काळरात्र




'जम्मू आणि काश्मीर' मध्ये वसलेले एक शहर 'श्रीनगर', येथे रवी ची त्याच्या व्यवसायिक कामा करीता बदली करण्यात आली होती. तेथील काम काही चार-एक दिवसांतच संपणार होते, तसेच तो काम आटोपताच आपल्या घरी मुंबईला येण्यास बांधील होता. रवी तसा सडपातळ, साडेपाच-पाच उंचीचा, रंगाने गोरा, आणि तांबूस केसं, तसेच वैचारिक दृष्ट्या सकारात्मता असलेला व्यक्ती होता, आणि प्रत्येक गोष्ट विचार करूनचं  करायचा. 'पेयिंग गेस्ट' असल्येल्या घरात रवी त्याच काम आटपून नुकतीच घराच्या खिडकीची काच सरकवु लागला, थंड हवेची झुळूक येता, त्याची लांब केसं कानामागून लहरू लागली. खिडकी जवळ दोनीही हाताचे कोपरे ठेवून, तळहाताने हनुवटीला आधार देत तो बाहेरील वातावरणाचे निरीक्षण करत होता "रिया, खूप आठवनं  येते तुझी, आज गेली 'आठरा- वीस' दिवस झाले, तुला पाहिले सुद्धा नाही, तू कशी असशील? स्वतःची काळजी तरी घेत आहेस ना??" तो मनातल्या मनातचं  पुटपुटत होता. रिया हि रवी ची बायको होती. तीच मूळ नाव तसं 'सुप्रिया' होत, पण तो लग्नानंतर तिला 'रिया' याच नावाने हाक मारत असे. रिया सोबत रवी प्रेम विवाह झाले असून, त्यांच्या लग्नाला 'पाच' वर्षे होऊन गेली होती. रिया तशी शांत आणि सरळ स्वभावाची होती, रूपाने सावळ्या रंगाची असून तिचा चेहरा गोल,रेखीव आणि खूप आकर्षक होता, तिचा हासरा चेहरा सर्वांना खूप आकर्षित करत, कपाळावरील छोटी लाल रंगी टिकली तिची नेहमीची ठरलेलीच असे, सोबत डोळ्याखालील काजळ तिचा शृंगार परिपूर्ण करत. रिया ची एक आणखी बहीण होती तीच नाव 'प्रणाली' विशेष सांगण्याचं म्हटलं... तर, या दोघी जुळ्या बहिणी, शाळा आणि कॉलेज पासून दोघी एकत्र शिकत आलेल्या असून दोघीहि पदवीधर होत्या. कधी-कधी तर त्यांच्या घरातल्यांना पण ओळखायला आवघड जात कि, यातील 'सुप्रिया' कोण,,? आणि 'प्रणाली' कोण.? त्या दोघी जुळ्या असल्या तरी दोघांच्या स्वभावात 'जमीन-आसमान' चा फरक होता, एक खूप बडबड करणारी, मनमोकळे पने बोलणारी, हट्टी मुलगी तर दुसरी एकदम शांत, समजूतदार, मोजकं सरळ बोलणारी मुलगी. त्यांच्या या उलट स्वभावामुळे कधी-कधी यांच्यातचं वाद सुरु होत..  "चला रवी... झोपून घेऊयात उद्या सकाळच्या फ्लाईट ने मुंबई ला रवाना व्ह्यचं आहे" रवी स्वतःशीच बोलत झोपायच्या तयारीला लागला. सकाळी सुमारे साडे सात ची फ्लाईट असल्यामुळे तो संध्याकाळी आकरा वाजताचं झोपी गेला. "माझी रिया.. येतोय मी उद्या.. खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी..." चुळबुळ करत तो कधी झोपी गेला त्यालाच समजलं नाही.

सकाळी बरोबर पाच वाजता रवी ला जाग आली आणि त्याने आपली बॅग पॅक करायला घेतली, सर्व तयारी आटपून तो 'चेक-आऊट' करण्याकरिता घरा बाहेर पडला. हातात एक मोठी सूटकेस आणि पाठीवर ऑफिस ची बॅग घेऊन तो चेक-आऊट करू लागला, पुढे तो बाहेर टॅक्सी घेऊन श्रीनगर एअरपोर्ट ला पोहोचला. ठरलेल्या वेळेच्या दहा मिनिटा आधी तो पोहोचला होता. "सर..! तुम्ही बॅग काउंटर वर ठेऊन, या दिशेने या.." तेथील एक एअरपोर्ट कर्मचारी रवीला उजव्या बाजूला बोट करून सांगत होती. "ओके... ठीक आहे" म्हणत त्याने आता बॅग काउंटर मधून काढली आणि पुढे त्याच्या जागेवर बॅग हातात घेऊन निघाला, जागेवर बसून त्याने दीर्घ श्वास घेतला "चला आता काही तासा मध्ये मी मुंबईला पोहोचेलच, माझ्या रिया ला पाहण्यासाठी मला खूप आतुरता झाली आहे आता" तो त्याच्या डाव्या हातातील घड्याळाकडे पाहत स्वतःशी बोलत होता. बारोबर सात वाजून तीस मिनिटे झाली आणि फ्लाईट ने काश्मीर-श्रीनगर  हुन मुंबई करीता उड्डाण भरली.

 


इथे मुंबईत रिया ची धावपळ चालूच होती. रवीने एक दिवस आधीच तिला फोन वर सांगितलं होत, कि तो मुंबईला येणार आहे म्हणून, त्यामुळे घरातील सर्व काम आटपून ती लगबगीने तयारी करून निघायच्या घाईला होती. इथे रिया सोबत तिची आज्जी सुद्धा राहत होती. रिया ची आज्जी हि एकदम शांत आणि कधी-कधी थट्टा-मस्करी करणारी, पण राग आला तर तेवढ्याच तापट स्वभावाची होती, तशी ती रिया ला घरकामात हातभार लावण्यात कधी मागे पडत नसे आणि कदाचित हाच स्वभाव रिया ला खूप आवडत असे. "आजी...माझा 'क्लिप' देना .. कुठे ठेवला आहेस काय तू?? सकाळ पासून मला भेटला नाहीये...!" रिया डाव्या हातात फणी घेऊन केस विंचारत, केसातील गुंथा काढत आवाज देत होती. "न्हाय .. बांध कि 'अंबाडा'.. तस बी आता कोण बगणार हाय तुला तिकडं ..? थोड्या मस्तीखोर उद्देशाने आजीने डोळे मिचकावत तिला उत्तर दिले. "आज्जी तू पण ना..! " रिया हसत आजीकडे पाहत होती.  नाईलाजाने तिने केसांचा आंबाडा केला. "बस का... कशी दिसते सांग आजी मी"?? हाताची घडी घालून, एकेरी मान वर उंचावत, नाक वर करून ती आजीकडे पाहत म्हणाली. "व्हय व्हय.. लय माधुरीच हायस बग, चल पट्कनि आता, माझा ल्योक यायलाय तिकडं.." आजी ने रियाला थोडं मस्करीत म्हटले, तरीसुद्धा कसल्या तरी दबावात येऊन किंवा उगाचंच मस्करी करावी अशे आजीचे हाव-भाव होते ते रिया ला साफ जाणवत होते तरी सुद्धा तिने आजीला काही विचारले नाही पुढे रिया आणि आजी आता सर्व घरातील कामे आटपून घरा बाहेर पडले आणि घरा बाहेरच्या नाक्यावरील रिक्षा पकडून त्या आता मुंबई एअरपोर्ट ला निघाले. निघताना रियाने घाई-गडबडीत मोजकेच पैशे घेतले होते. किमान ते एअरपोर्ट ला पोहोचू पर्यंत पुरेशे असावेत असा तिचा समज होता. पंधरा ते वीस मिनिटांच्या प्रवासा नंतर आजी आणि रिया ने आता मुंबई एअरपोर्ट ला हाजरी लावली होती. इथे रवी पाच तासाचा प्रवास गाठून, मुंबई एअरपोर्ट ला पोहोचला होता त्याची नजर एअरपोर्ट गेट जवळ... रिया अली आहे कि नाही हे पाहण्यास गेली,"हि रिया पण ना.. खूप आरामात असत हीच सर्व... तिला सांगितलं होत...  मी बारा-साडेबारा दरम्यान पोहोचेल पण नाही.. आपलं यायचं चाललंय हीच आरामात" रवी थोडा रागवत मनात पुटपुटत होता. तेवढ्यात त्याची नजर तिथे गेट कडे वळली आणि त्याने पहिले कि रिया तिथे आहे. तिला पाहून तो खूप खुश झाला. आज रवी तिला 'वीस-एकवीस' दिवसानंतर प्रत्यक्षात पाहत होता. तिच्या सोबत आजी सुद्धा आहे हे त्याने पाहिले. चटकन तो 'एस्कलेटर' ने खाली यायला निघाला आणि तिथे जाऊन तो रिया आणि आजीला भेटला. "किती उशीर केलास रिया तू.. आणि आजी तू सुद्धा..? थोडं तापट स्वभावात रवी त्यांना विचारत होता. "मी तर निघाली पण आजी चा पाय घरातून निघेल तेव्हा ना...!" आजीला एकेरी टोमणे मारत रिया स्वतःला बेगून्हा खूप मस्करीत साबित करत बोलली. "बर बर ... बास झाली तुमची जुगलबंदी आता निघूया का..? रिया ने मान डोलावत होकार दिला आणि मग सर्वे टॅक्सी ने परत घराकडे यायला वळाले. प्रवासा दरम्यान रवी, रिया ला त्याने काश्मीर मध्ये असलेल्या कामाबद्दल काही सांगितले आणि तिथले दिवस कशे काय होते ते सर्व तो तिच्यासोबत बोलू लागला.



