प्रेमात रंगलो मी


 प्रेमात रंगलो मी...!

ऑफिस ला जायला आज चांगलाच लेट झाला.. " वणी .. दे ना लवकर डब्बा, आजून किती टाइम लागणार आहे तुला.."  उंच आवाज देऊन, फॉर्मल शर्ट ला इस्त्री करत विशाल ने आवाज दिला, आतल्या खोलीतून पदर सावरत, पैंजण चा आवाज करत, कपाळा वरून कानाच्या कोपर्यावरून येणाऱ्या घामाला रुमालाने सावरत "अवो... थोडा दम धीर आहे कि नाही तुम्हाला, का आरडा-ओरड चालली आहे",  वणी ने विशाल ला उत्तर दिले, रंग सावळा, घारे डोळे, लांब तांबड्या- काळ्या रंगाचे सुरेख केस, सरळ नाक आणि थोडे गुलाबी होट आणि कमरेला खवलेली साडी असा वणी चा अवतार.. नुकतीच विशाल आणि वनिताचे लग्न झाले होते. लग्न अरेंज मॅरेज होते, खरंतर विशाल ला लग्न करण्यास फारसा रस नव्हताच पण, घरात एकुलता-एक असल्यामुळे जबाबदारी च्या ओझ्याने त्याला लग्न करण्यास भाग पाडले. दोघे हि एकमेकांवर प्रचंड प्रेम करत, वनिता जास्त न शिकल्या मुळे तिचा आणि विशालच्या समजुद्दारपना मध्ये खूप फरक होता, तरी विशाल अतिशय प्रेम करत असल्यामुळे तिच्या प्रयेक गोष्टी सुधारत आणि तिला समजून घेत. विशाल वयाने वाणीता पेक्षा ४ वर्षे मोठा होता आणि तसेच तो घरात एकुलता एक, वडिल्यांच्या अंत्यविधी नंतर सर्व कारभार हा विशालच सांभाळत, आई ची मानसिक आणि शारीरिक स्तिथी ठीक नसल्यामुळे, त्या घरातच पडीक असतं , महत्वाचे सल्ले आणि भविष्यनिधी बद्दल तडकीचं मार्गदर्शन विशालची आईच करत. वसंत नगर मध्ये एका छोट्या चाळी मध्ये विशाल आपल्या आई आणि पत्नी सोबत राहत होता.  पटकन डब्बा बॅगेत भरून विशाल आज घाईत असल्यामुळे "येतो" म्हणयचचं  विसरून गेला, घरापासून ते बस स्टॉप पर्यंत चे अंतर हे १० ते १५ मिनीटे इतकेचं होते, खिशावर जोर पडू नये म्हणून विशाल नेहमी ते अंतर आपल्या पायाने कापत. तसेच कामावरून सुटल्यावर हि २० मिनिटचे अंतर तो पायी चालत येत, उरलेल्या पैशांचे नियोजन तो प्रवासाला लागणाऱ्या तिकिटांकरिता वापरात. वायफळ कोणत्या हि गोष्टीवर खर्च करणं विशालला जीवावर येत. चेहर्यावरती नेहमी स्मितहास्य ठेवत विशाल बस स्टॉपला पोहोचला. नेहमीची बस अजून तरी अली नव्हती हे त्याला समजले. सकाळी ९:३० ची बस हि त्याची नेहमी ची बस. इतकंच नाही तर बस मध्ये असलेले प्रवाशी सुद्धा त्याचे नातलगचं असल्या सारखे झालेले. उजवा हात झटकून लांब करत घड्याळाकडे बघता त्याने पहिले कि, घड्याळात ९:४५ झालेले, आज बॉस आपला जीव खातोय...! या विचाराने भुवया उंचावत, कपाळावर सुरकुत्या आणत  डोळे बंद करून, मान हलवून मनामध्ये  बोलू लागला. तेव्हड्यात उजव्या बाजूने बस चा आवाज येऊ लागला विशालने पहिले बस आलेली आहे. धाव घेत तो बस मध्ये चढला, गर्दी खूप होती पण हि बस सुटली तर आपला जॉब सुटेल हे नक्कीच असा विचार करून विशाल 'धक्का-बुक्की' करत बस मध्ये शिरला. "पुढे चला" "आत चला" बोलत तो नीट उभे राहण्यासाठी जागा बनवत होता शेवटी सर्व व्यवस्तीत जागा झाल्याने, तो एका खांबाला पडकून खिडकी बाहेरील परिसर बगण्यात व्यस्त झाला. 

