कश्या व्यक्त कराव्यात, मनामध्ये भीती देखील होतीच कि नकार दिला तर असलेली मैत्री सुद्धा गमावून बसेल पण, शेवटी प्रयत्न आता नाही करणार तर कधी अशा विचाराने मी तिला आज सर्व सांगणार होतो नेहमी प्रमाणे मी तिच्या बाजूचा जागेवर बसलो होतो आज ऑफिस सुटलं कि शुभ्राला सर्व सांगून मोकळं व्हयचा माझा प्लॅन होता, शुभ्रा जेव्हा माझ्या शी बोलायची तेव्ह ती सरळ नजरेला नजर भिडवून बोलत, तीच असं बोलणं मला खूप आकर्षित करत आणि तिचा डोळ्यातील सकारात्मकता मला खूप चांगली वाटत, तेवढ्यात शुभ्रा  बोलली मला तुला काही सांगायचे आहे, तीच असं बोलताच, माझ्या काळजाचा ठोका चुकला, हृदयाची धडधड वाढतहि होती आणि मनात भीती आणि आनंदाचे वादळ एकसोबत चालू होते, ह.. ह .. हो .., कडकडत्या आवाजात तिला बोललो. शुभ्रा बोलली "एक मुलगा आहे ज्याला मी खूप लाईक करते आणि खूप प्रेम करते, मला तो मुलगा खूप आवडतो बोलून उजव्या हाताच्या बोटाने तिने एका मुला कडे दिशा केली " शुभ्राचे अशे शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमिन सरकल्या सारखी वाटली, हृदयाचे ठोके थांबले असावते आणि आजूबाजूला इतकाअवाज असताना हि देखील अफाट शांततेची जाणीव होत होती अगदी जशी कानठीळी बसावी तशी, सर्व काही अतिशय अंधारमय झालं, माझ्या मनावर झालेला प्रसंग सांगण्याची ती स्तिथी नव्हती शिवाय आता तिच्या मनात जर दुसऱ्या कोणत्या मुलाची जागा असेल तर मग माझं, तीच इतकं अपेक्षेनें आणि आतुरतेने वाट पाहणं मला बरोबर वाटत नव्हतं, तिला आता माझ्या बद्दलच्या भावना सांगून आजून काही त्रास द्याचा नव्हता. निराश-हताश होऊन मी घरी परतलो माझ्या घरा मध्ये स्वतःला कोंडून घेतलं,अंधाऱ्या त्या खोलीत खाली बसून दोनी गुढग्या मध्ये मान टाकून मी रडत होतो,शिवाय माझ्याकडे दुसरा काही हि पर्यायही नव्हता, तो दिवस मी आज पण आठवतो तर माझ्या अंगावर काटे येतात.. पण त्या दिवशी एक गोष्ट मी शिकलो कि गरजेचे नाही कि आपण ज्याला पसंत करतो तो पण आपल्याला तसेच पसंत करतो, प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे प्रत्येकाच्या भावना विचार करण्याची पद्धत आणि समजण्याची पद्धत वेगळी आहे.

शुभ्रा सोबत बोलणं आणि तसेच चेष्टा मस्करी करणं मी एकदमच थांबवले नाही, तिला  माझ्या मनातील चालू असलेल्या वादळाची चाहूल सुद्धा लागू दिली नाही आणि मला तेच बरोबर सुद्धा वाटले आपलं दुःख सांगून तिचा सुखाचा त्याग तिने करावा असं माझं ठाम मत कधीच नव्हतं, ती सुद्धा मला मित्रा पेक्षा बाकी काही जास्त समजत नव्हती याची मला कल्पना झाली, दिवसेन दिवस जात राहीले या कमला लागून मला आता १ वर्ष पूर्ण झले होते तसेच मला दुसरी कडे जॉब साठी ऑफर सुद्धा येत असायचे, असेच एका ठिकाणी मला चांगला ५ आकडी पगाराची नोकरी देऊ करणार होते आणि मी हि संधी काही हि करून सोडणार नव्हतो, कारण शून्यातून वर जायचे असेल तर बदल मात्र गरजेचे सूत्र आहे आणि ते नेहमी पाळावे, नशिबाने माझे सिलेक्शन दुसऱ्या मोठ्या कंपनी मध्ये झाले आणि मी याची नोंद शुभ्राला हि दिली मनातून नाराज असली तरी तिने ते चेहऱ्यावर आणले नाही, उद्या पासून मी नसेल याची कमी तिला भासेल हे मला तिच्या चेहऱ्याच्या हावभावा वरून स्पष्ट दिसून येत होते पण मानाने चांगली असलेली शुभ्राला मला खूप मोठं झालेलं पाहायचं होत त्यामुळे मला तिने थांबण्यास काही कारण दिले नाही. मी सुद्धा थोड-फार बोलून त्या शेवटच्या दिवशी तिचा निरोप घेतला आणि माझ्या पुढील वाटचालीस वळलो... 