घरी पोहोचताच रवी चा आनंद गगनात मावळेनासा झाला. दरवाजा खोलताच त्याला घर पूर्ण 'सफेद-लाल' रंगाने सजलेलं दिसले, सोबत पताके आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशाने ते खूप आकर्षक दिसत होते, आज आठ जानेवारी म्हणजे रवी चा जन्मदिवस होता. त्याला अंदाजा नव्हता कि रिया ला हि गोष्ट माहिती असणार आणि एवढ्या घाई-गडबडीत ती इतकं काही करेल याची सुद्धा कल्पना नव्हती. "रिया.. थँक यु माय स्वीटहार्ट .. तिला मायेने जवळ घेत, तीच डोकं आपल्या  छातीशी घट्ट धरून तो तिच्या कपाळावर किस करत होता, रिया ने सुद्धा दोनीही हाताने त्याला घट्ट मिठी मारली होती "मग.. तुम्हाला काय वाटलं, मी विसरले का?? " रिया ने थोडं मस्करी करत रवीला विचारले. तेव्हड्यात मागून खोकण्याचा आवाज आला "ओह्हsss -ओह्हsss ... अअ...चला मग आता फ्रेश होऊन मस्त बड्डे साजरा करूया.." आजीने रिया आणि रवीला म्हटले.. सर्वे काही आटपून झाल्यावर खूप चांगल्या पद्धतीने रवी आणि रिया ने वाढदिवस साजरा केला.. "रिया थँक यु.. माझ्यासाठी एवढं केल्या बद्दल.." केक चा एक तुकडा हातात घेऊन रियाला चारताना तो बोलत होता.रिया त्याच्या आनंदात स्वतः देखील मग्न झाली होती. सर्व काही व्यवस्तीत पार पाडले गेले. एकदम रवी ने विचारही केला नसेल असे झाले, कारण, गेले दोन वर्ष रिया हि रवी चा वाढदिवस विसरत असे, अनेकदा तर असं होत कि रवी ला स्वतः सांगायला लागे कि त्याचा आज वाढदिवस आहे. याच कारण म्हणजे, रिया ला गेल्या वर्षा पासून 'अल्झायमर' म्हणजे 'मेंदू रोग' आजार असल्यामुळे तारका, वार आणि किरकोळ हिशोब काही फारशा काळापर्यंत लक्षात राहत नसे, डॉक्टरांकडे नियमित उपचार चालू असता,रवी तिला दर महिन्याला अपॉइंटमेंट साठी घेऊन जात. रवी रिया वर जीवापाड प्रेम करत होता, त्यामुळे तिच्या अश्या 'बारीक-सारीक' चुकांना देखील तो डोळे बंद करून माफ करीत आणि तिला समजूतदारपणे अपनवत. 

 


रात्रीचे जेवण रिया ने खूप आवर्जून रवीच्या आवडीचे बनविले होते, त्याला कोंबडीच्या कालवना सोबत 'तांबडा-पांढरा' रस्सा, आणि तांदळा ची भाकर खूप आवडत असे. "खूप मस्त जेवण केलयस रिया.... रवी ने जेवणाचा घास तोंडात चंगळत आवाज दिला. "हो का... तुमच्याच साठी बनवलं आहे..! " रिया ने गोड स्माईल देत, रवीला उत्तर दिले.. "नात कुणाची हाय.." आजीने पाण्याचा घोट घेऊन दोघांना मस्करीत उत्तर दिले. सर्वे जण त्यावर हसू लागले.. रात्रीच्या जेवणाचा कार्यक्रम सर्वस्वी आटपून रवी त्याच्या बेडरूम मध्ये गेला. रिया सुद्धा त्याच्या सोबत होती. नेहमी प्रमाणे आजी बाहेर हॉल मध्येच झोपायला थांबली. "तुला माहिती आहे का..? तिथे किती मस्त थंडगार वातावरण आहे.. तेथील लोकं, तेथील भाषाशैली आणि महत्वाचं म्हणजे तेथील रहिवाशी खूप आपुलकीने वार्ता करतात एक-दुसर्यांसोबत" रवी त्याच्या मोबाईल मध्ये पाहत रिया सोबत बोलत होता. रवी रिया ला तिथे झालेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती सांगत होता. "आता काही बोलशील का...?" म्हणत रवी ने तिला डाव्या हाताचा कोपरा अलगद मारला, रिया काही बोलत नव्हती तर, त्याने मोबाइल बाजूला ठेवला आणि तिच्याकडे पहिले तर ती रडत होती...रवी ला समजत नव्हतं कि एवढा चांगला दिवस गेला. सर्व काही व्यवस्तित झाले, तरी सुद्धा रिया ला काय झालं.. "रिया... काय झालं तुला...? का रडतीयेस तू...? सांगशील का मला...?? " रवी ने तिला जवळ घेऊन, तिच्या डोक्यावरून ,मायेने हात फिरवला. रिया त्याच्या छातीला लागून अगदी मनातून रडू लागली.. रवी ला हे सर्व पाहून काय करावे हे समजेनासं झाले "रिया.. अग तू काही सांगशील तर समजेल ना मला.. असं रडशील तर मी कसा अंदाजा लावू कि काय घडले आहे...?" रवी ने तिला जवळ घेतले.. "मला तुम्हाला काही सांगायचं आहे... आठ दिवसांपूर्वी 'प्रणाली' (रिया ची बहीण)  घरी आली होती, आजीला आणि मला भेटायला. कारण, खूप दिवस झाले मी माहेरी पण नव्हती गेली त्यामुळे तिला खूप आठवण येत असल्यामुळे मला,तुम्हाला आणि आजीला भेटण्यासाठी इथे दोन दिवसांकरीता येणार होती, तुमची त्वरित बदली बद्दल मी घरी काही सांगितलं नव्हतं त्यामुळे प्रणाली ला तुम्हाला भेटता आलं नाही , पण ती मला आणि आजीला पाहून खूप आनंदी झाली. घरातील विषय निघाले आणि आम्ही सर्वे जण त्यात रंगून गेलो... "पुढे बोल रिया.. काय झालं.." रवी तिला उत्सुकतेने विचारत होता.. रात्री आम्ही जेऊन झोपायला गेलो आजी नेहमी प्रमाणे हॉल मध्ये आणि मी प्रणाली बेडरूम मध्ये. रात्रीचे किमान साडे तीन वाजले असावे, मला अचानक जाग आली.. झोपेत माझा हात बाजूला झोपलेल्या प्रणाली कडे पडला, पण तिथे काहीच नव्हते मी तशीच अंधारात माझ्या हाताने चापचू लागली पण मला प्रणाली सापडली नाही.. माझी झोप उडाली, कारण बेडरूम चा दरवाजा आर्धा उघडा होता. मला वाटलं कि प्रणाली वॉशरूम ला गेली असावी, म्हणून मी थोडं थांबावं म्हणत दहा मिनिटे दम काढला. पण प्रणाली अजून सुद्धा आली नव्हती, मला काही राहवलं नाही म्हणून मी लाईट बटण चालू करून वॉशरूम कडे वळली, तर मला बाथरूम चा दरवाजा आतून बंद सापडला.अनेक आवाज देऊन हि आतून काहीच उत्तर आले नाही, मी घाबरले आणि आज्जीला आवाज दिला. आजी सुद्धा उठून आल्या, आम्ही दोघीहि खूप घाबरलो असून आम्हाला प्रणालीची खूप चिंता वाटत होती.. कीत्यांदा आवाज देऊन हि आम्हाला प्रणालीचे काहीच प्रतिउत्तर आले नाही.. आता आमच्याकडे दरवाजा तोडून आत जाण्या पलिकडचा कोणताचं मार्ग उरला नव्हता. आजी आणि मी घरातीलच एक जुनी 'हातोडी' घेऊन बाथरूम चा दरवाजा तोडण्यास लागलो, पाच ते दहा मिनीटानंतर आम्ही दरवाजा तोडला आणि आत आम्हाला प्रणाली अस्वस्थ अवस्तेथ पडलेली सापडली, तिच्या डाव्या हातात एक कागदाचा गोळा तिने जाम धरलेला आणि उजव्या हातात एक छोटी काचेची फुटलेली बॉटल सापडली, तिचा चेहरा पाहता तिचे डोळे पूर्णतः सफेद पडलेले, शिवाय तोंडातून फेस सुद्धा आला होता. "रिया खूप जोर-जोरात हुंदके देत रवी ला सर्व घटना सांगण्याचा प्रयन्त करत होती.." आम्ही दोघीही खूप घाबरून गेलो होतो,आम्हाला काही कळेनासं झालेलं..आजी तर जोर-जोरात रडू लागली होती मी कशी-बशी शुद्धीत आली आणि प्रथम आई-बाबांना फोन करून या सर्व घटनेची खात्री करून द्यावी असं म्हटलं. मी आईंना सर्व सांगितलं, तातडीने आई आणि बाबा घरी यायला निघाले. आई आणि बाबा घरी येताच खूप घाबरून गेले, शिवाय आई खूप हुंदके देत-देत रडू लागली. अनावर अश्रू बाबांशिवाय कोणालाही आवरले नाही.. शुद्धीत राहता, बाबांनी हि घटना पोलीस अधिकाऱ्याला देणं महत्वाचे समजले. त्यांनी त्वरित नगर पोलीस अधिकाऱ्याला फोन करून बोलावून घेतले आणि सर्व घटना सांगितली. पोलीस अधिकाऱ्यांनी बॉडी 'शवविच्छेदन' करीता रुग्णालयास रवाना केली.. आणि पंचनाम्या करीता त्यांनी घरातील उपस्तिथ सदस्यांची विचारपूस केली. घडलेली घटना हि काळजाला भोक पाडणारी होती. आई ने जेवनंच सोडून दिले होते, बाबा तिची सांतवंत करीता दमत नव्हते.