किमान २ ते ३ बस स्टॉप घेऊन झाले, आता अजून विशाल ला १० मिनिटचे अंतर कापायचे  होते. बस पुन्हा थांबली आणि पुन्हा गर्दीची एक लहर अली, विशाल चालक खिडकी जवळ तोंड करून उभा होता मागून येणारी गर्दी कडे दुर्लक्ष करत तो पुढे पाहू लागला. अचानक नाकाला खळी पडावी असा सुगंध पूर्ण बस मध्ये दरवळला. अतिशय आकर्षक, मनोहर आणि लक्ष वेधणारा सुगंध विशालचे मन अजून आकर्षित करत होते. झटकन मागे पाहता त्याला दिसले,  एका २४-२६ वयवर्षाने असलेली रेखीव चेहरा, अंधारात काळोख पडावा अशे डोळे आणि रंग गोरा, कुरळे दाट केस त्याची एक बट कानामागून हाताने सरकवत ती व्यवस्तीत उभे राहण्यासाठी जागा बगत होती, पिवळ्या-कोवळ्या रंगाच्या पंजाबी सूट मध्ये ती खूप आकर्षक दिसत होती, त्यावर तिच्या चेहऱ्यावरचं तेज, हे हजर असलेल्या प्रवाशांचे पण लक्ष अजून वेधत चाललेले होते. विशालने तिला पहिले,तिची नजर पण विशाल च्या डोळ्याला जाऊन भिडली... दोघांचे डोळे पाहता-पाहता पाणावले, विशाल तिला खूप आपुलकीने आणि प्रेमाने पाहत बसला. यणाऱ्या-जाणाऱ्या माणसांचे प्रवासाचे आणि एवढंच नव्हे त्याचा उतरण्याच्या स्थानाचे पण त्यांना भान राहिले नाही, जणू ते कोणत्या वेगळ्याच दुनियेतील सफर करत होते, पूर्णतः त्या मुलीने हि विशाल ला काही त्याच भावनेने पहिले आणि गहिवरून  तिच्या देखील डोळ्यात पाणी आले. कारन ज्या मुलीकडे तो इतक्या आपुलकीने पाहत होता ती एके काळी विशाल ची प्रेमिका होती.... 

८ वर्षा आधी ...!