आज पूर्ण ४ वर्ष झाली शुभ्रा चा नंबर सुद्धा बदलल्या मुळे मला तिच्याशी काही कॉन्टॅक्ट करता येत नव्हता, या ४ वर्षात मला तिची खूप आठवण अली पण मी ते व्यतक करण्यासाठी तिच्याशी बोलू सुद्धा शकत नव्हतो, इतके जवळ असलेली आम्ही आज एक मेकांपासून एवढे लांब जाऊ याची जराही कल्पना मला नव्हती, या ४ वर्षात मी तिचा खुप शोध काढला पण मला तिचा काहीच कॉन्टॅक्ट मिळाला नाही. निराश होऊन मी शांत पने बसलो आणि विचार करू लागलो आता शुभ्रा ला कसा कॉन्टॅक्ट करावा, तीच लग्न तर झाले नसेल ना, किंवा ती कशी असेल याची चिंता मला नेहमीच असायची तेव्हा मला शुभ्राच्या बॉयफ्रेंड चा विचार आला त्याच नाव "अजय" होते, अजय ला शोधलं तर शुभ्रा आपल्याला नक्कीच भेटेल हे मला समजले होते, खूप प्रयत्नानंतर मला अजय फेसबुक वर भेटला, मी त्याला माझी ओळख पटवून दिली प्रत्येक वेळी शुभ्रा सोबत असल्यामुळे त्याने देखील मला ओळखण्यास फारसा टाईम घालवला नाही, १५ मिनिटे त्या सोबत बोलून मला समजले कि शुभ्रा चे लग्न अजय सोबत झाले नाही वरून यांचा ब्रेकअप देखील झाला आहे आणि तिने लग्न सुद्धा केलं नाहीये, हे ऐकताच मला पाठून कोणीतरी जोरात धक्का दिला असावा अशे वाटू लागले, कपाळावर भुवया उंचावत  मी त्याला विचारलं असं का तर त्याने त्यांच्या झालेल्या छोट्या-मोठ्या झगड्यांची उदाहरण देऊ केली, त्याचे अशे बोलणे मला फारसे पटले नाही कारण त्यावेळीस हे दोघे एकमेकांना इतके समजून रहायचे, प्रेम करायचे आणि आज अचानक असे का केले असावे....? जर शुभ्राने अजय सोबत लग्न नाही केलं तर कोनासोबत केलं..? आणि जर लग्न केलं नाही तर नक्की शुभ्रा आहे कुठे ...? अशे अनेको प्रश्नांची हजेरी मनात उपस्तिथ राहू लागली, आता काहीहि करून मला अजय कडून तिचा फोने नंबर घेणे गरजेचे वाटले, तीव्र विनंती नंतर आणि थोडं फार बोलून मी अजय कडून शुभ्रा चा फोन नंबर घेतला. आता वेळ होता फोन करायची आणि सर्व विचारपूस आणि सध्याची परिस्तिथी चा अंदाज घ्यायची.