 


दुसऱ्या दिवशी एका पोलीस अधिकाऱ्याकडून आम्हाला कळाले कि तिने विष पिऊन आत्महत्या केली होती. शिवाय तिच्याकडे 'आत्महत्येचे पत्र' सुद्धा सापडले, ज्यात तिने 'औदासिन्य' म्हणजेच 'डिप्रेशन' करिता हे कृत्य केले आहे असे कळण्यात आले. हे सर्व ऐकताच रवीला खूप मोठा धक्का बसला, कारण प्रणाली ला तो ओळखत होता. ती खूप उत्साही, जिद्दी, मनमोकळ्या स्वभावाची, मुलगी होती, आणि तिच्या मृत्यच कारण 'औदासिन्य' समजता रवी ला हे पचनेयोग्य नव्हते.. त्याला खूप मोठा धक्का बसला, रवी च्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब सरकत तो रिया च्या गालावर पडला "रिया... तू हे सर्व मला आता सांगत आहेस... इतके दिवस माझ्यापासून हे का लपविलेस" रवी खूप रागात बोलून, रियाकडून उत्तराची अपेक्षा करत होता.. "मी तुम्हाला सांगणार होते पण आई आणि बाबा म्हटले कि, तुम्ही खूप महत्वाच्या व्यावसायिक कामाकरिता बाहेर गेला आहात.. आणि अशी घटना जर तुम्हाला समजली तर तुमच्या कामावर किंवा तुम्हाला सुद्धा मानसिक त्रास होईल.. आणि तशेही तुम्ही पाच दिवसात मुंबई ला येणार होता तर तेव्हाच तुम्हाला सर्व सांगता येईल असा आमच्या सर्वांचा विचार झाला.. "मला माफ करा रवी.." डोळ्यातून अश्रू येत, हुंदके देऊन रडतं तिने रवीला खूप घट्ट मिठी मारली.. "माला तुमची काळजी वाटत होती...  म्हणून मी तुम्हाला त्यावेळी काही सांगितले नाही.. मला माफ करा ... " रिया ने रवी ला खूप आपुलकीने उत्तर दिले .. "रिया आधी रडणं बंद कर.. हे बग जे व्ह्याच होत ते झालं, आता तू रडून स्वतःला त्रास देत आहेस बाकी काही नाही.." तिच्या कपाळावरून मायेने हात फिरवून, कपाळावर आलेले केस तिच्या कानामागे सारत, तो रिया शी बोलत होता. "आता तू झोपून घे, आराम कर.. मी सुद्धा झोपतो उद्या बोलूया आपण.. जास्त विचार नको करुस तू आता" रवी च्या बोलण्याने रिया आता झोपून गेली सोबत रवी पण तसाच तिच्या डोक्यावरून हात फिरवत झोपून गेला.

 

कामाला सुट्टी असल्या कारणाने, दुसऱ्या दिवशी रवी थोडा उशिराच उठला.. आळस देत त्याने काल रात्री झालेल्या विषयावर थोडंस लक्ष दिलं.. आतल्या खोलीतून त्याला भांड्यांचा थोडा आवाज येऊ लागला.. त्याने थोडं बेडवरुन उठून पहिले तर रिया भांडी घासत बसली होती.. रिया सकाळी कधीच रवी च्या आधी उठून असं कामाला हात लावत नसे. तिचा हा बदललेला चांगला स्वभाव रवी ला खूप आवडला.."काही खाल्लस का.. नाश्ता केलास का तू... ?? " हातातील मोबाइल चाळत, तो तिच्याशी बोलत होता. "हो हो केला तुम्ही पण फ्रेश व्हा मी नाश्ता लावते" रिया ने हातातील टोप घासत घासतचं रवी ला म्हटले..रवी तसाच चालत हॉल मध्ये गेला आणि त्याने रिया च्या घरी थोडया सांतवंत करिता फोन केला.. "आई.. कशी आहेस तू .. बाबा कशे आहेत.. रिया ने मला सर्व सांगितलं आहे..." आपुलकीचा प्रश्न कानावर पडताच रियाच्या आईचा कंठ दाटून आला,  त्या फोन वरच त्याच्याशी त्यादिवशी झालेल्या प्रसंगाचा उलघडा करू लागल्या.. सांतवंत देता रवी ने त्यांची समजूत काढली आणि त्यांच्या अनावर अश्रुंवर ताबा घेतला."काळजी करू नका.. आता जे व्ह्यच होत ते झालं.. आता आठवणी काढून काहीहि होणार नाहीये.. त्यामुळे तुम्ही आधी तुमचे रडणे बंद करा आई.. बाबांची सुद्धा काळजी घ्या.." रवीने रिया च्या आईला थोडे आपुलकीने बजावले. रिया ची आई रवी ला पोटच्या पोरा इतकंच समजच असे.. त्यामुळे त्यांचा मान ठेवण्यासाठी त्या थोड्या शुद्धवस्थेत येत, अश्रू आवरले आणि रावी शी व्यवस्ति बोलू लागल्या.

 

