पाऊलवाटा


वर्तमान काळात:

 


रुग्णालयामध्ये 'आय सी यु' वॉर्ड, १०२ बेड वर ' सी जि' मशीन च्या 'आढव्या-तिरप्या' लाईनी पाहत, तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून मी बेड वरती, अंगावर सफेद चादर घेऊन पडून होतो. पापण्या उघडत हलक्या नजरेने पाहता मी, माझ्या 'अवती-भवती' माझे आई-बाबा आणि माझे काही मित्र-मैत्रिणी पाहिल्या. माझा डावा हात माझ्या पोटावर, सलाईन इंजेकशन लागून पडलेला होता, तर उजवा हात श्रुतिकाच्या हातात होता. माझ्या हातावरुन प्रेमाने हात फिरवत ती माझ्याकडे एकटक अगदी आपुलकीने आणि प्रेमाने, डोळ्यात पाणी आणतं बगत होती. तिच्या चेहऱ्यावरचे तेज आणि प्रेम पाहून मी पूर्ण गहिवरून जाता, माझे डोळे देखील पाणावले, सर्वांच्या चेहऱ्यावरील हावभाव हे गंभीर आणि काळजीवाने होते. पण एवढा मोठा अपघात होऊनही, आपण जिवंत आहोत आणि आपलं प्रेम आपल्या सोबत आहे याची ख़ुशी हमखास मनात होतीच.

 

काही दिवसांपूर्वी:

 

प्रत्येक वर्षी, चुकता एक तरी बाहेर फिरायला जायचा प्लॅन आमच्या ग्रुपचा ठरलेलाच असतो म्हणा. "मी, सुरेश, शेरा, उत्तम, राहुल, शिवानी, काजल आणि कावेरी" अशी आमची जणांची गॅंग. कॉलेज मध्ये पहिल्या वर्षापासून ते आत्तापर्यंत आमचे बोटावर मोजता येणारे बक्कळ अशे फिरण्याचे प्लॅन झाले असतील. त्यातील निम्म्याहून जास्तीतर कॅन्सल झाले ती गोष्ट वेगळी आहे पण बहुतेक अशे प्लॅन सक्सेसफुल झाले यात काही तिळमात्र शंका नाही. मागच्या वर्षी काही कारणांनी प्लॅन करता आला नव्हता पण, या वर्षी कुठे तरी जायचा प्लॅन करावा अशी ईच्चा पूर्ण ग्रुपची आणि स्पेशली म्हटलं तर माझी पण होती. राहुलने सर्वांना कॉन्फरेन्स-कॉल केला आणि त्यात मला सुद्धा सामील केले. ऑफिस मधून घरी येत असताना मला त्याचा कॉल आला. माझी गाडी साईड ला लावून मी राहुलचा फोन उचलला



 "अरे भावा...! खूप टाइम झाला आहे आपण कुठे गेलो नाहीत फिरायला, तर यावेळी आपण जाऊया काही प्लॅन कर ना"

 

  राहुल आणि त्याचा सोबत कॉलवर असलेले सर्व त्याचा मागे हो-हो चा जप करत होते. प्रत्येक प्लॅन मध्ये मी म्हणजे 'प्रमुख पावना' असायचो. कारण प्रत्येक ठिकाणाचं अगदी अचूक मूल्यमापन आणि त्याची पूर्ण माहिती माझ्याकडे असायची याची त्यांना चांगलीच कल्पना होती, म्हणून मला या वर्षीहि काही प्लॅन करावा लागेल हे मला माहिती होतं. ठरल्या प्रमाणे ट्रॅकिंगला जाणे आम्ही निवडले कारण याआधी आमच्यापैकी कोणीहि ट्रॅकिंग केली नव्हती, आणि मला सुद्धा खूप ईच्च होती कि, आपण एकावेळेस तरी ट्रॅकिंग करावी.