दुसऱ्या दिवशी मी तिला फोन लावला, फोन ची घंटी वाजली पहिल्याच खेपेला तिने काही फोन उचलला नाही म्हणून मी परत प्रयत्न केला या वेळी पहिल्या घंटीतच तिने फोन उचलला... तिथून आवाज आला "हॅलो" तो आवाज ऐकताच माझ्या डोळ्या समोर तीच शुभ्रा उभी राहिली, तेच चित्रवर्णन, तेच प्रेम, मनमिळाऊ स्वभाव आणि तेच सर्व काही,तिच्या आवाजाने मी फ्लॅशबॅक मध्ये जाओ असं काही झालं, त्या एका वर्षात ज्या काही आठवणी होत्या त्या झपाट्याने माझ्या नजरेसमोरून जात होत्या आणि असं होणं मला स्वाभाविक वाटलं. ४ वर्षा नंतर मी तिच्याशी बोलत होतो.. पुढे मी बोललो "मी बोलतोय" विलंब न लावता एका क्षणी तिने माझा आवाज ओळखला, अतिशय राग आणि प्रेम मला तिच्या बोलण्यावरून समजत होत, तीच माझ्याशी लांब जाण्याचा राग म्हणावा कि, मी परत तिच्या आयुष्यात आलो त्याच व्यक्त केलेलं प्रेम हे मलाच सुचेना, आमच्या दोघांची मेहफिल परत ४ वर्षी आधीच्या काळात रंगली, झालेले विषय काढून आम्ही खूप हसलो आणि एक मेकांचे कौतुक सुद्धा केले शुभ्रा ला मी विचारले "नक्की काय झालं अजय सोबत ब्रेकअप का केलास तुझं तर त्यावर जीवापाड प्रेम होत तरी सुद्धा तू असं का केलास त्या सोबत तो किती दुःखाच्या ओझ्याखाली आहे माहिती आहे का तुला" तेव्हा तिने मला जे सांगितलं ते मी ऐकून स्तब्दच झालो, मोठं-मोठ्या नामांकित चित्रपटात असलेली गोष्ट हि मी तिच्या आयुष्यात खरोखरची घडत असेलेली पाहून स्वतःचे डोळे पाणावल्या शिवाय थांबवू शकलो नाही, ती बोलली "एक मुलगाआहे त्याच नाव "सुरेश", तू जेव्हा इथल्या कंपनी ची रजा घेतलीस त्या नंतर काही महिन्यांनी सुरेश हा माझ्या आयुष्यात आला, सुरेश हा पैशाने श्रीमंत आणि घरात बक्कळ पैसे असलेला मुलगा, आई बाबा त्याला सपोर्ट करत त्याचा इच्छांची पूर्तता करत आणि तो जी जिद्द करेल ते त्यापुढ्यात आणून देणारे त्याचे घरातील मंडळी, सुरेश हा तिचा पाठलाग करत, आधी एक हफ्त्या आड काही दिवसांनी दिवसा आड, आणि काही कालांतराने रोजच, तिला जबरदस्ती प्रेम करायला भागपढणे, "मला हा नाही बोललीस तरी स्वतःचा जीव देईल" अश्या धमक्या देणे, रस्त्यात हात धरणे, "घरी सोडतो चल" बोलून छळ करणे, शुभ्रा ने सांगितलं कि माझा बॉयफ्रेंड आहे माझा पाठलाग करू नकोस मला विसर तरी सुरेश त्याचा बॉयफ्रेंड या जिवेमारण्याच्या धमक्या देत, इतकंच नव्हे तर तो त्याला मारायला त्याचा गावी सुद्धा गेला. शुभ्राने न-पचत असलेलं दुःख पचवलं, चेहऱ्याने साधा सरळ असलेला सुरेश हा कर्माने तितकाच नीच आणि क्रूर मनुष्य होता. शुभ्रा अजय वर जीवापाड प्रेम करायची त्याला ठेच लागली तरी तिच्या मनाला वेदना होत, एक दुसर्यांचा आधार असलेली शुभ्राला अजयचा जीव तिच्या ख़ुशी पेक्षा जास्त मोलाचा वाटला, तिने अजय साठीच अजय सोबत बोलणं सोडून दिलं, शुभ्रा बोलली मी जर अजय सोबत लग्न केलं तरी सुरेश आम्हाला सुखाने जगू देणार नाही शिवाय तो अजय ला जिवेमारू शकतो आणि ते मी कधीच सहन नाही करू शकणार, परिस्थिती हाताळता तिने इतर छोटे मोठे झगडे काढून अजय सोबात चा असलेला संपर्क तोडला..  


अजयला वाटले कि त्यामध्येच काही कमी आहे कि ज्यामुळे त्यांचामध्ये एवढे झगडे झाले आणि आज एकमेकांपासून इतके लांब आहोत, पण जशे त्याचे विचार आहे तसे काहीच नव्हतं प्रेमापोटी तिने खुप मोठा त्याग केलेला आणि हि गोष्ट त्यालाच माहिती नव्हती. 