दुसऱ्या दिवशी,रवी आपल्या नेहमीच्या कामाला निघाला. "रिया.. टिफिन दे .. " रवी पायातील सॉक्स घालतच आतल्या खोलीत असलेल्या रिया ला आवाज देत होता.. "हो आले आले .. " रिया लगबगीने डबा घेऊन आली आणि रवी च्या बॅग मध्ये ठेऊ लागली.. रवी ने शूस घातले "येतो.. काळजी घे " म्हणत बुटांचा आवाज करत तेथून निघून गेला. आणि लिफ्ट मध्ये जायला निघाला..  बिल्डिंग खाली आल्यावर आठवलं कि त्याचे घड्याळ तर घरातच राहील आहे.. तो पुन्हा घरी यायला वळला.. लिफ्ट आता वर गेलेली त्यामुळे त्याने पायऱ्यांचा वापर करण्यास योग्य समजले. त्याच्या घरा जवळ एका मिनिटाच्या अंतरावर पोहोचताच, त्याला कसली तरी भांडने चालली आहेत, असा आवाज ऐकू आला.. कान देऊन ऐकता समजले कि तो आवाज त्याच्याच घरातून येत होता.. त्याने पटकण जाऊन काय चाललं आहे पाहण्यास वेग धरला.. दरवाजा जवळ जाता-जाता भांडणांचा आवाज थोडा वाढला, आता रवीला खात्री पटली कि आज्जी आणि रिया मध्येच काही तरी बाचा-बाच चालू आहे. त्याने दरवाजा ठोठावला तसाच भांडणाचा आवाज एकदमच विलुप्त झाला. बरोबर एक मिनिटा  नंतर दरवाजा रिया ने उघडला.. चेहऱ्यावरती घाम, केस थोडी भरकटलेली, आणि डोळ्यात थोडी भीती, असा तिचा अवतार "काय झालं.. कसले झगडे चालले आहेत...? पूर्ण बाहेर आवाज येत आहे." रवी ने तिला विचारले ".. भांडण नाही sss  टीव्ही चा आवाज होता sss आजीने वाढवलेला तर, तो कमी केला.." उजव्या हातातील टीव्ही चा रिमोट रवी ला दाखवत तोंडावर खोटी स्माईल देत ती त्याला उत्तर देत होती. रिया च्या या आवाजात थोडं कंपन रवीला साफ जाणवत होत.."ठीक आहे.. ते किचन मध्ये,डब्यावर माझं घड्याळ ठेवलं आहे... दे बगु पटकन.. " रवी ने तिला उजव्या हाताने आतल्या खोलित बोट दाखवून इशारा केला.. आजी एका कोपऱ्यात शांत बसली होती.. काही काही पुटपुटणारी आजी जरा शांतच आहे हे पाहून त्याला मानत थोडं विचित्र वाटलं, पण कामाला घाई होत असल्याने, त्याने जास्त यावर लक्ष दिले नाही आणि घड्याळ घेऊन पटकन कामावर निघून गेला.

 

कामावरून संध्याकाळी सात वाजता रवी घरी आला.. "रिया पाणी दे गं.. " आज्जी कडे एकटक बघत त्याने आतल्या खोलीत असलेल्या रिया ला आवाज दिला "काय आजी... काय करतियेस...?" "बसलीये बाळा.. थोडं अंग दुखत होत म्हणून" पाण्याचा एक घोट घेत रवी म्हटला "आजी ... डॉक्टर कडे जाऊन ये मग.. " "न्हाय आता बर हाय , असं काय जास्त न्हाय हुत ." किमान आजी बोलत आहेत, हे बगुन रवीला बर वाटलं.. आणि ऑफिसला जाताना आजी शांत एका कोपऱ्यांत पडून असण्याचं कारण त्यांच आजारी असंन होत.  हे विचार करत रवी स्वतःवरच हसत मान हलवत होता. रात्री दहा वाजल्या नंतर सर्व जण जेऊन झोपायला निघाले होते .. "मग कसा होता आज चा दिवस तुमचा... ?? " काही नाही... तेच रोजचीच कामं बस .. " रवीने उत्तर दिले. रिया हि रवी सोबत खूप मस्ती करत आणि त्याचाशी बेधडक बडबड करत होती.. रवीच्या काश्मीर ला जाण्याआधी पासून रिया अशी कधीच वागली नव्हती, कारण रिया खूप शांत, समजूतदार आणि मोजकंच बोलणारी मुलगी होती.. "इतक्या कमी वेळातच एव्हडा बदल रिया मध्ये त्याला विचारात टाकण्यासारखा होता.. त्याहून अधिक...  काही दिवसांपूर्वीच बहिणीच्या झालेल्या अंत्यविधीला ती इतकं सहजा-सहजी विसरून काही झाल्यासारखं कसं काय वागू शकते.. रवी ला काही तरी पटण्यासारखं ते  चित्र होतं.. "रिया अशी का वागत असेल ..? खरच एखादी मुलगी अशी बदलू शकते का..? कदाचित तूच जास्त विचार करतोयस रवी...झोपून घे आता ..! " रवी आणि रिया आता झोपून गेले.

 


 सकाळी नेहमी प्रमाणे रिया घरकामात व्यस्त झाली आणि रवी उठून तयारी करू लागला .. अंघोळ करून झाल्यावर तो शर्ट घालण्यास घेत होता तेवढ्यात, रिया ने रवी ला विचारले "मागे हे कसलं निशाण आलं आहे ... ?  "निशाण ... ? कसलं निशाण आहे...? रवी तिला विचारू लागला, तिने भिंतीवर अडकवलेला आरसा रवीच्या मागे आणला आणि रवी ला बघायला सांगितलं , तिरपी मान फिरवत रवी आरशात पाहू लागला "अरे बापरे... हे कसलं निशाण आहे..?? असं वाटतंय कोणीतरी नखाने खरवडलं आहे माझ्या पाठीवर.." रवी च्या पाठीवर तीन नखांनी खरवडल्याची निशानं आली होती.. रवी ला हे समजलं नाही .. रिया,रवी आणि आजी तिघेही हे पाहून खूप घाबरले होते.. " हे निशाण कसं काय आलं...? कोणी रानटी मांजर वगैरे तर रात्री घरी अली नसावी ना खिडकीतून...?, पण हे निशाण कोणत्या मांजरीने केलं आहे, हा -पटण्यासारखा मुद्दा होता" रवी ऑफिस मध्ये असताना, हातातील फाईल पडताळता कपाळावर आट्ट्या पाडत, स्वतःशीच बोsलत होता. त्याचा ऑफिस मध्ये आज काहीच मूड लागत नव्हता. कारण सकाळी पाहिलेलं पाठीवरील निशाण त्याच्या विचारांना सुटका देत नव्हते.काही ऑफिस कामाकरिता त्याने त्याच्या डाव्या शर्टच्या खिशातून पेन काढला आणि एका पेपर वर लिहीत-लिहत बोलू लागला... "काश्मीर वरून मुंबई ला आल्यापासून मला रिया मध्ये खूप बदल दिसत आहेत... तिचा स्वभाव, वरून आजीचे बदललेले हावभाव आणि आज माझ्या पाठीवर निशाण.. काही का होईना काही तरी विचित्र गोष्ट आहे.." डोळे मिचकून, कपाळावर पेन हळू आपटत तो पुढे बोलू लागला "छे.. छे.. उगाचंच तू इतका विचार करतोयस रवी ..!

 