 


माझ्या संशोधना प्रमाणे मी "वासोटा" किल्ल्याची निवड केली ते सर्वांना पटण्यासारखे पण होते कारण, वासोटा किल्ला हा नैसर्गिक दुर्गमता लाभलेला किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत् आहे, कोयना नदी करीता बांधण्यात आलेल्या धरणातून निर्माण होणाऱ्या जलाशयाला तेथील स्थायिक 'शिवसागर' म्हणत, हा

शिवसागर याच वासोटा किल्ल्याचा पायथ्याशी लागून होता. अश्या सुंदर, दुर्मिळ आणि ऐतिहासिक किल्ल्यावर ट्रॅकिंग करायला खूप मज्जा येणार यात काही खोटेपणा नव्हता. सांगितल्या प्रमाणे माझी बाकीची मंडळी पण माझ्या हा मध्ये हा मिळवून मला प्रतिसाद देऊ लागली.

 

ठरल्या प्रमाणे, आम्ही ट्रेन ने प्रवास करायचा ठरवले. सकाळी सु. :२५ ची आमची "माओ जाण एसएचटी स्पेशल" नावाची ट्रेन दादर स्टेशन वरून ठाणे, पनवेल आणि चिपळूण मार्गे जाऊन पूर्ण चार-सव्वाचार तासाचा प्रवस करून चिपळूण या स्थानकावर पोहोचणार होती, तेथून पुढील प्रवास हा थोडा पायी आणि थोडा रिक्षाने होता. आधल्या रात्री मला काजल ने फोन केला आणि म्हटली...

 

"अरे ऐक ना... माझी एक मैत्रीण आहे श्रुतिका, तिला पण आपल्या सोबत यायची खूप इच्छा होती, प्लीस तिला घेऊन जाऊया का...?"

 

 तिच्या विनंती नंतर मी तिला नाही बोलू शकलो नाही कारण, सुचल्या प्रमाणे प्लॅन तसाच होईल असं कधीच नसत हे मला माहिती होत आणि जर कोणी आपल्यासोबत येत असेल तर काय वाईट..., म्हणून मी तिला हो म्हटलं.

 

सकाळचे :०० वाजले होते, आयुष्यात पहिल्यांदाच मी एवढ्या लवकर उठलो असावो, कारण या आधी कधीही मी जास्तीत-जास्त च्या आधी उठलो नव्हतोच.  मी बाकीचे सर्व जण आता स्टेशन वर येऊन जमलो होतो, मात्र काजल ची अनुपस्थिती आम्हाला चिंताजनक वाटली, काजल तिच्या मैत्रिणी सोबत मागून येत होती. आता खूप वेळ पण होत चाललेला होता, त्यामुळे काजलला फोन लावून तिची विचारपूस करण्यात अली 

" मिनिटं थांब ना...! मी पोहोचत आले..." दम लागत, मोठे श्वास घेत ती फोनवर बोलत होती.


 इथे आमच्या सर्वांना ट्रेन चुकणार तर नाही...? याची भीती आतून खात होती, मी मान वाळवून मागे पहिले तर घड्याळात :२० झाले होते आणि ट्रेन आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊन कधीची थांबली होती. तेवढ्यात काजल येत असताना दिसली. धापा टाकत धाव घेत ती आमच्या दिशेने येत होती. तिचा एक हात तिच्या खांद्यावरील बॅग सांभाळत तर दुसरा हात तिच्या मैत्रिणीच्या हातात होता. काजलच्या बाजूला तिच्या मैत्रिणीकडे माझी नजर गेली. ती सुद्धा तिच्या सोबत धावत आमच्या कडे येऊ लागली. मी काजलला काही भडकून बोलणार, तेवढ्यात माझी नजर 'श्रुतिका' कडे गेली. अतिशय शांत स्वभावाची गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला असून, चेहरा रेखीव रंग गोरा, डोळे घरे वर त्यावर काळसर लांब भुवया, कपाळावर लहानशी नक्षी टिकली, ओठांवर उजव्या बाजूला असलेला छोटा तीळ ते सुरेख नाक, आणि त्यावरील तिची ती नथ हे तिच्या सौंदर्याचा खुलासा करत होती. तिची एक झलक पाहताच माझं हृदय 'धड-धड' करू लागलं होतं.  तिच्या डोळ्यामधे मी इतका गुंग झालो कि, कधी :२५ झाले मला समजलेच नाही. तेवढ्यात राहुल ने आवाज दिला "अरे आता ट्रेन सुटायचा वेळ झालाय...! लवकर चला नाहीतर आपली ट्रेन हुकेल..."