पुढे शुभ्रा म्हणाली.. मी या सर्व गोष्टींना वैतागली आणि गावाला आली पण सुरेश हा अतिशय विचलित आणि शार्प  माईंड होता त्याने शुभ्राच्या गावचा घराचा देखील पाता लावला, एवढंच नव्हे तर शुभ्राच्या घरी त्याच्या आई वडिलांना मागणी टाकण्यास सांगितलं, त्याची आई अंगावरती खूप सोन्याने नटलेली देखील असुन डोळ्यात पाणी होते, सोन्याच्या आभूषणाने नटलेली सुरेश ची आई अगदी खानदानी,प्रतिष्ठित,अनुशासित वाटत होती, शुभ्राचे हातपाय पडत त्याच्या लेकराच्या प्रेमाची भीक तिच्या कडून मागत होती, ती बोलली "पोरे माझ्या बाळा सोबत लग्न कर, न्हायतर तो जीव देईल बग , आणि या वयात आम्हासनी हे दुःख झेपणार असं तुला वाटतं असेल तर ते चुकीचे हाय, तुला फक्त हो बोलायचं हाय आणि घरी यायचं हाय मुंबई ला आपलं स्वतःच घर हाय आणि माझा मुलगा सुद्धा चांगल्या कामा-धंद्याला हाय, तुला बग तो नेहमी खुश ठेवेल याचं मी तुला वचन देते, पण पोरे न्हाय म्हणून नगस" अश्रू वाहत सुरेश ची आई शुभ्रा कडे अक्षरशः पदर पसरवत भीक मागत होती, एवढंच नव्हे तर सुरेश ने या आधी हि त्यांच्या आई वडिलांना शुभ्रा च्या घरी मागणी टाकण्यास पाठवले तेव्हा देखील दोघांनी तिच्या आईला आणि घरातल्या सदस्यांना खूप विनवण्या केल्या होत्या. सर्व परिस्थिती पाहता शुभ्राने विचार केला कि आता आपल्या हातात काहीच उरलेलं नाही, आपल्या प्रेमाचा खातीर आणि घरातल्यांसाठी, उरलेलं आयुष्य सुरेश सोबत नामंजूर असून देखील निराशा आणि उदासीणतेणे काढणे महत्वाचे आणि गरजेचे समजले. 

अश्रू वाहत आणि हुंदके देत ती मला पुढे सांगते... घरी असं डायरेक्ट सांगणं कि, असा मुलगा आहे आणि हे सगळं झालं हे मला बरोबर नाही वाटत माझ्या घरातले माझ्याबद्दल चुकीचा विचार करतील त्यासाठी शुभ्राने तिच्या काका काकींना पूर्ण स्टोरी समजावून सांगितली आणि बोलली कि तुम्ही असं सांगा कि तुमचा नात्यामधील एक स्थळ आहे म्हणजे माझे आई बाबा तुम्हाला नाय नाही बोलणार, काही दिवसांनी सुरेश त्याचा आई वडील सोबत शुभ्रा च्या घरी आले आणि काका काकी ने सर्व काही बोलणी शुभ्राच्या घरातिलयाना सांगितली, स्थळ हे काका च्या नात्यातील आणि मुलगा देखील चांगल्या घराण्यातला वाटत असल्या मुळेच शुभ्राचा घरातल्याची काही नामंजुरी नव्हती, सर्व काही व्यवस्थित पार पडले गेले आणि दोघांनी लग्न केले.. 

आज हि गोष्ट फक्त शुभ्राला, मला आणि तिच्या काका काकींना सोडून कोणालाच माहिती नाही. शुभ्राने तिच्या आयुष्यातलं  सर्वात मोठं त्याग केलं होत. आज शुभ्रा आणि मी खूप चांगले जवळचे मित्र आहोत जसे आधी होतो. यातून मला एकच समजलं मला माझं प्रेम भेटलं नाही, शुभ्राला शुभ्राच प्रेम भेटलं नाही, अजय ला त्याच प्रेम भेटलं नाही जे झालं ते फक्त एक अडजस्टमेन्ट म्हणून झालं त्या व्यतिरिक्त बाकी काही नाही, “एक नातं असं ही,... मी माझ्या आयुष्यात पाहिलं”



कथा काल्पनिक नसून एका सत्य घटनेवर आधारित आहे, या कथेच्या पात्रांची नावे गोपनीयता ला पाहता बदलण्यात आलेली आहेत. या कथेचा कोणालाच आर्थिक,सामाजिक आणि राजकीय द्रिष्टया हानी पोहोचवण्याचा उद्देश नाही. कथेचा बोध घेऊन पुढे याचा विचार आणि त्या विचारांचा प्रसार व्हावा हीच कळकळीची विनंती. 


आपलाच,

समिर चंदनशिवे


Post a Comment

0 Comments