कामावरून घरी आल्यावर, सर्व काही जेवण झाल्यानंतर सर्वे झोपी गेले.. "आज परत काही होणार तर नाही ना..??" रवी चादरी मध्ये डोळे उघडे ठेऊन, मोबाईलच्या उजेडा मध्ये, मानातच पुटपुटत होता.. रिया हि काम करून खुप दमल्या कारणाने लवकरच झोपून गेली. "आज आपण थोडं जगसुदच झोपुयात.." म्हणत तो झोपून गेला.. रात्री ची वेळ.. घड्याळाचा काटा :३१ मिनिटांवर आलेला.. घरभर कानाला किर्रर्रssss  करणारी शांतता.. बाहेरील रातकिडे आणि घरातील भिंतीवरील टांगलेलं  घडयाळ पूर्ण घरात आवाज करत होतं.. अचानक घराची वीज पूर्णतः खंडित झाली.. गरम होत असल्या कारणाने रवी ला पण लगेच जाग आली.. त्याने सहज हात बेडवर फिरवला, तेव्हा त्याला तिथे रिया झोपली आहे असं काही जाणवलं नाही.. आता डोळे नीट उघडे करून, डोळ्यात तेल टाकून तो तपासू लागला, पण त्याला रिया तेथे दिसली नाही.. रवी पूर्ण घामाघूम झाला "रिया.. वॉशरूम मध्ये आहेस का..??" त्याने ओरडून आत आवाज दिला.. बाथरूम मधून फ्लश चा आवाज आला "अगं आत आहेस का ?.. किमान आवाज तरी दे रिया.. उगाचचं मी पण तुला घरभर शोधत होतो.. चल आता ये लवकर.." पण तिथून एकही आवाज परत आला नाही.. रवी ला काही शंका वाटली, त्याने बाथरूम जवळ जाऊन पहिले, तेव्हा तो एकदम 'हक्का-वक्का' झाला, कारण बाथरूम चा दरवाजा उघडा असून आत कोनिहि नव्हतं.. "आत कोणीच नाही पाहून आता रवी पूर्ण घामाघूम झाला.. हे नक्की काय चालू आहे त्याचा समजा पलीकडचे होते..अंधारातच हाताने चापचत तो हॉल कडे गेला" त्याने पहिले कि आजी शांत झोपली आहे त्याने परत बेडरूम कडे येऊन पाहिले, पण रिया तिथे काही नव्हतीच.. अचानक बेडरूम चा दरवाजा खाडकन बंद झाला, रवी आता पूर्ण पने घाबरून गेला होता.. "धाव घेत तो दरवाजा चा हॅन्डल पकडून ओढू लागला, पण दरवाजा पूर्णपणे लॉक झाला होता.. "खोला ..खोला.. कोण आहे .. " किंचाळत दरवाजा आपटू लागला अचानक त्याला, त्याच्या मागे कोणी तरी असल्याचा भास झाला.. " नाकावाटे कोणाचा तरी श्वास, त्याच्या मानेला लागून जात आहे असा त्याला स्पर्श जाणवला.. रवी चे हृदय हे आधीपेक्षा तीव्र गतीने धावू लागले होते .. कपाळावरून अंगभर असलेल्या घामाने त्याचे शर्ट पूर्णपणे भिजून गेले होते.. त्याने मागे वळून पाहता त्याच्या पायाखालील जमीन सरकावी असे ते दृश्य होते.. तिथे कोणी नसून रियाचं होती पण "तिचे डोळे पूर्ण सफेद झाले होते, कपाळावर आणि तोंडावर ओरबाडल्या सारखी 'आढवी-तिरपी' निशाणे पडली होती, केस पूर्ण मोकळे आणि काही डोळ्या भोवती आले होते" हाता अंगावर पूर्ण राख लागलेली असून तिच्या बोटाची 'वाकडी-तिकडी' लांब नखे पूर्ण स्पष्ट दिसत होती.. रवीची अवस्था खूप दयनीय झाली. त्याचा घशातून आवाज निघत नव्हता, इथे दरवाजा पलीकडे जोर-जोरात दार आपटत आजी..  "रिया, रवी... काय चाललंय दार उघडा.. काय झालं ??" आवाज देत होती.. तेवढ्यात रिया ने रवी ला जोरदार धक्का दिला त्याचे डोके सरळ जाऊन भिंतीच्या एका कोपऱ्याला आदळले.. रक्त बंबाळ तो लादीवर लोळत होता.. धड-कन दरवाजा उघडला आजीने रियाचं हे रूप पाहता त्या एकमच थंड पडल्या .. हात-पाय एकदम आकडून गेले ... रिया ने खूप जोरात किंचाळी मारली, त्याने आजी एकदम सुधीर-बधिर होऊन खाली पडल्या.. आजी जमिनीवर कोसळल्या, त्यांचा एक हात छातीवर आणि दुसरा जमिनीवर होता.. त्या अंधार खोलीत, 'अंधक-अंधक' रवी ला दिसत होत पण ते हि आता बंद झालं.. डोळ्यासमोर त्याच्या रिया चालत येत असताना दिसली, पण पुढे त्याच्या डोळ्यावर पूर्ण अंधारी आली आणि तो तिथेच भीतीने बेशुद्ध झाला.

 

दुसऱ्या दिवशी... रवी चे डोळे उघडले तो त्याच्याच बेडरूम मध्ये होता.. डावीकडे पाहता त्याला रिया तिच्या साध्या वेशात आहे असे दिसले "काही नाही, डोक्याला साधारण मार लागला आहे, होशील व्यवस्तीत" खांद्यावर हात ठेऊन डॉक्टर, रवी ला बोलून तेथून निघून गेले .."रिया ने रवी चा हात पकडला होता आणि रडत होती .. "काय झालं होत.? तुम्हाला एवढं कस लागलं..?आणि आजी ला पहा ना काय झालाय उठतच नाहीयेत..?? " आतल्या खोली कडे बोट दाखवत ती रडत होती.. रिया च्या या प्रश्नावर तो निशब्द झाला. चित्रपटांमध्ये घडणाऱ्या विकृत आणि शापित घटनांना तो  प्रत्यक्षात अनुभवत असल्याचं तिला सांगणं त्याला योग्य वाटलं नाही .. "का...काय झालं .? " बेडरूम मधला दरवाजा हलका उघडा असल्यामुळे त्या फटीतून त्याला स्पष्ट दिसत होते .. रिया चे आई बाबा तिथे होते.. जवळ जाऊन पाहता त्याला समजले कि आजी ला 'हार्ट अटॅक' आल्यामुळे त्या आता नाही राहिल्या.. यावर रवी चे अश्रू अनावर झाले. रिया सुद्धा त्याच्या मिठीत रडू लागली होती "हे काय चाललं आहे.. मला माहिती आहे काल रात्री काय झालं.. पण मी कस सांगणार आई बाबांना कि आजीचा जीव कशामुळे गेला आणि माझ्या डोक्याला मार कशा मुळे लागला .. इतकं सर्व माहिती असताना हि तो निःशब्दच राहिला.. "आपल्या जीवाला सुद्धा धोका आहे , काही तरी करावे लागेल आणि हे सर्व थांबवावं लागेल, नाही तर पुढे काय होईल हे कोणीही सांगू शकणार नाही" इतकं भयानक चित्र रवी त्याच्या डोळ्यासमोर उभे ठेऊन स्वतःशी बोलत होता.

 

रवीच्या ओळखीचा एक मित्र होता 'संजय' त्याने खिशातला मोबाईल काढत त्याला कॉल लावला...!

 

रवी : हॅलो संजय रवी बोलत आहे.

संजय : हो रवी... कसं काय आठवलस... ?

रवी : नाही रे.. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे.. तू प्लीस मला आज संध्याकाळी आठ वाजता नाक्याजवळ भेटशील का?

संजय : तसं तर कामात आहे मी त्यावेळेस .. पण तुझ्यासाठी वेळ काढून येतो.

रवी: थँक यु संजय .

 

रवी संजय ला भेटण्याकरिता नाक्यावर निघाला. नाक्यावर त्याला संजय वाट पाहत असताना दिसला. संजय ने त्याला प्रश्न केला.. " काय रे रव्या.. काय झालं? एव्हडं काय महत्वाचं बोलायचं होत, जे तू फोन वर बोलू शकत नव्हतास..? " संजयने भुवया उंचावत रवी ला प्रश्न केला "संजय .. अरे माझ्या घरी वाईट शक्तीचा प्रकोप आहे .. माझ्या घरी काल जीवघेने घटना घडली आहे " म्हणत रावि ने त्याला काल झालेल्या घटना सांगितल्या.. संजय हे सर्व ऐकून दचकुन गेला .. दीर्घ श्वास घेत तो बोलला "ठीक आहे रव्या.. मी तर नाही पण, एक तांत्रिकी बाबा आहेत ओळखीतले तेच तुला यातून बाहेर काढतील बघ." दोघेही त्या बाबा कडे रवाना झाले आणि त्या बाबांच्या जवळ जाऊन सर्व घटना सांगितली .. "ठीक आहे, तू मला तुझ्या घरी घेऊन चल आत्ताच.." बाबांनी रवीला म्हटले. "ठीक आहे बाबा...  चला तुम्ही माझ्या सोबत.. " बाबा सोबत रवी आता घरी पोहोचला होता, घरी आल्यानंतर बाबांनी घराची पूर्ण पडताळणी केली बेडरूम, हॉल, किचन, बाथरूम मध्ये जाऊन मंत्राचा जप करत अंगारा फुकला.. "बाबांनी रवी ला बाहेर येण्याचा इशारा केला.. "तुझ्या घरात मला नकारात्मक शक्तीची जाणीव झाली आहे ..! शिवाय मी जेव्हा घरात पाऊल टाकला, मला खूप गुदमरल्या सारखे वाटू लागले आणि महत्वाचं सांगायचं म्हटलं तर, तुझ्या बायकोच्या माघेच मला एक सावली दिसली.. जिला मी पाहताच ती तिथून विद्रुप झाली .. म्हणून मी हा अंगारा पूर्ण घरभर, मंत्रजप करून टाकला आहे.. " हे ऐकून रवी खूप घामाघूम झाला तो खूप घाबरून गेला होता असं का होत आहे याचा तो अंदाज मनातल्या मनातच लावत होता.. "नकारात्मक आत्म्याला, आपण तेव्हाच वष मध्ये घेऊ शकतो जेव्हा ती कोणाच्या रूपात बाहेर येते, तू सांगितल्या प्रमाणे साडे तीन वाजता ती आली होती, तर आज ठीक रात्री साडे तीन वाजता ती येईल, त्याच वेळेस मी अंगारा आणि माझ्या बाकीच्या तांत्रिकी वस्तूंसह तुझ्या घरी दाखील होईल. घराची एक किल्ली आता माझ्याकडे दे आणि तू घरी जा.. " हात पुढे करत बाबा रवीकडे पाहू लागले.. "रवी त्यावर होकार आर्थि मान हालवत" खिशातली किचैन मधील एक चावी वेगळी करून बाबा ला देऊ लागला आणि निशब्द तेथून निघून गेला..