 तेवढ्यात ट्रेन ने शेवटचा हॉर्न दिला आणि ती हळू-हळू पुढच्या दिशेने सरकु लागली, कस-बस आम्ही सर्व ट्रेन मध्ये चढलो आणि बसण्यासाठी जागा शोधायला धागधुग करू लागलो. ट्रेनमध्ये खूप गर्दी असल्यामुळे, एका तसा पेक्षा जास्तीचा प्रवास आम्ही उभ्यानेच गाठला. नंतर हळू-हळू जागा झाल्याने आम्ही सर्वांनी बसून घेतले. मी उत्तम आणि राहुल वरील सीटवर जाऊन बसलो आणि बाकीचे सर्व खालच्या सीटवर बसून गप्पा-गोष्टी मांडण्यात व्यस्त झाले. काजल आणि श्रुतिका माझ्या खालील समोरील सीटवर बसलेले मला एकदम थेट स्पष्ट दिसत होते. श्रुतिका ला पाहता मला तिच्याकडून नजर वळवू वाटत नव्हती, तीच बोलणं, तीच हसणं याच मी खूप बारकाईने निरीक्षण करत आपल्या स्वप्नांच्या गाडीत प्रवास करत चाललो होतो. बोलता-बोलता तिची सुद्धा नजर मला येऊन भिडली, जणू तिच्या नजरेत काही औरच जादू होती. ती एक नजर मला बगत आणि नंतर लगेच दुसरी कडे बगन्याचं नाटक करत. तीच असं कारण मला तिच्याबद्दल खूप आकर्षित करु लागलं होत. एवढ्यात बाजूने एक आवाज आला "चणा डाळ, मूग डाळ, शेंगदाणे...!" मी पहिले तर एक विक्रेता आमच्या दिशेने येत होता. सर्वांनी काही काही खाण्यास घेतले पण श्रुतिकाला हे सर्व आवडत नव्हतं म्हणून तिने काही घेतले नसावे असा माझा समज होता,

 

काय झालं श्रुतिका..., तुला आवडत नाही का हे सर्व" तिच्या नजरेला नजर भिडवून तिला मी प्रश्न केल,

 "तसं काही नाही..., पण मला प्रवासात काही खायला आवडत नाही" अगदी हळू आवाजात नम्रतेने तिने उत्तर दिले.

 

 


खिडकीच्या बाजूला बसलेली असल्यामुळे श्रुतिकाचे ते हवेत उडणारे केस आणि ती केसं सावरताना ती खूपच सुंदर दिसत होती. आता श्रुतिका पण ट्रेनच्या प्रवासात आमच्या सोबत खूप हसू-बोलू लागली होती. आधी नर्वस, लाजाळू असणारी श्रुतिका आता माझ्यासोबतहि मस्करी आणि चांगली बातचीत करू लागली होती. तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ती ग्रुपमधील नवीन सदस्य नासता खूप वर्षापासूनची जिवलग असल्यासारखी सर्वांना वाटू लागली होती. काही वेळा नंतर आता चिपळूण स्टेशन येणार होतं, म्हणून आम्ही सर्व जण आता आप-आपली बॅग घेऊन उतरण्या साठी गेट जवळ येऊन उभे राहिलो. श्रुतिकाची बॅग खूप जड होती त्यामुळे ती मीच पडली होती, आता आम्ही उतरण्याच्या घाईत होतो. ट्रेन जशी स्टेशनला पोहोचली तेवढ्यातच बहरून आतमध्ये येणाऱ्या प्रवाशांची संख्या काही जास्तच झाली. कशे-बशे आम्ही धक्का-बुक्की करत खाली उतरलो, आणि सर्व जण आहेतका हे पाहू लागलो तेवढ्यात काजल म्हटली...,

"आरे श्रुतिका तर आतंच राहिली आहे...!" हे ऐकताच मी ट्रेनकडे पहिले, तर ट्रेन आता चालू झाली होती. मी काहीच विचार करता खांद्यावरील बॅग खाली टाकून, चालत्या ट्रेनला धावून पटकन पकडले आणि आत घुसलो. आत येताच मी श्रुतिकाला शोधू लागलो. एका कोपऱ्यात ती मला अस्स्वस्त दिसली.