विशाल ने जेव्हा शालेय शिक्षणाची पूर्तता केली, तेव्हा त्याने पुढे अजून शिकण्या करीत कॉलेज मध्ये प्रवेश करायचं ठरवले. कॉलेज प्रवेश प्रक्रिये दरम्यान त्याला एक मुलगी कॉलेजे प्रवेश करण्यामध्ये खूप अस्वस्थ दिसत होती. विशाल ला प्रवेश प्रक्रियेबद्दल थोडी माहिती असल्याने त्याने तिची देखील मदत करायचे ठरवले , विशाल ने तिला तिचे नाव विचारले, तेव्हा ती बोलली "कुसुम", कुसुम हि तिच्या आई सोबत आलेली होती, विशाल कुसुम कडे खूप च जास्त भावनेने बगत-बोलत होता. त्याच्या आयुष्यात अशी कोणतीही मुलगी नव्हती जिच्या एव्हडा जवळ तो असावा, कदाचितचं तो कोणत्या मुलीसोबत एवढं बोलला असावा, जेवढं  तो कुसुम सोबतच बोलला. कुसुम ने देखील त्याला धन्यवाद करता तिथून निघायची परवानगी घेतली. २ आठवड्या नंतर कॉलेज चालू झाले सुदैवाने आणि विशालच्या नशिबाने साथ दिली व कुसुम आणि विशाल एकाच वर्गात आले. कालांतराने दोघांमध्ये जवळीक वाढत गेली, कुसुम सुद्धा विशाल कडे आकर्षित होत गेली. आणि ती सुद्धा विशाल च्या प्रत्येक गोष्टी मध्ये सामील होत त्याचा सुखात त्याची सहभागी आणि दुःखात मार्गदर्शक होत. अशेच ३-४ महिने निघून गेले, व विशाल ने ठरवले कि आपली जीवन साथी जर कोणी असेल तर ती फक्त कुसुमच, या पुढील आयुष्य सुद्धा कुसुम सोबतच काढायचे, कारण तिच्या मनासारखी आणि समजुदार अशी मुलगी कुसुम  होती. विशाल ने हिम्मत करून कुसुम ला "प्रेम प्रस्ताव" करायचा ठरवला, हातात गुलाबाचे फुल आणि चॉकलेट, डोळ्यामध्ये प्रेम आणि उत्तर काय असेल याची भीती असून देखील एक स्मित हास्य असा विशाल चा अवतार झाला होता. कुसुम ला विशालच्या प्रस्ताव बद्दल काहीच तक्रार नव्हती, तिला ख़ुशी होती कि आपण ज्याच्या सोबत आहोत, तो व्यक्ती खूप प्रेम करणारा, सांभाळ करणारा समजुद्दार होता, त्यामुळे तिने होकार देण्यास अतिवेळ सुद्धा घेतला नाही. अशेच खूप दिवस निघून गेले अनेक महिने आणि वर्ष निघून गेले. आता कुसुम आणि विशाल मोठे झले होते, पंधरावी उत्तीर्ण असून, आता ठरवल्या प्रमाणे, त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशालच्या घरी कुसुमचे येनं-जाणं चालू असल्यामुळे, त्याचा आई- वडिलांना तिच्या बद्दल काडीमात्र तक्रार नव्हती, उलट विशालची आई कुसुमला आपली मुलगी समजत, सर्व काही व्यवस्तीत चालले होते, हसत-खेळत सुखी आयुष्य होते, पण प्रत्येक गोष्टीचा शेवट हा आपल्या हातात नसतो त्याच प्रमाणे, यांचं देखील, कुसुम ने तिच्या घरी विशाल बद्दल सांगण्याची आता वेळ आली  होती. कुसुम हि खूप लाडाने वाढलेली मुलगी होती, एकुलती एक असल्याने तिचे हट्ट आणि लाड देखील अगदी मानाने तिच्या आई-वडिलांद्वारे पुरवले जातं. कुसुम हि उच्वर्णी जातीय होती आणि विशाल हा त्याच्या विपरीत खालील जातीय, दोघांच्या जातीमध्ये जमीन आसमानचा फरक होता. विशालला याची फार काही कल्पना नव्हतीच, कि याची पुढे जाऊन काही समस्या निर्माण होऊ शकेल, तसेच कुसुमचे हि म्हणणे होते. तिने तिच्या आई-वडिलांसमोर विषय मांडला आणि विशाल बद्दल सर्व काही अभयभीत होता सांगून टाकले. कुसुम च्या आई-वडीलांनी निमूटपणे सर्व ऐकून घेतले. तिचे बोलणे हे तिच्या वडिलांना काही फारसे पटलेले नसावे हे त्याचा डोळ्यांवरून अगदी साफ दिसत होते. तेवढ्यात कुसुमला तिचे वडील म्हणाले "बाळा.. तू पसंद केला आहेस तर तो वाईट मुलगा नसणारच, मला आणि तुझ्या आईला काहीच तक्रार नाही तू त्याला बोलावून घे" असे ऐकताच कुसुमचा आनंद गगनात मावळेनासा झाला. तिने जोरात ओरडून आई वडिलांना घट्ट मिठी मारली. इतक्या वर्षात असा कदाचितच कोणता दिवस असावा, ज्यात कुसुम एवढी खुश होती. तिला आता हि बातमी विशालला सांगायची होती वेळ न घालवता ती लगेच विशालच्या घरी पोहोचली, आणि आनंदाने विशाल ला व त्यांच्या आईना बातमी सांगू लागली. विशाल सुद्धा खूप आनंदी झाला शेवटी त्याने पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होणार होते. आपल्या प्रेमाचा त्याला पोळका आला. सर्व खुशी मध्ये होते, जणू आनंदाचा वर्षावचं.  