 


रात्रीचे सर्व आटोपल्यानंतर आता रवी ला खूप भीती वाटत होती, कालच्या दिवशी झालेल्या प्रसंगा वरून रवी पूर्ण पणे हादरून गेला होता.. असंख्य प्रश्नांचे वादळ त्याचा मानांतर थैमान घालत होते. "काल घडलेल्या घटने नंतर रिया एकदम बाहेर पडली होती, जसे काही झालेच नसावे, तिचा असा बदललेला स्वभाव रवीने पहिल्यांदाच पहिला होता. "आज काही हि करून या सर्वांचा उलघडा करायलाचं हवा.." हात धुवत-धुवत तो मनात बोलू लागला.. " रात्री साडे तीन वाजता आज पुन्हा काही झालं, आणि बाबा आले नाहीत तर माझ काही खरं नाही.. आता सर्व बाबांच्या हातातच आहे... " तोंडावरून हात फिरवून तो पाण्याचे घोट घेऊ लागला. आता रात्री झोपायची वेळ झाली. "काय झालं तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसत आहात.. तुम्ही ठीक आहात ना...? " रिया ने रवीला मिठी मारत प्रश्न केला " छे. छे.. मी आणि टेन्शन मध्ये, नाही .. ते थोडं काम जास्त होत ना, म्हणून तसं वाटत असेल तुला, तू काही विचार नको करूस इतका, आता झोपून घे...!" रवी ला तिच्या मनात कोणता हि शंकेचा डोंगर उभारायचा नव्हता.. आता रिया पूर्ण पने झोपून गेली होती , भीती मुळे रवी ला काही झोप येत नव्हती, कधी डाव्या कुशीवर तर कधी उजव्या तर कधी पोटाशी नाहीतर पाठीशी तो झोप घ्यायचा प्रयत्न करत होता.. काही वेळाने त्याला हि झोप लागली..

 


रात्रीचे साडे तीन वाजले.. घड्याळाची टिक-टिक ने पूर्ण घर भर आवाज पसरला होता.. अचानक घरातील सर्व लायटी बंद-चालू होऊ लागल्या .. आणि एकदमच त्या बंद झाल्या.. अचानक रवीच्या अंगावरील चादर हळू-हळू खाली सरकू लागली, तो निवांत झोपला होता, त्याला जाग येणार इतक्यातच त्याचा डावा पाय जोरात खेचला गेला,  तो त्याच्या बेडवरून जोरात खाली पडला"आई .. कोण आहे sssss .. कोण आहे sssss.. " किंचाळून तो गुहार लावू लागला. पण तिथे कोणीच नव्हते, तो खूप घाबरून गेला त्याने अंधारामधील मंद प्रकाशात पाहिले कि रिया तिच्या जागेवर नव्हती. आता त्याला पूर्ण अंदाजा आला, कि रिया च्या अंगात पुन्हा तीच नकारात्मक आत्मा अली आहे, जी आता त्याचा जीव घ्यायला पण जास्त विचार करणार नाही.. दचकन उठून तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला पण दरवाजा पूर्ण जाम झाला होता.. तेव्हड्यात त्याच्या बाजूच्या दिशेला एक स्टील चा डब्बा हलण्याचा आवाज आला, त्याने तिथे पहिले तेव्हा तो डब्बा उडून त्याचा जवळ खूप गतीने येताना दिसला .. रवी तेथून हलणार तेव्हड्यात तो डब्बा रवी च्या छातीवर जाऊन जोरात आदळला. रवी त्या धक्क्याने जमिनीवर पडला.. "कोण आहे ssss ..? समोर येआssss .." जोरात तो किंचाळू लागला, तेव्हा एक कानाच्या पडद्याला भेदणारा आवाज पूर्ण घर भर पसरला. इतका कर्कश आवाज त्याने पहिला कधीच ऐकला नव्हता, त्या आवाजाने त्याच्या घरातील खिडक्या सर्व काचेची भांडी फुटली .. पायांच्या टाचा जमिनीला घासून तो एका कोपऱ्यात सरकू लागला. दोनीही पायांचे गुडघे दुमडून, पोटाजवळ घेऊन तो मान खाली घालून होता .. त्याच्या हृदयाचे ठोके त्याला साफ ऐकू येत होते. घामाघूम होऊन तो एका कोपऱ्यात काही स्वतःशीच पुटपुटत होता "बाबा कुठे राहिला आहात..? लवकर या नाही तर हि माझा जीव घेईल.. "तेवढ्यात बाहेरून कोणी आत यायचा आवाज आला .. इथे रवी आजून घाबरून गेला, त्याला वाटलं "आता आपण काही जगत नाही .. हि पिशाच आत्मा मला जिवंत सोडणार नाही.. " रवीने हळूच मान वर करून पहिले त्याला कोणीतरी असल्याचा भास झाला.. त्याचा समोर आता कोणी तरी उभे आहे असं जाणवलं , कदाचित बाबाच आले असा त्याचा समज होता, मान वर उंचावत तो हळूच पाहू लागला तर त्याला एका बाईचे पाय उलटे दिसले आणि तीच धड सरळ, हळू-हळू त्याने वर पहिले तर रियाचं पण विद्रुप अवस्थेत सापडली, विचित्र भाषेत काही बोलत ती त्याच्या जवळ येत होती. इथे रवी हनुमान चालीसा पुटपुटत स्वतः ला सावरत होता "भूत पिसाच निकट नहिं आवै, महाबीर जब नाम सुनावै , नासै रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा।।"आणि बाबा लवकर यावेत या अपेक्षेतच होता .. तेवढ्यात बेडरूम चा दरवाजा धडकन खुलण्याचा आवाज आला.. रवीने पाहिले बाबा आले आहेत, हातात एक माळ अन अंगारा फुकत ते काही  मंत्र जपत होते.. रवी ला आता थोडी हिम्मत आली, त्याच्या जीवात-जीव आला.. बाबा ने अंगारा फुकत पुढे म्हटले "कोण आहेस तू.. ? सांग तुला सोडून देईल नाही तर .. " पुन्हा तो कर्कश आवाज जोरात पूर्ण घर-भर पसरला, कानाचे पडदे फाटावे इतका तो तीक्ष्ण आवाज होता .. बाबाने पुन्हा तिच्यावर तो अंगारा फुकला "सांग नाही तर मी तुला मुक्त करणार नाही.. " त्याच्यावर रिया अचानक बाबाच्या एकदम समोर आली रवी आणि बाबा तिच्याकडे पाहत होते. रियाच्या अंगात नाकारात्मक आत्म्याने वश करून ठेवला होता.. रिया एक विकृत आणि विचित्र आवाजात बाबाला उत्तर देऊ लागली " ssss मारलंय मला .. याच घरात ssss मारलंय मला .. नाही सोडणार कोणालाही .. sss " किंचाळून ती बोलत होती "कोणी मारलं आहे तुला? आहेस कोण तू ?सांग नाही तर " ssss मी सुप्रिया... सुप्रिया आहे मी... विष देऊन मारलं मला.. प्रणाली ने मारलय मला ... आता मी या घरातील एक एक सदस्य ला जिवंत नाही सोडणार ssss " रवी पूर्ण पने दचकून गेला ..त्याचा समोर नक्की काय चाललंय हे त्याला समजत नव्हतं ... याचा अर्थ काश्मीर वरून आल्यानंतर तो जिच्या सोबत राहिला ती त्याची बायको रिया नव्हती ती प्रणाली होती...ओह्ह शीट...! पाठच सर्व आठवत तो फ्लॅशबॅक मध्ये गेला आणि त्याला आठवलं "रिया सकाळी लवकर उठून काम करण.. , माझा वाढदिवस लक्षात ठेऊन त्याला साजरा करण .., प्रणाली आणि आजीच्या मृत्यू नंतरहि असं राहन जसं काही घडले नसावे .., आणि शांत सरळ मोजकं बोलणारी रियाचं इतकं जास्त, चपळ, आणि मस्तीखोर रित्या बोलणे हे रियाच्या स्वभावात नव्हतं कारण रिया हि खूप शांत सरळ , समजूतदार होती.. "म्हणजे हि प्रणाली आहे जिच्या सोबत मी राहीलो .. माझ्या रिया ला प्रणाली ने मारलं .. रडत रडत तो स्वतःशीच बोलत होता .. बाबांनी त्या आत्म्याला म्हटले "तू इथून निघून जा.. रवी ला आणि त्यांच्या घरातल्यांना त्रास देऊ नको .. " म्हणत त्यांनी त्यांच्या झोळीतील एक बंद अंगारा काढला आणि तो तिच्या चेहऱ्याजवळ फुकला " नाही ... ssss नाही ...ssss " खूप जोरात किंचाळी देत ती आवाज करू लागली पूर्ण घरात वादळ आलं असावं असे सर्व पडदे आणि घरातील भांडी, टेबल, वस्तू हलू लागल्या.अचानक प्रणाली खाली पडली .. आणि घरातील सर्व लाईट चालू झाली घरातील वादळ हि थंडावले आणि तो आवाज हि नाहीसा झाला.