 

तिचा मी हात पडकला आणि म्हटलंआग तू उतरली का नाहीस...?"

त्यावर ती म्हटली कि "मला उतरताच आलं नाही..., गर्दीतून एका माणसाने मला आतमद्धे ढकललं त्यामुळे मी आत आले त्यानंतर इतकी गर्दी जमली कि मला उतरण्याची संधीच भेटली नाही."

काजलचा फोन आला तिला आम्ही परत येत आहोत याची माहिती दिली. मागची ट्रेन पकडून आम्ही परत आलो, आणि सर्वजण मिळून आता आमच्या ठरलेल्या प्लॅनकडे अतिशय उत्साहाने वळलो.

 

श्रुतिकाचं बोलणं, हसनं, वागणं आणि तिचा मनमिळाऊ स्वभाव मला इतपत आवडला होता, कि तिला आपलंस करावं...! अशीच माझी ईच्च होती, मला आता ती हवी-हवीशी वाटू लागली होती, या प्रवासाने मला माझी जीवनसाथी दिली असावी असं झालं. आता वेळ होती तर फक्त आपल्या मनातील भावना तिच्या समोर मांडण्याची. आम्ही किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो माझे सर्व मित्र-मंडळी पुढे, मी आणि श्रुतिका मागे अशी आमची रांग होती. आम्ही दोघेहि एक-दुसर्यांसोबत गप्पा-गोष्टी करत चालू लागलो.  माझा बदललेला स्वभाव आणि श्रुतिका सोबत घालवलेला एकांत वेळ पाहून कदाचित, माझ्या मित्रांना सुद्दा माझ्यावरती संशय आला असावा यात काही विचार काण्याची गोष्ट नव्हतीच. आता आम्ही रिक्षा स्टॅन्डवर पोहोचलो, यापुढे प्रवास हा रिक्षाने होणार होता.

"तुम्ही थांबा मी आलोच" म्हणून मी तीतून दोन मिनिटांसाठी सर्वांची रजा घेतली. मागील खुल्या असलेल्या मेडिकल स्टोर मधून मी एक चॉकलेट श्रुतिका साठी घेतले. कारण तिच्यासोबत बोलून मला हे कळाले होते कि, तिला चॉकलेट खूप आवडतात. आता आम्ही रिक्षा पकडून किल्ल्या जवळ किमान तासाचा प्रवास करून पोहोचलो होतो.

अतिशय सुंदर, निसर्गरम्य हा किल्ला होता. पाऊस नुकतीच येऊन गेल्यामुळे वातावरन एकदम थंडावलेलं होत. किल्ल्यावरील हिरवळता पूर्ण पने डोंगरावर पसरली होती. आम्ही सर्व हा निसर्गाचा नजरा पाहून हरपून गेलो, आमच्या पाऊलवाटा आता किल्ल्यावर जाण्यासाठी वळल्या. हळू-हळू करत आम्ही किल्ल्याच्या मध्यभागी पोहोचलो. मी आणि श्रुतिका, सोबत एक दुसर्यांचा हात पडकून चालत येत होतो.


 "तुला चॉकलेट खूप आवडतात ना" बोलता-बोलता अचानक तिला मी विचारले त्यावर ती "हो ना खूप...!" अलगद मागील पॉकेट मध्ये ठेवलेली चॉकलेट मी तिच्या हातावर ठेवली. ती खूप खुश झाली तिचा असा आनंदी चेहरा पाहून मला सुद्धा खूप बरे वाटले. श्रुतिकाला आपल्या मनातली भावना सांगायचा, हा खूप चांगला वेळ होता, आणि वेळ घालवता तिला मी म्हटलो

"श्रुतिका मला तुला काही सांगायचे आहे"

त्यावर श्रुतिका "हो बोल ना, काय झाले काय सांगायचे आहे तुला...?" भुवया उंचावर मान वर करून ती प्रश्न करू लागली.