दुसऱ्या दिवशी विशाल कुसुम च्या घरी जाणार होता, मनात भीती चेहऱ्यावरती गांभीर्य आणि चिंतेचे वातावरण असा विशाल कसाबसा हिम्मत करून कुसुमच्या घरी पोहोचला.. इकडे कुसुमने विशालच्या आवडीचा पंजाबी ड्रेस घातला होता हा तोच ड्रेस होता, ज्या दिवशी कुसुम विशालला कॉलेज च्या दिवसात पहिल्यांदाच भेटलेला, कुसुमने गॅस चालू केला आणि चाय ठेवला, अतोनात कुसुमच्या मनात देखील भीतीदायक वातावरण होतच कि तिचे वडील विशालला पसंत करतील का...?  कारण विशाल हा सध्या फक्त एका सध्या ५ आकडी पगाराच्या नोकरीवर होता, अशे विचार कुसुमच्या मनात वादळ घालत होते... तेवढ्यात "टिंग-टॉंग" येणाऱ्या आवाजाने कुसुमचे ध्यान भरकटवले, विशालचं  आला असावा, असं तिने म्हटल, गॅस वर उकळत ठेवलेला चहा तिने ४ कपमध्ये ओतला आणि एका मोठ्या प्लेटी मध्ये तो ठेवला. बाहेर बगताच कुसुमला विशाल दारातून आत येत असल्याचे दिसला. विशालने कुसुमच्या वडिलांना भेट दिली आणि तिच्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊ लागला.विशालच्या मनात भीती होतीच पण सोबत स्मितहास्य त्याचा चेहऱ्यावरती साफ झळकत होत. त्याच कारणच म्हणजे पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता आज होणार होती. विशाल ने डावीकडे मान फिरवत आतील किचन मध्ये पाहिले, तिथून त्याला कुसुम हातात चाय घेऊन येता असताना दिसाली, तिला त्याच ड्रेस मध्ये पाहून विशाल जसा जुन्या दिवसांच्या आठवणीत गुंग झाला. "काय करता तुम्ही...?" कुसुम च्या वडिलांनी आवर्जून विशालला प्रश्न विचारला, "मी एका कंपनी मध्ये कमाला आहे, आणि गेली १ वर्ष मी तिथे काम करतो" विशाल ने उत्तर दिले. कुसुमच्या वडिलांनी परत प्रश्न विचारला कि " किती वर्षा पासून तुम्ही ओळखता एकमेकांना...?" विशाल ने उत्तर दिले "गेली पाच वर्षे आम्ही एकमेकांना ओळखत आहोत, आणि खूप पसंद सुद्धा करतो" अशेच अनेक प्रश विचारले गेले, शेवटी कुसुमच्या वडिलांनी त्याला विचारले... "तुमची जात कोणती...?" तेव्हा त्याने त्याची जात सांगता काही विलंब लावला नाही,  विशालच्या उत्तराने कुसुमच्या वडिलांच्या चेहर्यावरचे हास्य मिटवून टाकले, भुवया उंचावत डोळे मोठे करत, ते विशालला रागाच्या नजरेने बगत होते, इथे कुसुमला काहीच कळत नव्हतं कि तिचे वडील असं का पाहत आहेत आणि काय झालं आहे, ५-१० सेकंड च्या शांती नंतर कुसुमच्या वडिलांनी तिच्या आईला कुसमसोबत आतल्या खोलीत जाण्यास सांगिले, निमूटपणे तिच्या आईने कुसुमला घेऊन जाणे उचित समजले, इथे विशालला काही समजत नव्हते, आता खोली मध्ये फक्त विशाल आणि कुसुम चे वडील होते, उजव्या बाजूने मान फिरवत कुसुमच्या वडिलांनी कुसुम आणि तिची आई आतल्या खोलीत गेल्याची पुष्टी करून घेतली. कुसुमचे वडील आणि विशाल मध्ये आता संभाषण होण्यास चालू झाले, तीव्र रागिष्ट विचाराने तिचे वडील विशाल सोबत बोलत होते आतल्या खोलीत आवाज जाऊ नये त्यामुळे त्यांनी त्यांचा आवाज सावरत संभाषण करत होते, संभाषण पाहता हे काही सकारात्मक दिसत नव्हते या संभाषणात विशाल चे डोळे देखील पाणावले जसा त्याला धक्का बसावा असे त्याचे हावभाव होते .. 