 


रवीच्या असंख्य प्रश्नांच्या लाटांना त्यांचा किनारा मिळाला होता .. त्याला प्रणाली बद्दल अतिशय राग, द्वेष निर्माण झाला होता .. त्याशिवाय त्याला जास्त दुःख तिच्या बायको रिया बद्दल होतं. तिच्या करीता तो रडू लागला होता .. प्रणाली ला त्याने म्हटलं "का केल ...? काय केलेलं माझ्या रिया ने तुझं ..? का तिला मारून टाकलंस तू ..? काही हवं होत तर मागून घ्याच ना माज्याकडून पण, जीव का घेतलास माझ्या रिया चा ...?" रडत-रडत तो प्रणाली ला प्रश्न करू लागला "माफ करा मला.. चुकली मी .. " प्रणाली  रवी ला पुढे सांगते .. "प्रत्येक गोष्टी मध्ये तिला पुढाकार भेटत असे, मी तिची मोठी बहीण असून सुद्धा मला तितकं मिळालं नव्हते जितकी मी लायक होते ..लहान पणा पासून तिचेच लाड करण्यात आले .. काही हवं असेल-नसेल तरी तिलाच पुरवण्यात आले आणि मला उरलेलं-सुरलेलं भेटत, तिच्या नंतर मला विचारलं जात, कंटाळले मी तिला, राग भरलेला माझ्या मनात..लग्ना नंतर हि तिच आयुष्य इतकं चांगलं चालेल पाहता मला ते बगावंल नाही , मला  तिच्यावर राग होता, तिला मला नीचा दाखवायचा होता .. आणि मी रागाच्या भारात तिचा जीवघेणे षडयंत्र रचला,  पुढे प्रणाली रवी ला सांगते ... त्या दिवशी .. मीचं रिया ला फोन केला होता ...

 

प्रणाली : रिया .. कशी आहेस तू .. ??

सुप्रिया : ताई.. मी मस्त आहे तू कशी आहेस ??

प्रणाली : मी पण आहे बरीच.. पण तू लग्न झाल्या पासून इथे आलीच नाहीस भेटायला आम्हाला.

सुप्रिया : हो वेळचं नाही भेटत .. आणि यांच पण बाहेर येन-जाण चालूच असतं, तर त्यामुळे वेळचं नाही भेटत.

प्रणाली : तुला वेळ नसला तरी काय झालं , मी वेळ काढून येते बर का.. चालेल ना ??

सुप्रिया : ताई तूझंच घर आहे, केव्हाही ये ..

 


मला समजले तुम्ही बाहेर गेला आहात, आणि ती आजी सोबत घरी एकटीच आहे.. तर यापेक्षा चांगला क्षण मला भेटणे नव्हता.. एका काचेच्या बाटली मध्ये विष घेऊन ठेवलं होत मी माझ्याच बॅगेत आधीच. फक्त सुप्रियाला ते विष पाजून कायमच मिटवून टाकायचं आणि तुमचा सोबत तुमची रिया म्हणून मी राहायचं , याच्या पेक्षा चांगला प्लॅन मला कोणताच सुचला नव्हता .. ठरलेल्या प्लॅन नुसार मी तुमच्या घरी पोहोचले .. आणि ...

 

रिया च्या घरी ...

 

"आहे का कोणी?" प्रणाली दरवाजा ठोठावत आत आवाज देत होती. हातात सिंगल हँडेड बॅग, डोळ्यावर काळ्या रंगाचा चष्मा आणि गुलाबी पटियाला ड्रेस मध्ये प्रणाली बाहेर दरवाजा पलीकडे उभी आहे, हे रिया ने आतल्या दरवाजाच्या 'पीपहोल' मधून पाहिले.. "येणा ताई आत.. खूप उशीर केलास ..?" रिया ने दरवाजा उघडून, प्राणाली ला आत यायचा इशारा करत विचारले. "हो ... खूप ट्राफिक होता रोड वर, त्यामुळे यायला थोडा उशीर झाला.. , "बर तू बस, मी स्वयंपाकाला लागते आणि काही छानसं बनवते जेवूनच जा तू.. रिया किचन मध्ये जात असताना प्रणाली सोबत बोलत होती .. "आज तू अराम कर मी जेवण बनवते. आज माझ्या हातच खायचं.. आता नाय बोलू नकोस तुझ्या मोठ्या बहिणीचं एवढं तरी ऐक .. " तिच्या अट्टाहासाला रिया नाही बोलू शकली नाही "ठीक आहे ताई .. बनव तूच .." आज्जी सुद्धा या दोघांच्या संभाषणा मध्ये काही काही बोलत होती .. "जेवण बनवून झाल्या नंतर तिने 'तीन' ताट वाढले, तिच्या साठी आणि आजी रिया साठी .. रिया साठी जे ताठ तिने तयार केलेलं तिने त्यावर तिच्या आणलेल्या काचेच्या बाटलीचे विश पूर्ण ओतले, काचेच्या बाटलीला तिने हातरुमालाने पकडले होते .. तेव्हड्यात मागून कोणी तरी आल्याची चाहूल झाली .. "काय आहे तुझ्या हातात बाय.. " तिथे आजी ने तिला ते करताना रंगे हात पकडलं होत .. "ssss कायsss .. काही तर नाहीये ... ssss " तत-फफ होत ति आजीला खोटं बोलू लागली .." तुझ्या हातात काचेची बाटली कसली हाय, सांग आधी तू त्या ताटात काय ओतलंयस.. खर सांग .. ??" आजी चा आवाज, आता आधी पेक्षा थोडा जास्त वाढला. ठरलेला प्लॅन फिस्कटू नये, त्यामुळे प्रणालीने जिथे उभी होती तिथल्या शेगडी जवळ चा चाकू उचलला आणि आजीला आत खेचत स्वतः जवळ ओढले आणि तिच्या पोटाजवळ चाकू ठेऊन तिला बोलली "हे बग म्हातारे... तू जे पाहिलं आहेस ते जर का तू कोणालाही, कुठे हि सांगितलंस तर याद राख... तुझ्या आतड्या खाली पाडायला मला वेळ नाही लागणार" चाकू चा दाब चटकन आणि थोडा गतिमान असल्याने चाकूची बारीक तिखट टोक आजीच्या पोटात आधीच घुसली होती आणि तिथून रक्त येत होत.. "आता मुकाट्याने गप राह्यचं .. आणि जे होत आहे त्याला गपचूप बगायचं..समजलं?? " अचानक कोणी तरी किचन मध्ये येत आहे असं जाणवलं, ती रिया होती आजीला झटकन तीन स्वतःच्या मागे सारून चाकू शेगडी जवळ जशास तसा लपवून ठेवला.

 