" खरतर श्रुतिका, तुझ्यासोबत घालवलेला वेळ मी कधी विसरू शकणार नाहि. मी आज पर्यंत असं कधीच फील केलं नाही जे मी तुझ्या सोबत राहून फील केलं आहे, तुला समजतय ना मी काय म्हणायचा प्रयत्न करत आहे...?" मनातल्या मनात लाजत मी तिला गुंतवून सांगण्याचा प्रयत्न करत होतो.

 

माझ्या चेहऱ्यावरील हावभाव तिला साफ-साफ दिसत होते.

तरी सुद्धा समजल्या सारखे दाखवून मला तिने पुन्हा प्रश्न केला

 

"काय नक्की...? मला काहीच समजत नाहीये तू काय म्हणत आहेस, स्पष्ट बोल ना...!"

 

खरतर आता मला समजले होते कि श्रुतिकाला माझ्या तोंडूनच ऐक्यच आहे.

डोळे मिटून दीर्घ श्वास घेऊन मी...

 


"
श्रुतिका... मला तू खूप आवडू लागली आहेस, तुला पहिल्यांदा बगूनच मी तुझ्या प्रेमात पडलो...!, मला हाच सहवास आणि हीच साथ तुझी आयुष्यभर हवी आहे देशील का...?"  डोळ्यात हलके पाणी येत, आणि शब्द खूप उद्देशाने म्हणत मी तिच्या नजरेत पाहून बोलू लागलो.

 

श्रुतिका हे ऐकून खूप शांत झाली. तिचे बोलणे दोन-अडीच मिनिटांसाठी शांत झाले, तिच्या डोळ्यात असलेले प्रेम मी साफ-साफ पहिले होते.

श्रुतिका बोलली "मी तुला याच उत्तर, आपण जेव्हा किल्ल्याच्या वरती पोहोचूना तेव्हा देईल, चालेल ना तुला...? अतीशय नम्रपणे तिने उत्तर दिले.

आता आम्ही बोलता-बोलता खूप मागे राहून गेलो होतो आणि आमची बाकीची मित्र-मंडळी आमच्या पासून खूप पुढे पोहोचले होते. आम्ही दोघांनी वेग धरला आणि पटकन त्यांचा जवळ जाऊन त्यांच्यासोबत चालण्याचा विचार केला. आम्ही सर्व आता ट्रॅकिंग करत, एक-दुसऱ्यांची मस्करी करतं आणि गप्पा-गोष्टी करत तो पूर्ण क्षण आनंदात घालवत होतो. आता माझी बाकीची मंडळी पण मला आणि श्रुतिकाला चिडवू लागली होती. श्रुतिका खूप शांत आणि लाजाळू प्रकारची मुलगी होती, त्यामुळे त्यांनी केलेल्या मस्करीला ती खुप लाजत आणि एका-एकी माझ्याकडे हळुवार हसून पाहत. तीच असं बघन मला खूप आवडू लागले होते त्यासोबतंच मी आतून माझ्या विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांची वाट पाहत होतो. कधी एकदाचं वरती पोहोचतोय आणि कधी मला माझं उत्तर सापडतंय असं झालं होत. दोन तासांच्या मेहनती नंतर आम्ही शेवटी किल्ल्याच्या शिखरावर पोहोचलो होतो. पाऊस पडल्यामुळे तेथील पाऊलवाटा चिखलाने भरलेल्या होत्या. मध्यांतरी सुरेश आणि उत्तम घसरून पडले सुद्धा. मी आणि श्रुतिका एक-मेकांचा हात पडकून होतो आणि ते भव्य निसर्ग पाहत त्याचा आनंद घेत होतो. आम्ही सर्वजण आता वरती पोहोचलो होतो, त्यामुळे सर्वांनी फोटो-विडिओ वगेरे काढले. थोडंस त्यांच्या पासून लांब करत मी श्रुतिकाला घेऊन साईडला आलो. वरील एका कॉर्नरला जाऊन मी आणि श्रुतिका थांबलो होतो

 


 "
श्रुतिका... तु माझी उत्तरे दिली नाहिस आजून...?" थोडं हळू आवाजात तिच्या डोळ्यात पाहत मी तिला प्रश्न विचारला.

