डॉ. बाबासाहेब आंबेडकर






 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त, त्यांना समर्पित एक छोटीशी कविता लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना लखलखत्या शुभेच्छा..!


'मानुस' म्हणून जन्माला आलो, पन 'माणूस' म्हणून जगण्याची आजादी नव्हती,

तर 'शाळा' आणि 'घर' फ़क्त एवढीच दिवसभराची साखळी होती..!


पाचवित असतानांच बय (आई) मला सोडून गेली होती,

तर आत्यानेच मायमाउलीची सावली दिली होती..!


शिकून मोठा विद्वान व्हाव हीच वडलांची इच्छा होती, अन त्यामुळे आभ्यास , पाठांतर आणि वाचन  यांच्याशीच माझी दोस्ती होती..!


बाहेरील पानी पिल्याने ते 'बाटेल' याची जनु शिक्का मुहूर्तच होती, अन आमची सावली देखील सुवर्णांना 'अपवित्र' ठरवित  होती..!


'चवदार' तळ्या पासून ते 'काळाराम' मंदिरा पर्यंतची ही धाव होती, तर आम्ही सुद्धा प्राणी नसून मानुस आहोत हे सांगायची आस होती..!


'त्यागमूर्ति' माझी ती रमाई लाखमोलाची होती, कुठे ही खचून, हरपुन गेलो तर माझी प्रेरणा 'ज्योत' होती..!


स्वतंत्रता, समता आणि बंधुता हक्काची मांग होती, तर गांधीवृत्ति अडथळा असून सुद्धा, हक्क मिळवण्याची पाठीवर थाप होती..!


'मनुस्मृति' दहन करण्याची मनात आग होती, तर भारताचे भवितव्य घडवण्यासाठी, 'संविधान' लिहिण्यापर्यंतची पेनामध्ये धार होती..!


बाबा साहेबांचे उपकार या जन्मी तर काय, पुढच्या सात जन्मी पण फेडू नाही शकणार आम्ही.


🙏🏼"जय भीम" "नमो बुद्धाय"🙏🏼


🖊 समिर चंदनशिवे

Post a Comment

0 Comments