आजी ला समजून चुकले होते हि प्रणाली काही जीवघेणे अपराध करण्याच्या मार्गावर आहे .. पण परिस्थिती अशी कि सर्व माहिती असताना देखील, काही करता हि येत नव्हतं .. "आजीला जास्त काही माहिती नसल्याने आणि घाबरल्या मुळे गप बसावं लागले .. तिचे पूर्ण हात-पाय थर-थर कापत होते .. शिवाय त्या एक मधुमेह आणि जुन्या अल्पशा आजाराने त्रस्त होते .. "चला... जेऊन घ्या .. रिया .. माझ्या हातचं आहे, जेवून बग एकदा.. मलाच बोलवशील रोज जेवण बनवायला .. " ताट रिया जवळ सरकवत ती बोलत होती .. "हो का ताई .. जर असं असेल आणि मला जर जेवण खरचं आवडले ना, तर नक्कीच तुला बनवावं लागेल बग..? थोडी मस्करी करत रिया ने उत्तर दिले .. सर्वांनी आता जेवण चालू केले. इथे आजीच्या घशात एक घास जायेनासा झालेला .. तिरक्या नजरेने प्रणाली ने आजीला पहिले आणि गपचूप जेवण्याचा इशारा केला. आजीने तो इशारा समजून गप खायला सुरुवात केली .. हे माहिती असून सुद्धा कि सुप्रिया ने जर हे खाल्लं तर ती मरू शकते "ती काहीच करू शतक नव्हती .. रिया ने जेवायला सुरुवात केली .. एक घास .. दोन घास .. तीन घास .. करत ती जेऊ लागली पण चौथ्या घशेला तिला थोडा ठसका लागला ... "पाणी ... पाणी .. तिथलं .. ssss " पाण्याच्या ग्लास कडे बोट दाखवत तिने एक हात गळ्याला लावला होता .. आजीने पाणी द्यायला ग्लास धरला पण, तेवढ्यात "आजीच्या हातावर लाथ मारून  सुप्रियाने पाण्याचा तो ग्लास तिथल्या भिंतीवर आपटला आणि पाणी सर्व खाली सांडले .. रियाने जेवणाच्या ताटाला धक्का मारला तिथेच पालथी झाली. तिचे अंग पूर्ण थरथरु लागले .. "माझी पोर .. काय केलंयस तू  तिला वाचव ...sssss " प्रणाली चे पाय पकडत आजीने तिला रियाच्या जीवाची भीक मागितली .. रिया तिथेच तडपडत होती. तोंडातून तिच्या फेस यायला चालू झालेला .. डोळे पांढरे पडू लागले .. "मी बोललेले ना तुला , माझ्या हातच खाशील तर मला रोज बोलवशील .. " लहानपणा पासून तुझ्या मुळे, फक्त तुझ्याच मुळे मला कमी लेखण्यात आले .. तुझ्या पेक्षा मोठी असून हि मला तुच्छ वागणूक मिळत अली .. का ...??? आहे उत्तर तुझ्या कडे.. बोल .. म्हणून मी तुला संपवून, तुझ्याच नवऱ्यासोबत तू आहेस असं दाखून राहायचा षडयंत्र रचला आहे ... आता तू कायमची संपून जा... तू काही काजळी करू नकोस "लोकांना असं वाटणार कि, तू नाही मी 'प्रणाली' ने आत्महत्या केली आहे "  आणि हमेशा साठी तुझा किस्सा खतम ... प्रणाली खूप रागात जोर-जोरात ओरडून रिया ला बोलत होती .. रिया तडपड करण आता बंद झाले .. तिची हालचाल पूर्णतः शांत झाली .. प्रणाली आजीचा गळा दाबत पुढे बोलू लागली "हे बग म्हातारे, आता मी सांगते तसेच करायचं, नाही तर हिला जशी झोपवली आहे तशी तुला झोपवयला मला वेळ नाही लागणार .. " आवळलेला आजीचा गळा सोडता आजी खोकू लागली, भीती च्या आवेशात आजीने तिला होकारअर्थी मान हलवत उत्तर दिले .. "तिच्या अंगावरील सर्व कपडे काढ, तिचे कपडे मला आणि माझे कपडे तिला घाल .. तिच्या अंगावरील सर्व दागिने माझ्या दागिन्यांशी बदल .. आणि हो तिथला एक पेपर-पेन आन माझ्या साठी , त्यावर काही लिहायचं आहे मला .." प्रणाली आजीला ओरडून बोलत होती .. प्रणाली ने सर्व कपडे आणि दागिने हे रिया च्या दागिण्या आणि कपड्यांसह बदलून टाकले..हातात हॅन्ड ग्लोव्हस घालून, तिने एका कोऱ्या पेपरावर पेनाने लिहायला घेतले .. "मी 'प्रणाली' माझ्या जीवनातील घडणाऱ्या खूप अश्या नैतिक-अनैतिक घटनांना आता कंटाळले आहे , मी माझ्या आयुष्याला वैतागून हा निर्णय घेत आहे त्यामुळे, कोणीही काही गैरसमज करून घेऊ नका. आई बाबा मी तुम्हाला खूप मिस करेल .. मी घेतलेल्या निर्णयाला तुम्ही कधी माफ करू शकणार नाही हे मला अवगत असून सुद्धा, परिस्थिती मला हे करण्यास भाग पाडत आहे .. तुमची "प्रणाली" ... टररsss  कन पेपर वहीमधून फाडून तिने पेनाला सुप्रियाचे फिंगर प्रिंट्स लावले आणि कागदाचा गोळा करून तिच्याच डाव्या हातात ठेवला, किचन मध्ये ठेवलेली खाली विषाची बॉटल तिने थोडी आपटून तोडली आणि रिया च्या उजव्या हातात सुप्रियाच्याच फिंगर प्रिंटसह ठेवली.. मृत शरीर बाथरूम मध्ये ठेवून प्रणाली आजी ला पुढे बोलू लागली .. "म्हातारे .. आता तू आणि मी असं वागायचं आहे जस मी म्हणजे  "प्रणाली" ने स्वतःला बाथरूम मध्ये बंद केलं आहे .. आणि बरोबर साडे तीन वाजता उठून आपण हा दरवाजा उघडायचा नाटक करायच आणि नंतर तोडायचा प्रयन्त करायचा .. आणि आत मध्ये काय आहे हे तुला आणि मला चांगलंच माहिती आहे पन, आपल्याला असं दाखवायचं आहे कि "प्रणाली" बाथरूम मध्ये बेशुद्ध पडली आहे आणि नंतर मी आई बाबांना माझ्या फोन वरून घडलेलं कारस्थान सांगणार .. पुढचं सर्व आपोआप होईल .. आणि जर का तू काही चित्र-विचित्र करण्याचा प्रयत्न जरी केलास ना , तुझी अर्धी लाकडं आधीच मसनात आहेत त्याला पूर्ण करायला मी विचारहि नाही करनार " घाबरून आजीने ते सर्व ऐकलं जे प्रणाली ने तिला करायला सांगितले.  .

 

आणि नंतर काय झाले तुम्हाला माहिती आहे .., मी खुनी आहे .. माझ्या हातून माझ्या सख्या निष्पाप बहिणीचा खून झाला आहे .. मला फाशी द्या .. मला आता जगायचं नाही .. "किंचाळत-किंचाळत ती रवी ला बोलत होती.  हे सर्व ऐकल्या नंतर रवी खूप डिप्रेशन मध्ये गेला, जिच्यावर त्याने मनापासून प्रेम केलं तिची हत्या तिच्याच सख्या बहिणीने  केली पाहता, त्याचे डोळे पाणावले .. आता रिया ला न्याय मिळवून द्यायचा..., बस हेच एक त्याच ध्येय राहील होत .. उजव्या हाताने डोळ्यातील अश्रू पुसत त्याने हातात मोबाइल घेतला आणि शंभर नंबर डायल केला, घडलेली घटना पूर्ण सांगून त्याने घटनास्थळी येण्यास पोलिसांना आग्रह केला .. शिवाय त्याने रियाच्या आई-बाबांना बोलाऊन घेतले . पोलीस अधिकारी आणि आई-बाबा अर्ध्या तासातच घरी पोहोचले होते .. घटना समजता  आई ने प्रणाली च्या खाड कन कानाखाली मारली, बाबांनी आई ला सांभाळत धरून ठेवलं, रडत-रडत ती बोलू लागली "का केलास ..? का वागलीस स्वतःच्याचं  बहिणीशी तू असं .. ? काय कमी पाडले मी तुला ..? बहीण होतीस तू तिची ..! रडत-रडत ती गुडघ्यावर खाली बसली, तिथे  प्रणाली रडून पश्चाताप करू लागली ."साहेब .. प्लिज ह्या गुन्हेगाराला आमच्या डोळ्या समोरून घेऊन जावा.. "रवी पोलिसांकडे हात जोडून बोलू लागला .. लेडीस पोलिसांनी तिला बेड्या घातल्या आणि बिल्डिंग खाली उभ्या असेलेल्या त्यांचा गाडीतून तिला घेऊन गेले ..

 


रवी ने आणि रिया च्या आई वडलांनी कधी विचार हि केला नसेल अशी घटना झाली होती .. त्यांचा पायाखालील जमीन सरकावी अशे ते चित्र होते. दुःख, त्रास पचता पचण्याजोगे नव्हते . शिवाय घरातल्याच सख्या बहिणीने हे कृत्य केले पाहून, त्यांचा कंठ दाटून आला .. आई-बाबांना सांभाळत रवी तिथल्या घरून निघून गेला. घटना पण होऊन निघून गेली पण याची जाणीव त्यांना आयुष्यभर राहणार हे तर नक्कीच होत.

 

*-*-*-*-*- समाप्त *-*-*-*-*-

 

घडलेली घटना पूर्णतः काल्पनिक आहे , कथे मधील वक्ते आणि त्यांची नावे हे काल्पनिकदृष्ट्या योजण्यात आलेली आहेत, तरीही कोणीही घटनेला वैयक्तिक गोष्टींशी जुळवू नये.

 

आपली समीक्षा आणि निवेदन मला नक्कीच वाचायला आवडेल.

 

आपला ,

समिर चंदनशिवे

Post a Comment

0 Comments