 

श्रुतीका ची नजर खाली होती पण, तिच्या डोळ्यात मी माझं उत्तर आधीच शोधलं होत. कारण इतका वेळ तिच्या सोबत घालवून मला हे नक्कीच समजलं होत कि, श्रुतिकाच्या मनात सुद्धा आपल्याला काही जागा आहे, तर वेळ फक्त बाकी होती ते तिच्या होकाराला. वारा खूप जोरात चालू झाला होता, त्यामुळे आजू-बाजूला असणारी झाडे-झुडपे त्या वाऱ्यामुळे डाव्या दिशेला फिरलेले दिसत होते, तेवढ्यात राहुलने मला आवाज दिला, "आरे इथे ये...!"  मी मागे वळून पहिले, पण अचानक मी जिथे उभा होतो, तो दगड चिकल असल्यामुळे सरकून खाली कोसळला. त्यावर माझा एक पाय असल्यामुळे माझा तोल नाहीसा झाला आणि मी धक्का लागावा असा दचकून खाली घसरलो आणि जोरात खाली आदळलो, चिखलाने माखत मी घडगळत-घडगळत खाली पडू लागलो आणि तेथील असलेल्या एक मोठ्या दगडाला जाऊन आदळलो. माझे डोके तेथील मोठ्या दगडाला जोरात धडकले, त्या नंतर माझ्या डोळ्यावर अंधारी आली नंतर काय झाले, माझं मलाच समजले नाही.

 

वर्तमान काळात:

 

डोक्याला मजबूत मार लागल्या मुळे मी तिथेच बेहोष झालो होतो, मला तातडीने तेथील स्थायिक रुग्णालयात दाखल केले गेले. सर्वजण खूप घाबरून गेले होते. उत्तम ने माझ्या आई-बाबांना माझ्या स्तिथी बद्दल कळविले आणि तातडीने रुग्णालयात बोलावून घेतले. माझे नाशिबी चांगले होते कि..., मी तिथे असलेल्या दगडाला धडकलो.  जर तो दगड नासता तर मी आज इथे नसतो. माझे आई-बाबा मला शुद्धीत येताच प्रश्नांचा वर्षाव करू लागले. पाणावलेले त्यांचे डोळे त्यांचा प्रेमाची, आपुलकीची जाणीव करून देत होते. सोबत माझे जिवलग सुद्दा माझ्या करिता एवढे झटले होते. आणि हो श्रुतिका... तिचा होकार तर मला तिच्या डोळ्यातून कधीच भेटला होता, आता ती आयुष्यभर निशब्द राहिली तरीही मला माझे उत्तर भेटले होते... आणि त्यात मी समाधानी होतो.

 

काही वर्षानंतर:


आज श्रुतिका आणि माझ्या नात्याला किमान वर्ष होऊन गेली. श्रुतिका आणि मी एक-दुसर्यांना खूप जाणून होतो. मी आणि श्रुतिकाने लग्न करायचे ठरवले आणि एक दुसऱ्याला हमेशासाठी आपलं करण्याचे नियोजले उरलेले आयुष्य एकमेकांसोबत खुश राहून जगायचं ठरवले......!

 

लिहिण्यात आलेली कथा पूर्णतः काल्पनिक असून त्याचा कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही. कथेमधील असलेल्या व्यक्तींची नावे फक्त आणि फक्त कथेकरिता वापरण्यात आलेली आहेत, त्यामुळे कोणीही त्याचा वैयक्तिक अर्थ लावू नये. कथेवर असलेली आपली सुवर्ण समीक्षा मला खूप मौल्यवान आहेत.

 

सदैव आपला...!

समिर चंदनशिवे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Post a Comment

0 Comments