वर्तमान वेळेत...   

 बस मध्ये २० ते २५ मिनिटे झाली होती आणि बस देखील पूर्णतः खाली झाली होती, कारण बस सर्व अंतर कापून  डेपो जवळ पोहोचली होती चालकाने सर्वांना खाली उतरण्यास आदेश दिला. सर्व जण खाली उतरले विशाल खाली उतरून त्या मुलीला शोधू लागला जिच्या विचारात तो मग्न झालेला, जिला पाहून आकाश इतक्या खोल विचारांच्या चक्रविव मध्ये फासला. विशालची नजर पूर्ण बस स्टॅन्ड वर गेली, त्याला ती मुलगी दिसत नव्हती अचानक त्याला आपल्या मागे कोणी उभे असल्याचा भास जाणवला मागे बघताच त्याला ती मुलगी दिसली, डोळ्यात पाणी भरलेले, चेहऱ्यावर काही गमावलेले भेटल्याचे सुख आणि सुखाचे अश्रू असा दोघांचा अवतार. विशाल ने वेळ न लावता तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर आपले डोके ठेऊन रडू लागला, कारण ती मुलगी दुसरी कोणी नसून "कुसुमच" होती... कुसुमच्या हातातील असलेली बॅग ती विशालच्या पाठीवर मारत पुढे बोलू लागली "का केलास तू...?", "कुठे गेलेलास...?" " "का असं वागलास माझ्या सोबत...?", "मला एकटी ला सोडून तू न सांगता निघून गेला हेच का तुझं प्रेम विश्वासघाती आहेस तू.." अश्या अनेक प्रश्नांचा वर्षाव चालू झाला. विशाल ते ऐकून घेत स्तबद उभा राहीला तिचे प्रत्येक बोलने तो ऐकून घेत होता. डोळे भरलेले होते विशाल ने तिला परत मिठी मारली आणि म्हणाला "कुसुम मला माफ कर" मी तुझा गुन्हेगार आहे, मी तुझ्या प्रेमाला नाही जागलो, पण याचा अर्थ हा मुळीच नाही कि मी विश्वासघाती आहे, मी तुझ्यावर खर प्रेम केलं कुसुम आणि तुझ्या आयुष्यासाठी मला तुझ्या आयुष्यातुन बाहेर जावं लागलं. मला नाही माहिती मी त्यावेळेस चुकिचा निर्णय घेतला कि बरोबर पण मला हे नक्कीच माहिती आहे कि मी तुझ्या साठी तो निर्णय घेतला.. रागिष्ट आवाजात कुसुमने त्याला विचारलं "काय झालं विशाल तू का संपर्क तोडलास किती शोधले मी तुला कुठे होतास, तुझ्या घरी मी रोज तुला शोधायला जायचे, पण तिथे पण तुम्ही राहत नव्हता असे मला कळले, कुठे गेलास रे असा अचानक मला एकटं सोडून ..?अतिशय कळकळीने कुसुमने विशाल ला विचारले. तेव्हा विशाल ला देखील राहवलं नाही, आणि त्याने खरं-खरं सांगण्यास सुरुवात केली.. 



