घर कस घ्यावं ?


काही महत्वाच्या आणि माहिती असण्या सारख्या गोष्टी जे तुम्हाला तुमचं स्वतःच घर घेताना माहिती असणं फार महत्वाचं आहे 



अशमयुगीन काळा पासून ते आज पर्यंतच्या आधुनिक काळा पर्यंत एक गरज जशी च्या तशीच राहिली आहे ती म्हणजे आपल्याभोवती असलेल्या ४ भिंती. पुरातन काळा मध्ये देखील राहण्यासाठी व वास्तव्य करण्या साठी स्वतःच घर असं खूप महत्वाचं होत. घर हे फक्त वातावरणातील असलेले बदल पासून बचाव करण्यासाठीच नव्हे तर इतर अनोळखी गोष्टी पासून जसे, जंगली प्राणी इत्यादी. यापासून लांब राहण्यासाठी देखील महत्वाचं होत. सध्याच्या काळा प्रमाणे स्वतःचे घर असणे हे गरजेचे नसून महत्वाचे आहे. आर्थिक चलना मधील येणाऱ्या बदलांमुळे आधीच्या आणि आत्ताच्या परिस्तिथी मध्ये घर घेणे हे खर्चेचे असून त्या साठी आपण खूप विचार करून ठरवणे हे केव्हाही उत्तम. पुढे मी काही महत्वाच्या गोष्टी संगीतल्या आहेत ज्याचा फायदा तुम्हाला नवीन घर घेण्यास नक्कीच होईल. 


घर घेताना घराजवळील परिसराचा आणि सोयीसुविधाचा अंदाज घेणे खूप महत्वाचे आहे: 


    घर घेताना तुमच्या मनात पहिला प्रश्न असा असावा कि, तिथे सुविधा येणाऱ्या काही काळामध्ये लागणार आहेत त्या उपलब्ध आहेत कि नाही.  जसे डॉक्टर, रुग्णालय, शाळा, ट्रेन स्टेशन बस स्टॉप, आणि त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे आजूबाजूला असलेली त्या बिल्डिंग मधील परिवार, कारण येणाऱ्या काळामध्ये तेच आपले खूप जवळचे नातलग होणारे असतात त्यामुळे त्यांची आणि तुमची मनाशी चांगली गाठ असणे खूप गरजेचं आहे. 


घर किती किमतीत घ्यावं ?


घर घेणं मोठी गोष्ट नसून ते किती किमतीत घेत आहोत ते महत्वाचं आहे, कारण ते घर आपण आपल्या मेहनतीच्या वाचवलेल्या पैशांपासून घेणार आहोत. घर आणि घराची आतील परिस्तिथी तसेच बाहेरील जागा बगुन तुम्ही त्या घराची किंमत ठरवावी. समोरील माणूस तुम्हाला कधीच तोट्या मध्ये जाऊन घर विकणार नाही पण तुम्हाला सुद्धा तुमच्या खिशातून जादा पैशे काढायची काही गरज नाही. 


ब्रोकेर लोकांशी सावधान ?


घर घेताना काही ब्रोकेर आपल्याला घर दाखवतात आणि त्याची माहिती देतात, त्याच हे करण्या मागचा हेतू मदत करणे  नसून पैशे कमवणे आहे पण तुम्ही त्या ब्रोकेर ने घराची किंमत सांगितल्या नंतर देखील काही दिवसांनी तेथील आजू बाजूच्याना घरांची किंमत स्वतः जाऊन विचारावी जेणे करून तुम्हाला तिथल्या वसाहतीच्या राहणीची किंमत समजेल आणि तुम्ही अंदाज बांधू शकाल कि तुम्हाला होम ब्रोकर खर बोलत आहे कि खोट. 


मला अशा आहे कि मी सांगीतलेल्या काही गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवाल आणि अर्थातच तुम्हाला भावी आयुष्यात त्याचा फायदा व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. येणाऱ्या काळात तुम्ही खूप चांगलं आणि सुरेख घर घ्यावं या साठी खूप खूप शुभेच्छा. 


धन्यवाद,

Post a Comment

2 Comments

  1. This blog speaks about facts and also helps us in analysing few things which are to be considered while thinking of our own house. Good job Sameer. Look out for some more informative blogs ahead🙂

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much for your comment. Your response is so important to us. Thank you

      Delete