कुसुम तुला माहिती आहे का..? ज्या दिवशी मी तुझ्या वडिलांसोबत बोलण्यास आलेलो तेव्हा तुझ्या घरी नेमकं काय घडलं असावं, तु जेव्हा आतल्या खोलीत गेलीस त्यानंतर आमच्यात  जे संभाषण झाले ते मी अजून पर्यंत विसरू शकलो नाही, "कुसुम तुझे वडील चांगले नाहीत" तुझ्या हितासाठी मला तुझ्या पासून दुरावा स्वीकारावा लागला. कुसुमने विशालला विचारले "लवकर सांग मला काय झालं होत विशाल प्लीस"विशालने वेळ न घालवता ते संभाषण सांगण्यास सुरुवात केली  .... "विशाल हे बग तुझी जात हि खालची आहे आणि तू आमची बरोबरी कधीच करू शकत नाही, फाटक्या जातीचे तुम्ही आमच्या सवर्ण जातीतील मुलीसोबत लग्न करण्याचं स्वप्न तरी कास पाहू शकता. मला हे कदापि मंजूर नाही आणि मला हे माहिती आहे कि कुसुम माझं ऐकणार नाही कारण तिला लहानच मोठं मी केलं आहे, माझ्या अंगा-खांद्यावर खेळून लाडाने वाढलेली पोर आहे ती. पण हो तू जर तिला समजावू शकलास तर हे उत्तमच ठरेल नाय का ? असा एकेरी रागिष्ट वृत्ती ने त्यांनी विशालला बोलले, विशाल बोलला "मी हे कधीच करू शकणार नाही , कुसुम सोबत मी प्रेम केलं आहे लग्न केलं तर तिच्या सोबतच करेल, तिच्या शिवाय मी कुठे जाणार नाही आणि मला हे मान्य नाही.. कुसुम चे वडील म्हणाले "मला माहिती आहे तू अस ऐकणार नाहीस, म्हणून हे बग...  म्हानुन त्यांनी एक 'लिफाफा' विशाल च्या तोंडावर फेकून मारला "उघडून बग काय आहे त्यात" असे कुसुम चे वडील बोलले, विशाल ने वेळ न लावता तो उघडून पहिला तर त्याला एक पत्र आणि त्यासोबत एक फोटो दिसला पत्रामध्ये एका पोरीला जिवेमारण्याची सुपारी घेतली गेली आहे याची नोंद होती आणि मागील फोटो हा त्या मुलीचा होता जिला ठार मारण्यात येणार होते, तर विशाल ने तो फोटो पहिला आणि तो निपचित पडला,  कारण तो फोटो अजून कोणाचा नसून कुसुमचाच होता. अफाट प्रश्नांचे वादळ त्याचा मनात भिडू लागले, डोळ्यात अश्रूंचा वर्षाव होता "कुसुम चे वडील त्याचाच मुलीला मारण्याची सुपारी का देत आहेत...? " "एक बाप त्याचा मुलीचा वैरी असू शकतो का...?" "कुसुम च्या जीवाला धोका निर्माण करणारा मीच तर नाही ना...?" "जरी कुसुमला इथून घेऊन गेलो तरी तिचे वडील तिचा शोध लावून तिला ठार मारतील" अशे अनेक प्रश्न विशाल ला सतावत होते.. विशाल कडे कुसुमचा जीव वाचवण्याचा एक च पर्याय दिसत होता तो म्हणजे तिच्या आयुष्यातून निघून जानं , हे करण मात्र काळजावर दगड ठेऊन घेण्याचा विचार सारखं होत, एव्हड्या वर्षाचे प्रेम एका सेकंड मध्ये विसरणे, पाहिलेली स्वप्ने त्याची अंबलबजावणी न करता त्याला तिथेच पुरणे हे विशाल ला खूप जड जात होते. शेवटी विशाल कुसुमवर जीवापाड प्रेम करत होता आणि तिच्या जीवाला धोका निर्माण होईल अशे काहीहि करणे त्याला मंजूर नव्हते. त्याने तिच्या वडलांना उत्तर दिले "ठीक आहे ... मी तिच्या आयुष्यातून हमेशा साठी निघून जाईल पण मला तुम्ही वाचन द्या, कि तिच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे" कुसुम चे वडील अत्यंत खुश झाले आणि त्याने विशालला म्हटले "तू त्याची काहीच चिंता करू नको, ती माझी मुलगी आहे मला तिचे हित कशात आहे माहिती आहे" विशाल उठला आणि हात जोडून तिच्या वडिलांना नमस्कार दिला, डाव्या बाजूने हलकी मान झुकवत डोळ्यात अश्रू घेत तो शेवटचे कुसुम ला बगन्याचे प्रयत्न करत होता पण ती दिसली नाही, तेवढ्यात तिचे वडील थोड्या मोठ्या आवाजात बोलले "दरवाजा तिथे आहे" निमूटपणे विशाल दरवाजाकडे वळला आणि घराबाहेर पाऊल टाकले. 


हे सर्व ऐकताच कुसुमला धक्का बसला, तिने जे बेकायदेशीर आरोप विशाल वर लावले आणि जे चुकीचे समज विशाल बद्दल ठेवले त्याचे तिला वाईट वाटू लागले आणि एका बाजूला तिच्या वडिलांचे असे रूप असेल हे तिला समजले, त्याने कुसुमचा राग सुद्धा खूप वाढला तिला विशालच्या अश्या बोलण्यावर विश्वास बसतच नव्हता पण विशाल हे खर बोलत होता हे मात्र तिला समजलेले होते. विशाल ने कुसुमला म्हटले "तुझ्या हितासाठी मला हे करावं लागलं, मी मुंबई मधील घर सुद्दा विकून टाकले, आणि दुसरी जागी काम शोधले तुझी आठवण अली नाही असा एकहि दिवस नव्हता पण मी मन मारून जगणं शिकलो होतो पण आज तुला अचानक बगुन मी गहिवरून गेलो, 'कुसुम मला माफ कर' मी तुझा गुन्हेगार असेलही पण मला तुझ्या जीवाची फार काळजी होती.. ऐकून कुसुम हुंदके देऊन रडू लागली.. आणि विशाल ला पुन्हा आपल्या जवळ घेऊन मिठीत सामावून गेली.. विशाल ने त्याची सध्याची परीस्तिथी सांगता तिच्या आयुष्यातील गोष्टीची विचारपूस केली आणि समजले कि कुसुमचे तिच्या वडिलांनी बळजबरीने एका गावकरी सरपंच सोबत लग्न लावून दिले होते, ते सुद्धा तिच्या मर्जी विरुद्ध.. ती तिच्या आयुष्यात काही फारसा खुश नसल्याची उपस्तीथी विशालला जाणवली.. कुसुम आणि विशाल ला समजले कि प्रेम हे कधी विसरण्या सारखे नसते लग्न झालेलं असेल तरी सुद्धा, ते खुशाल एकत्र नसतील हि पण त्यांची मन एकत्र आहेत. गमावलेले प्रेम विशालने पुन्हा मिळवलेले होते. कुसुमचा विशाल बद्दल चा झालेला गैरसमज दूर झाल्यामुळे विशाल खुश होता. कुसुम आणि विशाल कधीच एक दुसऱ्याला विसरू शकले नाही आणि आज हि एकमेकांवर अतूट प्रेम  करतात.. ते म्हणतात ना "प्रेम केलं तर शेवट पर्यंत" तसेच काही यांचे नातं...

घटना काल्पनिक आहे, याचा कोणाच्याही वैयक्तिक गोष्टींसोबत संबंध नाही. 

कथा फक्त वाचकांच्या करमणूकि करता लिहिण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments